"ग्रेस"
मी मुळात मायबोलीवर आलो ते वैभव जोशीचा इंटरव्ह्यु बघून! स्पृहा जोशीच्या 'खजिना' मध्ये तो भरभरून बोलला 'मायबोली' बद्द्ल.
दुसर्याच दिवशी मायबोली जॉइन केलं. त्याने त्या दीड पावणेदोन तासांच्या गप्पांमध्ये कविता, गझल, बकीचे कवी जसं की बालकवी, ग्रेस इ. याबद्द्ल जे काही बोललयं त्याला तोड नाही. खाली खाली त्याची लिंक देतोय. ज्यांंना बघावं वाटेल त्यांनी बघावं!!
https://www.youtube.com/watch?v=Jpm_u4JbqUc
मी डिप्लोमाच्या सेकंड इअर ला असताना वैभव जोशी ची 'कधी तरी' नावाची गझल ऐकली. फाउंटन ची संगीत नाटके शोधत होतो युट्युब वर सो याच्या गझलांच्या सी.डी. च आणि संगीत नाटकांच प्रॉडक्शन लेबल एकच होतं. मी ती गझल ऐकली चांगली चार दिवस सलग ऐकली. आणि त्याला पाचव्या दिवशी फेसबुक वर 'फ्रेंड रिक्वेस्ट' सेंड केली. दुसर्या दिवशीच अॅक्सेप्ट झाली. मी भरून पावलो होतो.
काही दिवसांंनी घरात विषय निघाला वैभव जोशीचा माझ्यामुळेच बहुतेक!!
आई कडून मला कळालं की वैभव जोशी मुळात सोलापूरचा आहे. आईच्या श्रीराम सोसायटीच्या शेजारच्या उजनी कॉलनीतच रहायचा. आणि आई जिथे प्रोग्रॅमिंग शिकवायची (सुहास मॅडम च सुयश इन्स्टिट्युट) तिथेच तो नोकरीला होता काही काळासाठी.
त्याच्याशी फेसबुक वर थोडं फार बोललो दोनदाच बोललो. त्या खजिना कार्यक्रमानंंतर त्याला फेसबुकवर एक पत्र (पी.डी.एफ. फॉर्म मध्ये) टाकून फेसबुक डीअॅक्टिव्हेट करून मायबोलीवर आलो.
या पुर्वार्धाबद्द्ल क्षमस्व!!
जेव्हा खजिना मध्ये ग्रेस विषयी बोलला आणि त्याच्या काही फेसबुक पोस्ट मध्ये ग्रेस बद्द्ल लिहीलेलं मी जे वाचलं होतं.
त्यावरून मी देखील एक शब्दांजली वाहिली होती युअरकोट डॉट कॉम वरती ग्रेस ला जी खाली लिहीली आहे. ( वेभव जोशी ने एक शब्दांजली वाहीली आहे त्याच्या फेसबुक वर मग मी ही प्रयत्न केला. आणि प्रामाणिकपणे सांगतो 'शब्दांजली' हा प्रकार वैभव जोशी मुळे कळाला.)
वाहता वारा थांबत नाही
धरलेला हात सोडवत नाही
काळाचं आभाळ पोकळ नाही
"भय इथले संंपत नाही"
फिटली आस पुन्हा लागते
मिळाली वेळ आपुली नसते
गिळली तहान जळ देते
"मज तुझी आठवण येते"
ग्रेस मी पहिल्यांदा ऐकला तो सातवी आठवीत आकाशवाणी वर त्याच्या 'भय इथले संपत नाही' या गाण्यातून आणि दुसर्यांदा 'ती गेली तेव्हा' यातून ऐकला. तेव्हा फारसंं कळत नव्हतंं पण ऐकून आत कसंंसच झालं. मी अजुनही ग्रेस पुर्ण काय पण एक टक्का ही वाचलेला नाहीये मी मान्य करतो. आणि माझंं अस मत आहे की तुम्ही ग्रेस एक टक्का ऐका नाहीतर शंभर टक्के , मायक्रो , पिको, नॅनो मध्ये ऐका (अर्थात एखादीच कविता वाचलेले , त्यातिल एखादच कडवं वाचलेले आणि दोन ओळी वाचलेले हे त्या मायक्रो, पिको,नॅनो कॅटेगिरीत येतील) ग्रेस तेवढाच पोळतो, तेवढाच अस्वस्थ करतो!!
मी मध्यंंतरी ग्रेसला शब्द्श: ऐकण्यासाठी युट्युब वर आणि अख्या गुगल वर बरच सर्फिंग केलंं. मला फारसंं काही मिळालं नाही. एकंदरीत ग्रेस फारच थोड्या प्रमाणात अॅव्हेलेबल आहे. मी 'नक्षत्रांचे देणे' या 2009 साली (कदाचित) सुरू झालेल्या कार्यक्रमाचा भाग पाहीला.
त्यात फक्त ग्रेसच शब्द्श: बोललाय! आणि मी प्रांजळपणे मान्य करतो मी ग्रेसचा आवाज लहानपणी ऐकलेला असला तरी अत्ता अत्ता मला आवाज कळायला लागलाय!!
https://www.youtube.com/watch?v=jYb_GGUhzdQ&t=20s ---> नक्षत्रांचे देणे (इपी-1)
माझी अशी एक निर्मळ इच्छा आहे की या कोरोनाच्या पडीक काळात ग्रेस विषयी मायबोली वर वाचायला मिळावं. ग्रेस बद्द्ल जाणून घ्यायला मिळावं.
मी नवीन आहे. मला माहीत नाही ग्रुप, धागे यातला फरक. पण तुमच्या पैकी कोणीतरी फक्त 'ग्रेस' विषयी बोलण्यासाठी किंवा ग्रेसच्या कविता समजून सांगण्यासाठी एखादा ग्रुप अथवा धागा तयार करू शकेल का?
किंवा हाच धागा ग्रेस 'ग्रेस' विषयी बोलण्यासाठी किंवा ग्रेसच्या कविता समजून सांगण्यासाठी वापरता येऊ शकतो क?
ग्रेस कितीही वाचला तरी अनाकलनीय आहे मान्य! निदान वाचायला तरी मिळो देवा!!
आज ग्रेस ची जयंती नाही अथवा पुण्यतिथीही नाही!
मुळात ग्रेस ही एक आठवण आहे जिची साठवण करण्यासाठी मन उचंंबळून येत असतं.
टीप: वैभव जोशी आणि ग्रेस या दोघांंचा अख्ख्या लेखनभर एकेरी उल्लेख केला कारण ....
वैभव जोशी --> माझ्यासाठी देव आहे कविता, गझला, गाणी यातील!
ग्रेस --> या सगळ्या कवींची आई होतो. आपल्या प्रत्येक कवितेतून, मुळात जे कवी आहेत या सगळ्या बाळांना सावरण्यासाठी पावलो पावली ओघळतो...काळाची कल्पना देत ओघळतो!!
खूप खूप धन्यवाद शशांक पुरंदरे
खूप खूप धन्यवाद शशांक पुरंदरे आणि माऊ __/\__
इथे कॉपी पेस्ट करून नका.
इथे कॉपी पेस्ट करून नका.
प्रताधिकाराचं भान ठेवा
इथे कॉपी पेस्ट करून नका.
इथे कॉपी पेस्ट करून नका.
प्रताधिकाराचं भान ठेवा >>+१
बाकी लेख वाचून थोडा हेवा वाटला! पहिल्यांदा ग्रेस यांच्या कविता वाचल्या आणि जे भारावून जायला झालं ते आठवलं. चंद्रमाधवीचे प्रदेश मधल्या बऱ्याच कविता वहीत उतरवून काढल्या होत्या. त्यांचे गद्य साहित्य वाचलेले नाही पण कवितांमध्ये उत्कट आनंद आणि अनाकलनीय हुरहुर असे दोन्ही टोकाचे भावानुभव देण्याची शक्ती आहे. आता starry eyed वाटणं कमी झालंय पण आता ग्रेस यांची कविता अधिक आत पोचते असं वाटतं.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/33820
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=TLe6NVDtYkM&list=PL4wlZ5aqjUcW1gX00THNES...
ग्रेसच्या कवितेचा अन्वयार्थ ऐकण्यासाठी, मराठी अस्मिता कल्चरल फाऊंडेशन च्या
ह्या Youtube चॅनेल वरच्या‘संन्यस्त सुखाचा काठ’ ही मालिका नक्की ऐका.
Dhanyavad दोघांना __/\__
Dhanyavad दोघांना __/\__
जुन्या हितगुज वर आहेत की वैभव
जुन्या हितगुज वर आहेत की वैभव च्या कविता अजून. दुसरेच काही शोधताना गुलमोहोर मधे दिसल्या मला २-३ तरी. Vaibhav_joshi असा आयडी होता ना. काय प्रगल्भ, एवढे फॅन म्हणवता तर घ्या की जरा कष्ट
कविवर्य ग्रेस म्हणतात " मी एक
कविवर्य ग्रेस म्हणतात " मी एक प्राचीन काव्य पुरुष आहे ."I am an ancient man belonging to your modern time."त्यामुळे एकाच वेळेला प्राचीन सभ्यता आणि प्राचीन अविष्कार शैली यांचा मिलाफ आधुनिक काव्यशैलीशी झाला आहे 'भय इथले संपत नाही' .या कवितेत आईचा उल्लेख कोठेच नाही परंतु पूर्ण कविता व त्यातील संदर्भ समजल्यावर हे स्पष्ट होते की कवितेचा संबंध प्रेयसीशी नसून आईशी आहे. या कवितेत कवीचा कल अध्यात्माकडे वळलेला वाटतो.या कवितेत आदिकवी वाल्मिकी डोकावलेले आहेत.
"भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...
ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला
स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे"
भय हा कवीचा ,किबहुना जागाच स्थायी भाव आहे. जगातील दैनंदिन घटनांमुळे उत्पन्न होणारे निरंतर भय संपत नाही परंतु संध्याकाळच्या शांत वातावरणात आईने त्यास बालपणात शिकवलेली गीते गायल्यानंतर त्याला मनःशांती लाभते.बालपणी आई बरोबर वनात घालवलेली एक दुपार व नंतरची संध्याकाळ कवीस आठवते. दिवसाच्या उन्हात वनात झर्यांच्या जवळ विसावणे शक्य नव्हते .ते झरे रात्रीसाठी प्रेमी युगलांकरता चंद्राने राखून ठेवले आहेत. त्याची शीतलता कदाचित चंद्र उगवल्या नंतरच जाणवते . दुपारी आई व मुलाला झोपण्यासाठी मिळालेले स्थळ म्हणजे ईश्वराच्या मायेने उत्पन्न झालेलेली भूमाता व त्यावर उगवलेले वृक्ष. त्या दिवशीची आठवण आता जेह्वा येते तेन्ह्वा असे वाटते की झाडाखाली झोपणे व उठणे या विधीनिर्मित जीवन आणि मृत्यू या निरंतर चक्राचाच एक भाग असावा. हे चक्र असेच चालणार आहे.त्या दिवशी संध्याकाळी वृक्ष्याच्या खाली बसून आईने हळुवारपणे म्हटलेले रामरक्षा स्तोत्र अजून ही त्याच्या स्मरणात आहे. त्या वेळचे आईचे मंद व हळुवार बोल कवीच्या संपूर्ण आयुष्या साठी इतके प्रभावी झाले जसे वनवासाच्या वेळी सीतेस रामाचे स्मरण झाले असेल.रामरक्षा स्रोत्रात शिरापासून पायापर्यंतच्या सर्व इंद्रियांचे रक्षण करण्याची प्रार्थना आहे पण सर्व मानव जाती कुठल्या न कुठल्या दुक्खाने पीडित आहे. ती प्रार्थना कोणासाठी होती ?त्या दिवशीची आई ची स्मृती अजूनही चांदण्याच्या मंद व शीतल प्रकाशाप्रमाणे कवीच्या मनात बिम्बलेली आहे.
[माझ्या 'ग्रेसच्या कविता धुक्यातून प्रकाशाकडे' या पुस्तकातून]
झाड याचा अर्थ वेगळा असावा.
माउ, तुमच्या ब्लॉगवर तुमची,
माउ, तुमच्या ब्लॉगवर तुमची, 'चांदणचुरा' कविता वाचली. आवडली.
“अरण्यात एका प्रवासात माझ्या
“अरण्यात एका प्रवासात माझ्या
हिवाळ्यात घोडा जरा वाकला ,
मी पापणीतूनही स्निग्ध तेजांध
डोळ्यांत चंद्रास्तही झाकला.
अता पाहण्याला मुळी अंत नाही
तुझ्या पैंजणी नादनक्षी पुढे;
...
पारावरी पेटलेल्या चितेतून
ये चांदणी शुभ्र बर्फाकडे ...
भयाने मला भारते अंतवेळा
जशी सांध्यसत्वातली स्वप्नजा;
त्या आत्मजेनेच तोडून नेल्या
तुझ्या सावलीतून माझ्या भुजा...”
- ग्रेस
माझ्या जीवनातल्या नैराश्यपूर्ण प्रवासात एके दिवशी हिवाळ्याच्या दिवसात घोडा वाहन असलेल्या सूर्याचे प्रखर तेज कसे असते हे मी थोडेसे बघितले आणि सहनही केले आहे आणि रात्रीच्या अंतिम प्रहरात अस्त होणाऱ्या चंद्राचा प्रकाश ही मी अर्धोन्मीलित डोळ्याने बघितला आहे पण डोळे झाकून घेतले कारण तो प्रकाशही मला सहन झाला नाही. पण आता मी दैनंदिन घडणाऱ्या घटनांमुळे काहीपण बघू शकतो. इतकेच काय तर तुझ्या निर्मिलेल्या सृष्टी पुढेही बघू शकतो .चितेतून निघणार्या अग्निशलाका चांदण्या होऊन शांती प्राप्त होण्यासाठी शुभ्र बर्फाकडे जात आहेत असे मी बघत आहे. मला मृत्यू चे भय वाटते पण ते भय सन्ध्याकाळी पडणार्या एखाद्या स्वप्नाप्रमाणे खोटे आहे.ते भय स्वनिर्मित आहे पण त्याने मला शक्तिहीन करून टाकले असून तुझ्यापासून दूर केले आहे..
[ माझ्या 'ग्रेसच्या कविता धुक्यातून प्रकाशाकडे - पूर्वार्ध ' या पुस्तकातून ]
वाह!!! धागा व प्रतिसाद फार
वाह!!! धागा व प्रतिसाद फार मस्त.
धागा व प्रतिसाद छान !
धागा व प्रतिसाद छान !
Pages