सायली राज्याध्यक्षांच्या फेसबुक पोस्टमधे ‘स्वामी’ चित्रपटाचा उल्लेख होता. तोपर्यंत हा चित्रपट बासू चॅटर्जींचा आहे हे माहीत नव्हतं. फक्त ‘पलभर में ये क्या हो गया’ हे आवडीचं गाणे यातलं आहे हेच माहीत होतं. याच चित्रपटावरून संजय लीला भन्साळीने ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट काढला असाही उल्लेख होता. त्यामुळे कुतूहल चाळवलं गेलं. ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपट जरी ओटीटी असला तरी त्यातल्या बेसिक प्रिमायसेसमुळे आवडला होता.
श्वासाश्वासावर चाले
पांडुरंग जपमाळ
रोमारोमातूनि स्फुरे
एक विठ्ठल केवळ
गाथा शब्दाशब्दातून
राम कृष्ण हरी सूर
वीणेवर उमटतो
पांडुरंगाचा झंकार
कधी आर्त कधी जाब
कधी गाळी कधी लीन
शब्द होते आवरण
भाव वाही ओथंबून
थांग लागेना भक्तीचा
इंद्रायणी खुळावली
ह्रदयात सांभाळोनी
गाथा शिरी धरीयेली
काही वर्णना होईना
शब्दी बांधू कसा भाव
ठेवी पायापाशी स्वामी
अंतर्यामी हीच हाव
.............................
गाळी ...... शिवी गाळी
साई आणि स्वामी
साई आणि स्वामी असती एक
त्यामध्ये करू नका भेद
साई असती वासराची गाय
स्वामी करती दुष्टांचा न्याय
दोघेही तारती संकटातूनी
सदा असू देत नाव त्यांचे मनी
जय श्री स्वामी समर्थ ...
जय साई राम...
तृप्ती (पिंकी)
trupti amberkar