ग्रेस

Submitted by प्रगल्भ on 10 July, 2020 - 01:31

"ग्रेस"

मी मुळात मायबोलीवर आलो ते वैभव जोशीचा इंटरव्ह्यु बघून! स्पृहा जोशीच्या 'खजिना' मध्ये तो भरभरून बोलला 'मायबोली' बद्द्ल.
दुसर्‍याच दिवशी मायबोली जॉइन केलं. त्याने त्या दीड पावणेदोन तासांच्या गप्पांमध्ये कविता, गझल, बकीचे कवी जसं की बालकवी, ग्रेस इ. याबद्द्ल जे काही बोललयं त्याला तोड नाही. खाली खाली त्याची लिंक देतोय. ज्यांंना बघावं वाटेल त्यांनी बघावं!!

https://www.youtube.com/watch?v=Jpm_u4JbqUc

मी डिप्लोमाच्या सेकंड इअर ला असताना वैभव जोशी ची 'कधी तरी' नावाची गझल ऐकली. फाउंटन ची संगीत नाटके शोधत होतो युट्युब वर सो याच्या गझलांच्या सी.डी. च आणि संगीत नाटकांच प्रॉडक्शन लेबल एकच होतं. मी ती गझल ऐकली चांगली चार दिवस सलग ऐकली. आणि त्याला पाचव्या दिवशी फेसबुक वर 'फ्रेंड रिक्वेस्ट' सेंड केली. दुसर्‍या दिवशीच अ‍ॅक्सेप्ट झाली. मी भरून पावलो होतो.
काही दिवसांंनी घरात विषय निघाला वैभव जोशीचा माझ्यामुळेच बहुतेक!!
आई कडून मला कळालं की वैभव जोशी मुळात सोलापूरचा आहे. आईच्या श्रीराम सोसायटीच्या शेजारच्या उजनी कॉलनीतच रहायचा. आणि आई जिथे प्रोग्रॅमिंग शिकवायची (सुहास मॅडम च सुयश इन्स्टिट्युट) तिथेच तो नोकरीला होता काही काळासाठी.
त्याच्याशी फेसबुक वर थोडं फार बोललो दोनदाच बोललो. त्या खजिना कार्यक्रमानंंतर त्याला फेसबुकवर एक पत्र (पी.डी.एफ. फॉर्म मध्ये) टाकून फेसबुक डीअ‍ॅक्टिव्हेट करून मायबोलीवर आलो.
या पुर्वार्धाबद्द्ल क्षमस्व!!

जेव्हा खजिना मध्ये ग्रेस विषयी बोलला आणि त्याच्या काही फेसबुक पोस्ट मध्ये ग्रेस बद्द्ल लिहीलेलं मी जे वाचलं होतं.
त्यावरून मी देखील एक शब्दांजली वाहिली होती युअरकोट डॉट कॉम वरती ग्रेस ला जी खाली लिहीली आहे. ( वेभव जोशी ने एक शब्दांजली वाहीली आहे त्याच्या फेसबुक वर मग मी ही प्रयत्न केला. आणि प्रामाणिकपणे सांगतो 'शब्दांजली' हा प्रकार वैभव जोशी मुळे कळाला.)

वाहता वारा थांबत नाही
धरलेला हात सोडवत नाही
काळाचं आभाळ पोकळ नाही
"भय इथले संंपत नाही"

फिटली आस पुन्हा लागते
मिळाली वेळ आपुली नसते
गिळली तहान जळ देते
"मज तुझी आठवण येते"

ग्रेस मी पहिल्यांदा ऐकला तो सातवी आठवीत आकाशवाणी वर त्याच्या 'भय इथले संपत नाही' या गाण्यातून आणि दुसर्‍यांदा 'ती गेली तेव्हा' यातून ऐकला. तेव्हा फारसंं कळत नव्हतंं पण ऐकून आत कसंंसच झालं. मी अजुनही ग्रेस पुर्ण काय पण एक टक्का ही वाचलेला नाहीये मी मान्य करतो. आणि माझंं अस मत आहे की तुम्ही ग्रेस एक टक्का ऐका नाहीतर शंभर टक्के , मायक्रो , पिको, नॅनो मध्ये ऐका (अर्थात एखादीच कविता वाचलेले , त्यातिल एखादच कडवं वाचलेले आणि दोन ओळी वाचलेले हे त्या मायक्रो, पिको,नॅनो कॅटेगिरीत येतील) ग्रेस तेवढाच पोळतो, तेवढाच अस्वस्थ करतो!!

मी मध्यंंतरी ग्रेसला शब्द्श: ऐकण्यासाठी युट्युब वर आणि अख्या गुगल वर बरच सर्फिंग केलंं. मला फारसंं काही मिळालं नाही. एकंदरीत ग्रेस फारच थोड्या प्रमाणात अ‍ॅव्हेलेबल आहे. मी 'नक्षत्रांचे देणे' या 2009 साली (कदाचित) सुरू झालेल्या कार्यक्रमाचा भाग पाहीला.
त्यात फक्त ग्रेसच शब्द्श: बोललाय! आणि मी प्रांजळपणे मान्य करतो मी ग्रेसचा आवाज लहानपणी ऐकलेला असला तरी अत्ता अत्ता मला आवाज कळायला लागलाय!!

https://www.youtube.com/watch?v=jYb_GGUhzdQ&t=20s ---> नक्षत्रांचे देणे (इपी-1)

माझी अशी एक निर्मळ इच्छा आहे की या कोरोनाच्या पडीक काळात ग्रेस विषयी मायबोली वर वाचायला मिळावं. ग्रेस बद्द्ल जाणून घ्यायला मिळावं.
मी नवीन आहे. मला माहीत नाही ग्रुप, धागे यातला फरक. पण तुमच्या पैकी कोणीतरी फक्त 'ग्रेस' विषयी बोलण्यासाठी किंवा ग्रेसच्या कविता समजून सांगण्यासाठी एखादा ग्रुप अथवा धागा तयार करू शकेल का?
किंवा हाच धागा ग्रेस 'ग्रेस' विषयी बोलण्यासाठी किंवा ग्रेसच्या कविता समजून सांगण्यासाठी वापरता येऊ शकतो क?
ग्रेस कितीही वाचला तरी अनाकलनीय आहे मान्य! निदान वाचायला तरी मिळो देवा!!

आज ग्रेस ची जयंती नाही अथवा पुण्यतिथीही नाही!
मुळात ग्रेस ही एक आठवण आहे जिची साठवण करण्यासाठी मन उचंंबळून येत असतं.

टीप: वैभव जोशी आणि ग्रेस या दोघांंचा अख्ख्या लेखनभर एकेरी उल्लेख केला कारण ....
वैभव जोशी --> माझ्यासाठी देव आहे कविता, गझला, गाणी यातील!
ग्रेस --> या सगळ्या कवींची आई होतो. आपल्या प्रत्येक कवितेतून, मुळात जे कवी आहेत या सगळ्या बाळांना सावरण्यासाठी पावलो पावली ओघळतो...काळाची कल्पना देत ओघळतो!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

प्रगल्भ ...
तुला खूप धन्यवाद Happy
मीही काही दिवस हाच विचार करत होते की इथे विचारुयात का ... मला 'भय इथले संपत नाही ' कवितेचा अर्थ हवा होता (शब्दशः नाही) , खूप दिवस या भुंग्याने डोकं पोखरलंय. खूप च cryptic वाटते ही कविता आणि कदाचित वेगवेगळॆ अर्थ निघू शकतात
quora वर वाचलं होत की ही एका मुलाने त्याच्या गेलेल्या आई च्या आठवणीत लिहिलेली कविता आहे, पण विशेष पटलं नव्हतं.

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब

संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

"त्याच्या गेलेल्या आई" --> आईच्या आठवणीत केलेली 'ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता' ही आहे.
बाय द वे तुम्ही तो अ‍ॅपिसोड पाहीला आहेस का? नक्षत्रांचे देणे मधला एक भाग आहे तो मी लिंक टाकलीय बघ.
आणि तुम्ही पण विचारून विचारून याच कवितेबद्दल विचारलंंस
अंगावर काटा येतो यातली काही कडवी वाचून!अजूनही!

https://anandghare.wordpress.com/2019/05/14/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%...

मी हे वाचलं होतं. फक्त वेळ लागला हिस्ट्री मधून शोधायला. ते सगळं वाचूनही भूक शमली नाही.

*ग्रेस*
=====
तुझ्या कवितेची ओळ
अवचित ओठी येते
जिंदगीच्या निवडुंगा
इवलेसे फूल येते

तुझ्या कवितेची ओळ
अवचित ओठी येते
कालियाच्या डोहातून
कृष्णधून उमटते

तुझ्या कवितेची ओळ
अवचित ओठी येते
काजळल्या खोरणात
सांजवात थर्थरते

ओळ तुझ्या कवितेची
ओठी पुन्हा पुन्हा येते
खोलवर रुजूनिया
पुन्हा पुन्हा उगवते

इथल्या सगळ्याच लिंक इंटरेस्टिंग आहेत ...
@चिडकू +१
वैभव जोशी ची लिंक खास मायबोली साठी आधी पाहिली. इथे मिळालेल्या प्रोत्साहनाबद्दल खरचं भरभरून सांगितलंय
https://www.aathavanitli-gani.com/Geetkar/Grace
bdw प्रगल्भ, ते तू च तुम्ही नसतं केलं तरी चाललं असतं Happy Happy

छान लिहीलय, वैभव जोशींची मुलाखतीची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद. त्यांचा माबोवरचा ID काय होता? मी शोधलं पण त्यांच्या कविता मला सापडल्या नाहीत.

ते तू च तुम्ही नसतं केलं तरी चाललं असतं Happy Happy ---> अर् !! ते होईल सवयीने. सध्या मी नवीन आहे ना..सो सगळ्याला ओ दादा - ओ ताई करतोय. आज सकाळी भरत दादा बोलले नुसतं 'भरत' बोल नंंतर समिधा ताई म्हणाल्या नुसतं 'समिधा' बोल. आणि सकाळीच तुझ्या या पोस्ट ला फ्लो मध्ये 'तु' आलं. बट ओके ...श्रद्धा!!
थॅंक्स फॉर आठवणितील गाणी लिंक Happy

"त्यांचा माबोवरचा ID काय होता?"==> मला खरच नाही माहीती . बहुतेक वैभव जोशीने मायबोली च अकाउंट बंद ठेवलय.

"मी शोधलं पण त्यांच्या कविता मला सापडल्या नाहीत."--> तुम्हाला त्यांच्या फेसबुक वर जाव लागेल धनु ताई. अजून त्यांच फेसबुक प्रायव्हेट नाहीये. तुम्ही लॉग ईन नाही केलं तरी त्यांच्या पोस्ट वाचता येतिल.
थोडा वेळ द्या , दुसरा पर्याय शोधायल. तोपर्यंंत फेसबुक वर आस्वाद घ्या.
https://www.youtube.com/watch?v=_L4Y59FL8nE&t=2s ---> हे पण मस्त आहे

लेख तर आवडलाच पण तुझे खूप आभार प्रगल्भ !!
मी आणि माझी मैत्रीण 'भय इथले संपत नाही ' हे महाश्वेता या दुरदर्शन वरील शो चे शीर्षक गीत होते तेव्हा पासून अगदी चाहते झालो होतो.. तिलाही पाठवते धाग्याची लिंक...
सर्वांचे आभार लिंक्स आणि माहितीसाठी...

https://www.maayboli.com/node/21765
मायबोलीचे देणे - वैभव जोशी - ९ डिसेंबर २०१०
त्यांचं लेखन मात्र दिसत नाहीए.

मायबोली सर्चमध्ये मिळालेलं वैभव जोशी यांचं लेखन किंवा त्यांच्याबद्दल
https://www.maayboli.com/search#gsc.tab=0&gsc.q=%20%E0%A4%B5%E0%A5%88%E0...

ओपन लिंक इन न्यू टॅब करत वाचा.

"लेख तर आवडलाच पण तुझे खूप आभार प्रगल्भ !!"---> आभार काय त्यात अस्मिता ताई, आतून आलेलं आहे ते सगळं Happy

त्या इ.पी. च्या भागात ग्रेस नी बोलूनच ठेवलय एवढं
"देवा जर जमलेच, माझ्या परमेश्वरा .....माझ्या कवितेवर जगात कुणालाही मात करू देऊ नकोस"
देवाने ऐकली ती पार्थना ... अगदी तंतोतंत!!

वरचा लेख भारावून लिहिलेला दिसतोय. आवडला.
" माझंं अस मत आहे की तुम्ही ग्रेस एक टक्का ऐका नाहीतर शंभर टक्के , मायक्रो , पिको, नॅनो मध्ये ऐका (अर्थात एखादीच कविता वाचलेले , त्यातिल एखादच कडवं वाचलेले आणि दोन ओळी वाचलेले हे त्या मायक्रो, पिको,नॅनो कॅटेगिरीत येतील) ग्रेस तेवढाच पोळतो, तेवढाच अस्वस्थ करतो!! " हे पर्फेक्ट लिहिलंय. असं वहवून जाता येण्याचा हेवा वाटतो

कॉलेजच्या दिवसांत असं काही होणं हा अनुभव खूपच छान आहे.
फुलपाखरू , अत्तर असल्या उपमा गुळगुळीत झाल्या तरी त्याच आठवतात आणि पटतात.

ग्रेसबद्दल वाचायचंय, पण त्यांची पुस्तकं वाचलीत का?

माझ्याकडे त्यांचंसंध्याकाळच्या कविता हे पुस्तक आहे. पण इतर काव्यसंग्रहांइतकं ते हाताळलं जात नाही. त्यांच्या कवितांना भिडावंसं , जवळून भेटावं असं कधी वाटलं नाही. का माहीत नाही.

"ग्रेसबद्दल वाचायचंय, पण त्यांची पुस्तकं वाचलीत का?"--> दुर्दैवाने एकही नाही भरत भाऊ
मी लेखात कबूल केलयंं फक्त दोन गाणि ऐकली आहेत.

"माझ्याकडे त्यांचंसंध्याकाळच्या कविता हे पुस्तक आहे"--> लकी आहेस माझ्यापेक्षा तरी अगदीच
मी ऑनलाईन नक्की मागवेन भरत दादा , अरे हे कोरोनाच एकदा निवळू देत फक्त

बाबांकडून गुंजभर ऐकलाय ग्रेस

"त्यांचं लेखन मात्र दिसत नाहीए."---> मला दिसलं , फायनली तुला अकाउंट सापडल देव पावला Happy
आणि माझ्या कडे भटांच एकच पुस्तक आहे. 'रंंग माझा वेगळा'

रंग माझा वेगळाच्या शेवटीच गझलेची बाराखडी आहे ना?

कवितांची पुस्तके तुलनेने स्वस्त असतात. दुर्दैवाने वाचनालये कवितासंग्रह ठेवताना दिसत नाहीत.

"रंग माझा वेगळाच्या शेवटीच गझलेची बाराखडी आहे ना?"---> आई आई गंं!!
अत्ता पाहिलं मी , अक्षरश: कस्तुरीमृग भरत दादा
खूप खूप खूप खूप धन्यवाद !!
मी आत्ता त्या लेखाचं टायटल पाहीलं
पुस्तक आणून दोन वर्ष झालीयत पण शेवटापर्यंत गेलो नाहीये.
आणि खवचट टोमणा नको मारू ना हा! हा! हा!
मी कसलीच पुस्तके हरवत नाही अगदी लहानपणापासून
माझ्या मामीच्या माहेरी कोथरूड ला मी माझ माझ्या 10वी च्या सेंड ऑफ ला मिळाअलेलं विक्रम साराभाइंच पुस्तक विसरलो होतो.
डिप्लोमाच्या सुट्टीत गेल्यावर आठवणीने मागून आणलयं!!

हा धागा आता गप्प्पाचं पान होऊ लागलाय. तरी पण सांगतो.
मी कॉलेजात असताना लायब्ररीतून कवितासंग्रज घेऊन वाचायचो. त्यात ल्या आवडलेल्या कविता एका वहीत सुंदर अक्षरांत उररवून काढायचो.
रंग माझा मधल्या एक चतुर्थांश कविता तरी उतरवल्या असतील. मीही तेव्हा गझलेची बाराखडी वाचली नसावी कारण रदीफ काफिया हे शब्द काही कानावर पडले नव्हते. पण त्यातल्या आणि दिवाळी अंकांत येणा र्‍या गझला आवडायच्या. त्या वाचून त्या फॉर्मॅट मध्ये दोन कविता लिहिल्या होत्या.

पुढे सुरेश भटांचे सगळे कवितासंग्रह विकत घेतले. पण माझ्या अक्षरांतल्या त्या कविता अजून आहेत माझ्याकडे.

"रंग माझा मधल्या एक चतुर्थांश कविता तरी उतरवल्या असतील."--> बापरे!!
मी तर अर्धाच कविता संग्रह वाचला असेन.
मला सुरेश भट हे डिप्लोमाला असताना खूप आवडायचे. पण मग जसे काही बदल घडत गेले... माझ्या डिप्लोमा सुट्टीपासून ते आत्ताच्या टी.वाय.
पर्यंत ... हा सगळा काळ ग्रेस नी अच्छादलेला आहे.

>>>>मी कॉलेजात असताना लायब्ररीतून कवितासंग्रज घेऊन वाचायचो. त्यात ल्या आवडलेल्या कविता एका वहीत सुंदर अक्षरांत उररवून काढायचो.>>> डिट्टो. तेव्हा गुगल, विकी वगैर नव्हते. अपना हाथ जगन्नाथ. आपण आपला संग्रह करायचा.

https://www.maayboli.com/node/62167
हे आपल्या अमांनी केलेले 'भय इथले संपत नाही ' चे रसग्रहण. खूप आवडले होते म्हणून शेअर केले.
ए_श्रद्धा तुम्हाला हवे होते ना....

मायबोली सर्चमध्ये मिळालेलं वैभव जोशी यांचं लेखन किंवा त्यांच्याबद्दल
https://www.maayboli.com/search#gsc.tab=0&gsc.q=%20%E0%A4%B5%E0%A5%88%E0...

ओपन लिंक इन न्यू टॅब करत वाचा.>>>>> होय भरत, हे सगळं मी वाचलं, शोधलं, पण सगळीकडे त्यांनी बऱ्याच कविता, गझल माबोवर पोस्ट केल्याचा उल्लेख आहे. त्या त्यांच्या लेखनात दिसल्या नाहीत, एकही गझल, कविता. त्या लेखात एक ुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुु उल्लेख आढळला कि वेगळा i d पण होता त्यांचा मॅट्रिक्स कि काहीतरी.
मेट्रन होता तो आयडी, अत्ता परत तो लेख वाचला( मायबोलीचे देणे)

वैभव जोशी आणि संदीप खरे यांचा 'ईर्शाद' हा कार्यक्रम पाहिला मध्यंतरी. सुंदर आहे. वैभव जोशींच्या कविता आवडतात. ग्रेसच्या कविता मला फारशा समजत नाहीत.

ती गेली तेव्हा रिमझिम बद्दल थोडं:

ही कविता नेहमी वेगळ्याच आर्त विश्वात घेऊन जाते. कवितेची मला माहित असलेली पार्श्वभूमी म्हणजे ग्रेसच्या वडिलांनी दुसरं लग्न केलेलं, त्यांची ती सावत्र आई ग्रेसपेक्षा थोडीच मोठी होती, तिचा प्रियकर वगैरे बऱ्याच गोष्टी... तिच्या वागण्याबद्दल व्याकुळ होऊन ग्रेसनी ही कविता लिहिलेली.. हे सगळं समजल्यावर बऱ्याचदा पुलंचा नाथा कामत ग्रेसवरच बेतलेला होता की काय अशी शंका येते!

हे आज मैत्रीणीने कवी ग्रेस यांच्या काही (आवडीची वाक्य व विचार ) लिहून घेतलेल्या संग्रहापैकी.......

पळवाट नकोच आहे मला. फक्त दुःख टेकण्यापुरती थोडीशी संदिग्धता.

काळोख उजळण्यासाठी जीवाला स्वतःला जाळून घ्यावे लागते..हे खरेच आहे. म्हणजे उजळण्यासाठी जळणे आलेच. पण तेवढ्यावरून जळणारा प्रत्येकजण उजळून निघेल याची हमी मात्र देता येत नाही.

स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेने एकदा असाच बळजोरीने स्वतःच्या अंगणात लाऊन घेतला होता. जीवाला आलेले पांगळेपण हव्यासपूर्तीच्या कुबडीने सावरण्यासाठी. पण ते स्वर्गीय रोपदेखील हिरिरीने फोफावले आणि भिंतीवरून झुकून रुक्मिणीच्या अंगणात फुले ढाळू लागले. सत्यभामेचा चडफडाट झालाच पण रुक्मिणीलाही वृक्षाचे मूळ मिळाले नाही ते नाहीच. स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचे पृथःकरण करून कृष्णाने त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला आणि स्वतः मोकळा झाला. प्रेमापेक्षा प्रेमाचे प्रतीक शिरोधार्य मानले दोघींनी. कृष्णाने ते ओळखले असणार म्हणूनच त्याने या विक्रुत मत्सराचे प्रतीक अंगणात खोचून दिले.
राधेसाठी असला वृक्ष त्याने कधीच आणला नसता. कारण राधा स्वतःच तर कृष्णकळी होती.
तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिला कसे श्रुंगारणार ? तिच्या आत्मदंग बागेत प्रतीकप्राजक्त कसे काय रूजणार. कृष्णाने एक स्वर्गीय रोप लावले अन अष्टनायीकांच्याही पूर्वीची ती अल्लड पोरगी राधा हीच शेवटी कृष्णप्रीतीचे प्रतीक होऊन बसली.

तिने तिच्या वहीचे फोटो पाठवले. वीस वर्षापूर्वीचे . भरपूर आहेत पण टाईप करणे अवघड आहे. हे त्यापैकी....
ह्या क्वोट्स ने प्रताधिकार भंग होतात का ..तसे असेल तर कळवा. धन्यवाद.

"हे आपल्या अमांनी केलेले 'भय इथले संपत नाही ' चे रसग्रहण. "--> उपकार आहेत अस्मिता ताई तुमचे खरचं, नाहीतर माझ्यासारख्या नवख्याला हे जुनं लिखाण सापडण कठीणच !

https://www.youtube.com/watch?v=43jU84Ky5lQ ---> "निळाई" लिरिक्स=ग्रेस, संगीत=संकेत पुराणिक, गायक=जसराज जोशी ,
(सगळेच जोशी भलतेच टॅलेन्टेड असतात का काय की... Wink )

मी ग्रेसच्या ब-याच कविता एकत्र केल्या आहेत..लिंक इथे आहे..बाकी, ग्रेस मला संध्याकाळ आणि रात्रीतला अपूर्ण वेळ वगरे वाटतो..प्रत्येक कविता अपूर्ण तरीही तितकीच पूर्ण.. हुरहूर लाऊन जाणारी...

http://rasiinwords.blogspot.com/

या माझ्या काही खूप आवडत्या कविता:
भूल
प्रकाश गळतो हळू हळू कि; चंद्र जसा उगवे
पाण्यावरती उमटत जाती अंधुक अंधुक दिवे
दूर सनातन वृक्षांना ये हिरवट गंध मुका
दु:ख सुरांच्या क्षितिजापाशी मेघ दिसे परका
हिमनगरातील बर्फ धुळीचे उत्सव भरले नवे
धुक्यात तुटल्या शिखरांवरती पक्ष्यांचे हे थवे
मंदीर मंदीर पाणी पाणी शिल्प कुठे वितळे
दु:खाच्या तंद्रीतून जैसे अमृत ठिबकत निळे
माझ्या हातून मूठभर माती अवकाशावर पडे
घराघरांना मरण फुलांची गंधित भूल जडे

2. 'आठवण'....
"या व्याकुळ संध्यासमयी
शब्दांचा जीव वितळतो .
डोळ्यात कुणाच्या क्षितिजे ..
मी अपुले हात उजळतो .
तू आठवणीतून माझ्या
कधी रंगीत वाट पसरशी,
अंधार व्रताची समई
कधी असते माझ्यापाशी ...
पदराला बांधून स्वप्ने
तू एकट संध्यासमयी
तुकयाचा हातांमधला
मी अभंग उचलून घेई ...
तू मला कुशीला घ्यावे
अंधार हळू ढवळावा ..
सन्यस्त सुखाचा कांठी
वळीवाचा पाउस यावा !"

3. निळ्या पाखरांची निळी पाउले
निळ्या पाखरांची निळी पाउले
असे रंग आणि ढगांच्या किनारी
निळे ऊन लागे मला साजणी
निळे घाटमाथे निळ्या राउळांचे
निळाईत माझी भिजे पापणी
निळ्याशार मंदार पाउलवाटा
धुक्याची निळी भूल लागे कुणा
तुला प्रार्थनांचे किती अर्घ्य वाहू
निळ्या अस्तकालीन नारायणा
निळे गार वारे जळाची शिराणी
निळ्या चंद्रओवीत संध्या डुले
निळे दुःख चोचीत घेउन आली
निळ्या पाखरांची निळी पाउले

4 शब्दांनी हरवुन जावे
शब्दांनी हरवुन जावे
क्षितिजांची मिटता ओळ
मी सांजफुलांची वेळ
वृक्षांच्या कलत्या छाया
पाण्यावर चंद्रखुणांची
मी निळीसावळी वेल
गात्रांचे शिल्प निराळे
स्पर्शाचा तुटला गजरा
मी गतजन्मीची भूल
तू बावरलेला वारा
पायांत धुळीचे लोळ
मी भातुकलीचा खेळ.

5. मंदिरे सुनी सुनी
मंदिरे सुनी सुनी
मंदिरे सुनी सुनी
कुठे न दीप काजवा
मेघवाहि श्रावणात
ये सुगंधी गारवा
रात्र सुर पेरुनी
अशी हळू हळू भरे
समोरच्या धुक्यातली
उठून चालली घरे
गळ्यात शब्द गोठले
अशांतता दिसे घनी
दु:ख बांधुनी असे
क्षितीज झाकिले कुणी?
एकदाच व्याकुळा
प्रतिध्वनित हाक दे
देह कोसळून हा
नदीत मुक्त वाहु दे..

6.तुला पाहिले मी नदीच्या किनारी-
‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे
इथे दाट छायांतुनी रंग गळतात
या वृक्षमाळेतले सावळे !
तुझी पावले गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली
निळागर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन्‌ तुला सावली
मनावेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे का उभी तू, तुझे दुःख झरते ?
जसे संचिताचे ऋतु कोवळे
अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुडा

7.कंठात दिशांचे हार
कंठात दिशांचे हार निळा अभिसार वेळूच्या रानी
झाडीत दडे देऊळ गडे येतसे जिथून मुलतानी.
लागली दरीला ओढ कुणाची गाढ पाखरे जाती
आभाळ चिंब चोचीत बिंब पाउस जसा तुजभवती.
गाईंचे दुडुदुडु पाय डोंगरी जाय पुन्हा हा माळ
डोळ्यांत सांज वक्षांत झांज गुंफिते दिव्यांची माळ.
मातीस लागले वेड अंगणी झाड एक चाफ्याचे
वाऱ्यात भरे पदरात शिरे अंधारकृष्ण रंगाचे.
मेघांत अडकले रंग कुणाचा संग मिळविती पेशी ?
चढशील वाट ? रक्तात घाट पलिकडे चंद्र अविनाशी

8.
ग्रेस यांचा अरण्यातला आणखी एक प्रवास - श्रीनिवास हवालदार
“अरण्यात एका प्रवासात माझ्या
हिवाळ्यात घोडा जरा वाकला ,
मी पापणीतूनही स्निग्ध तेजांध
डोळ्यांत चंद्रास्तही झाकला.
अता पाहण्याला मुळी अंत नाही
तुझ्या पैंजणी नादनक्षी पुढे;
पारावरी पेटलेल्या चितेतून
ये चांदणी शुभ्र बर्फाकडे ...
भयाने मला भारते अंतवेळा
जशी सांध्यसत्वातली स्वप्नजा;
त्या आत्मजेनेच तोडून नेल्या
तुझ्या सावलीतून माझ्या भुजा...”
- ग्रेस

Pages