लेख

फेसबुक आणि खोटा चेहरा... कदाचित तुमचाही!

Submitted by मोहना on 7 June, 2011 - 21:01

"त्या मुलांनी हे का केलं ते मला कदाचित कधीच कळणार नाही. अश्लिल, हादरवून सोडणारं आणि चांगल्या गोष्टीवरचा विश्वास समुळ नष्ट करणारं. माझ्या वाट्याला आलं ते, फसवं फेसबुक खातं बंद करता येत नाही यातून आलेली निराशा, दु:ख, राग, वैताग आणि क्षणा क्षणाला नष्ट होत जाणारा आत्मविश्वास." ही कहाणी, शब्द सुझनचे. पण हे फेसबुक किंवा कोणत्याही आंतरजालावर (सोशल नेटवर्किंग) असणार्‍या कुणाच्याही बाबतीत घडू शकतं. तेव्हा सावधान. सुझनची गोष्ट ही माझी किंवा अगदी तुमचीही होवू शकते.

गुलमोहर: 

राष्ट्रपतींचा निर्णय -

Submitted by विदेश on 24 May, 2011 - 14:45

राष्ट्रपतींचा निर्णय लांबल्यास फाशीऐवजी जन्मठेप द्यावी?

वर्तमानपत्रातील वरील शीर्षकाच्या बातमीने चांगलेच लक्ष वेधून घेतले ! पंजाबमधील फाशीची शिक्षा झालेल्या दहशतवादी भुल्लर याने राष्ट्रपतींकडे 'साडेसात वर्षांपूर्वी ' दयेचा अर्ज केलेला आहे. बिचा-याची (!) तब्येत , दहा वर्षांहून अधिक काळ तुरुंगातच असल्याने, ठीक नाही. त्यामुळे ' आपल्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत व्हावे ' , अशी मागणी करणा-या भुल्लरच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला नोटीस बजावली आहे!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

भलताच क्लायमॅक्स आणि नाटक

Submitted by विनायक_पंडित on 25 January, 2011 - 11:00

भलताच क्लायमॅक्स माझ्या आयुष्यात आला! माझी आई आता काही दिवसांचीच सोबती आहे हा विचार गिधाडासारखा माझ्या मानगुटीवर स्वार झाला.माझं काय? आईवरच्या जबाबदार्‍या आता माझ्यावर आल्या, त्या कशा निभावू? अनेक ताण ठाण मांडून बसले.मी काय काय करणार होतो? माझ्या हातात किती गोष्टी आहेत? मी स्वत:विषयीच्या अवाजवी सहानुभूतीमधे गुंतवून घेऊ लागलोय स्वत:ला? अनेक विचार तेव्हा आणि नंतर कितीतरी काळ माझ्या मनाचा कब्जा घेऊन बसले.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सोसायटीचा आदर्श

Submitted by रणजित चितळे on 21 November, 2010 - 23:48

आदर्श सोसायटी च्या घोटाळ्यावर भरपुर सध्या लिहुन येत आहे. आज पर्यंत मला स्वतःला आभिमान होता की सैन्य हे सरकारी लाचखोर व पैसाचोरी ह्या पासुन ब-यापैकी दुर आहे. आज तो कमी झाला.

गुलमोहर: 

$१५० पेक्षा कमी भांडवलात सुरु झालेले यशस्वी उद्योग

Submitted by अजय on 8 October, 2010 - 22:02

आजच्या Wall Street Journal मधे १५० डॉलरपेक्षा कमी भांडवलात सुरु केलेल्या उद्योगांबद्दल (आणि त्याच्या उद्योजकांबद्दल) एक स्फूर्तीदायक लेख आहे.

जे उद्योग consulting प्रकारात मोडतात त्यांचा यात मुद्दाम समावेश नाही. आणि ज्या उद्योगातून उद्योजकाला पोटापाण्यासाठी नफ्यावर अवलंबून राहता येईल असेच उद्योग यात निवडले आहेत.

यातला Food Tour Operator चा उद्योग कुणी सुरु केला तर मी ग्राहक व्हायला एका पायावर तयार आहे. !
http://online.wsj.com/article/SB1000142405274870372050457537666428551093...

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लेख