सुश्रुतला रोज रोज सांगून आता गोष्टींचा ऐवज संपायला आला आहे. ‘एकीचे बळ’, ‘जशास तसे’, ‘दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ’ अश्या नेहेमीच्या सगळ्या गोष्टी सांगून झाल्या आहेत. आता कधी कधी याच अर्थाच्या नवीन गोष्टी रचाव्या लागतात. परवा ‘गर्वाचे घर खाली’ या तात्पर्याची अशीच एक नवीन गोष्ट तयार केली.
रोज रात्री झोपताना गोष्टी ऐकायची सुश्रुतला सवय झालीय. किंबहुना आम्हीच ती लावलीय. रोज रोज नवनवीन गोष्टी कुठून आणायच्या हाही एक प्रश्नच असतो. यातून आमच्या कल्पनाशक्तीचा कसच लागतो. वर त्या बोधप्रद असाव्यात, त्यांचं काही तात्पर्य असावं असा आमचाच आग्रह. असंच एकदा कुठली गोष्ट सांगता येईल याचा विचार करीत असताना अश्वत्थामा आठवला.
नमस्कार लेखक मित्र-मैत्रिणींनो,
'सुचेतस आर्टस' आपले स्वागत करत आहे एका नवीन उपक्रमात…
आपण चांगले नॉन फिक्शनल साहित्य लिहीत असाल...(किंवा लिहीण्याची इच्छा असेल).....म्हणजे मोटीव्हेशनल, माहीतीपर, मराठी साहित्यातील विभूतींवर, लेखकांवर इत्यादी जसं की त्यांचे जीवनचरित्र, एखाद्या विषयावरची स्टेप बाय स्टेप माहीती..... तर आपण आपले स्वलिखित साहित्य आम्हांला देऊ शकता. प्रकाशित असेल तरी चालेल...पण ऑडिओ बनलेले नकोत.
निवड झालेल्या साहित्याचे ऑडिओबुक बनेल अगदी मोफत! ( साहित्याचे मानधन मिळेल.) ...आणि नामांकित पॉडकॉस्टवर त्याचे प्रसारण होईल.....!
"ग्रेस"
मी मुळात मायबोलीवर आलो ते वैभव जोशीचा इंटरव्ह्यु बघून! स्पृहा जोशीच्या 'खजिना' मध्ये तो भरभरून बोलला 'मायबोली' बद्द्ल.
दुसर्याच दिवशी मायबोली जॉइन केलं. त्याने त्या दीड पावणेदोन तासांच्या गप्पांमध्ये कविता, गझल, बकीचे कवी जसं की बालकवी, ग्रेस इ. याबद्द्ल जे काही बोललयं त्याला तोड नाही. खाली खाली त्याची लिंक देतोय. ज्यांंना बघावं वाटेल त्यांनी बघावं!!
https://www.youtube.com/watch?v=Jpm_u4JbqUc
तर लहानपणापासून चहा हवाच असं काही ठरलेलं नव्हतं आणि ठरलेलं नसल्याने काही एक अडायचं नाही . मुळातच लहान मुलांना चहा मिळायचाच नाही . दूध पिणं मात्र अत्यावश्यक!
पुढे यथावकाश चहाने आयुष्यात एंट्री घेतली . चहा आवडू लागला .मात्र अस्मादिकांचे चहा पिण्यातले नखरे बघून स्वतःचा चहा स्वतःच बनवायचा असं फर्मान निघालं. खरेतर चहा किंचित चॉकलेटी पांढरा असायला हवा , खूपप गोड नको , त्यात कुठल्याही प्रकारचा मसाला नको आणि "ताजाच" हवा , ज्यादा उकळलेला नको या अटी फार नव्हेत असे आमचे प्रांजळ मत आहे .पण हाय ये जालीम दुनिया ! तर ते असो ..
फडताळ आठवणींचे
काही क्षण अगदी आपल्या आसपास वावरून पसार होतात. आठवणींच्या दावणीला त्यांना बांधावे म्हटले तर कधी ए कदम घट्ट निरगाठ बसते, जी सुटता सुटत नाही.
कधी निसर गाठ बनते जी काळाच्या थोड्याश्या हिसक्यानिशी सुटून जाते. मग असे क्षण कुलूपबंद करण्यासाठी माझ्यापाशी एकच मार्ग राहतो, तो फडताळात बंदिस्त करण्याचा.
फडताळ म्हटल्यावर डोळ्यांसमोर उभा राहतो तो कपाटसदृश्य,3 किंवा 4 खणांचा भिंतीच्या अंगातला कप्पा. लाकडी कपाट किंवा गोदरेजचं कपाट ही फार नंतरची चैन असण्याच्या काळातील हे भिंतीतील कपाट
फाटक्या माणसानं चंद्राची अपेक्षा ठेऊ नये.. त्याच्याकडे चंद्राच्या प्रतिबिंबाशिवाय काहीच हाती येत नाही!
प्रेम करावं ते मुली गटवण्यात हुशार असलेल्यानं, धंदेवाईक तोंडावर गोड बोलून स्तुतीसुमनं उधळून फ्लर्टींग येणार्यानं! मनात खरं प्रेम बाळगणार्या साध्या लोकांनी नाही. कारण आज ना उद्या त्यांचं हरणं निश्चित असतं!
मॉलमध्ये तिला इनडायरेक्टली प्रपोज करणं माझी सगळ्यात मोठी चूक होती. यासाठी नाही की तिला ते आवडलं नाही पण यासाठी की तसं करुन मी तिला सगळ्यात जास्त दुखावलं होतं.
संपूर्ण प्रवासात ती घुम्यासारखी एकटी बसून होती. माझ्याकडे साधं बघायलाही ती तयार नव्हती.
ती माझ्याबरोबर जास्त बाहेर येत नव्हती. आत्ताच नाही याच्या अगोदरही.
कधीही कुठे ये म्हटलं तर तिचं आपलं, नको घरी जायचं आहे, उशीर होईल, पप्पा काय बोलतील?
अगं कधीतरी हो म्हण!
आणि हो, कंटाळा!
हा तर तिला उपजतच देवाने गिफ्ट म्हणून दिला असावा. मी काहीही ठरवावं आणि हीला कंटाळा आला नाही असं कधी झालंच नाही.
एकदा तिनं क्लासला दांडी मारली होती. मी समोरच्या एका पब्लिक बुथवरुन तिला फोन लावला. चार वेळा रिंग वाजल्यानंतर एकदाचा तिचा पार आळसाटलेला आवाज आला-
“हॅल्लो..”
“हॅलो*** कुठे आहेस?”
“घरी. झोपलेय”
“आत्ता?”
मी कितीतरी वेळ असा वेड्यासारखा स्वत:शीच हसत होतो.
खरं म्हणजे तिची आठवण येऊन मला तिचे मॅसेज वाचण्याची तिव्र इच्छा होणं आणि नेमकं त्याच वेळी तीनं असा मॅसेज पाठवणं- ही ठरवून केलेली गोष्ट नक्कीच नव्हती. होता तो निव्वळ योगायोग. पर्फेक्ट टाईमिंग जुळवून घडून आलेला!
वास्तविक तीने जायला हवं होतं, पण ती गेली नाही.
मी इतकं तुसडेपणाने ‘हो’ म्हणूनदेखील ती न जाता निमुटपणे माझ्या शेजारच्या चेअरवर येऊन बसली. आणि टूकूर-टूकूर आपली क्लासरुम न्याहाळू लागली. कधी प्रॅक्टीस करणार्यांकडे तर कधी घरी जाणार्या स्टुडंटकडे एवढंसं तोंड करुन बघू लागली. मध्येच समोर बसलेल्या मुलामुलींच्या थट्टा मस्करीकडे बघून स्वत:शीच जणू केविलवाणी हसू लागली. तिच्या त्या प्रकाराकडे बघून मला कसंसंच झालं. प्रॅक्टीकलवरचं लक्षच उडालं आणि पुन्हा एकदा आमच्या मनाने कच खाल्ली!