लोकशाहीत प्रत्येक मताची किंमत एकसमान असणे चूक की बरोबर !
मायबोलीवर एका धाग्यात लोकशाहीवर रडतखडत चर्चा चालू आहे. तेथील पोस्ट वाचता वाचता अचानक एक बालपणीचा किस्सा आठवला आणि एक प्रश्न पडला.
मायबोलीवर एका धाग्यात लोकशाहीवर रडतखडत चर्चा चालू आहे. तेथील पोस्ट वाचता वाचता अचानक एक बालपणीचा किस्सा आठवला आणि एक प्रश्न पडला.
जन लोकपाल हे विधेयक संसदेत आणण्यासाठी अण्णा हजारे ह्यांच्या आमरण उपोषणा बद्दल लोकांकडून व सरकार कडून बरेच प्रश्न विचारले जात आहेत. प्रामुख्याने त्यातले काही प्रश्न असे आहेत.
अ) जन लोकपाल किंवा लोकपाल विधेयक आणल्याने भारतातला भ्रष्टाचार संपणार नाही.
ब) अण्णा हजारे ह्यांचे आमरण उपोषण हे असंविधानिक आहे व पुढे हेच उदाहरण घेऊन बाकीची लोकं सरकारला वेठीस धरू लागतील.
क) जन लोकपाल विधेयक लागू करण्यालायक नाही. त्यातल्या तरतुदी लोकशाहीच्या तत्त्वांविरुद्ध आहेत.
ड) विधेयक संसदेत आणायला व ते पारित होण्यास वेळ लागतो. अण्णा हजारेंची मागणी अवास्तव आहे.
पुण्याच्या पीएमटी बस मध्ये जेव्हा मी प्रवास करतो तेव्हा खिडकीवर जागे जागेवर लिहिलेल्या एका सूचनेकडे माझे लक्ष वेधले जाते. ‘पुढे सरकत राहा’ अशी सूचना दोन्ही कडच्या बाकांमध्ये उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लिहिलेली असते. ही सूचना मागच्या दारातून येणाऱ्या प्रवाशांना उभे राहायला जागा मिळावी व, पुढच्या दारातून उतरणाऱ्या प्रवाशांना उतरण्याची सुविधा व्हावी अशा साठी असते.
ह्या एका वाक्याने माझ्या विचारांची गाडी बस सुरू होण्या अगोदरच सुरू होते. आपल्या आयुष्या साठी हे वाक्य किती सूचक आहे. वेगवेगळ्या पातळीवरून बघितले तर त्यातून केवढा बोध मिळतो.
आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमची आई रोज दुपारी आम्हाला रेल्वेलाइन जवळच्या गणपतीच्या देवळात घेऊन जायची. कधी तिथे कीर्तन चाललेले असायचे ते ऐकायला बसायचो, कधी प्रवचन चाललेले असायचे त्याला जायचो. कीर्तन दोन भागात असायचे पाहिल्या भागात भागवतातली एक कथा किंवा पुराणातली एखादी घटना भजनांबरोबर कीर्तनकार सांगायचे. मजा यायची. दुसऱ्या भागात सांगितलेल्या कथेचा मथितार्थ सांगायचे. हा भाग जरा गंभीर असायचा व सुरवातीला कंटाळा यायचा पण वय वाढल्यावर आवडायला लागला. कथेचे सार दुसऱ्याच भागात असते हे कळले. प्रवचनेचे विषय जरा गंभीर असायचे.
हनुमानाचा शाप व त्यावर उतारा – भाग १
हनुमानाचा शाप व त्यावर उतारा – भाग २
हनुमानाचा शाप व त्यावर उतारा – भाग ३
हनुमानाला मिळालेला शाप व त्यावर उतारा – भाग ४ (अंतिम)
आदर्श सोसायटी च्या घोटाळ्यावर भरपुर सध्या लिहुन येत आहे. आज पर्यंत मला स्वतःला आभिमान होता की सैन्य हे सरकारी लाचखोर व पैसाचोरी ह्या पासुन ब-यापैकी दुर आहे. आज तो कमी झाला.
२१ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे अरुंधती रॉय व त्यांच्या मानवी हक्क
जपणा-या मित्रपरीवारांनी (श्री वरावर राव व बाकीचे माओईस्ट मित्र) एक सभा बोलावली होती. ह्या सभेत हुरीयत पुढारी व काश्मीर तोडायला बसलेले श्री सय्यद अली शहा गीलानी हे बोलले. ह्या सभेचा विषय होता– काश्मीरला आझादी – एकच पर्याय. सभा - कमीटी फॉर द रिलीज ऑफ पोलिटीकल प्रिझनर्स ने बोलावली होती. (हे वृत्त द हिंदु ह्या २२ ऑक्टोबरच्या वृत्तपत्रात छापुन आले आहे.) महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सभेतुन अरुंधती रॉय व तीच्या मित्रांनी ह्या काश्मीर तोडु लोकांना त्यांच्या आझादीच्या भारताच्या विरुद्धच्या लढाईत पाठींबा जाहीर केला आहे.