मायबोलीवर एका धाग्यात लोकशाहीवर रडतखडत चर्चा चालू आहे. तेथील पोस्ट वाचता वाचता अचानक एक बालपणीचा किस्सा आठवला आणि एक प्रश्न पडला.
बालपणीचा किस्सा म्हणजे अगदी अर्ध्या हाल्फ पॅण्टमधील नाही, तर कॉलेजला होतो मी तेव्हा. मुंबईतल्या, नव्हे महाराष्ट्रातल्या क्रमांक एकच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेत होतो याचा अहंकार होता मला. एकदा असेच बसस्टॉपवर रिक्षाची वाट बघत उभा होतो. महानगरपालिकेच्या निवडणूकांचा काळ होता. उमेदवार प्रचाराला फिरत होते. विभागातील एक नगरसेवकाचा उमेदवार ज्याला मी आजवर नेहमी चारचाकी गाडीतून ऐटीत फिरताना पाहिले होते तो पायी फिरून प्रचार करत होता. चालता चालता तो रस्ता थोडा वाकडा करून माझ्यापाशी आला. मोठ्या आदरप्रेमाने माझ्याशी हस्तालोंदन करत माझ्या शिक्षणाची जुजबी चौकशी केली आणि माझे मत मी त्यालाच देणार याचे आश्वासन घेऊन हसत निघून गेला. मला अगदी मतदार राजा असल्यासारखे वाटले. अंगातील सुप्त अहंकार सुखावला. पण काही वेळच. पुढच्याच मिनिटाला तो दुखावला, जेव्हा तो नेता त्याच आदरप्रेमाने शेजारच्या चहाच्या टपरीवर काम करणार्या पोराशीही तितक्याच लाडाकोडाने वागला जसे की माझ्याशी.. म्हणजे माझ्यासारख्या भावी ईंजिनीअरमध्ये आणि एखाद्या चहावाल्यामध्ये काहीही फरक नव्हता? आमच्या दोघांची किंमत त्याच्या लेखी एकच होती? हो, तसेच होते. कारण त्याच्यासाठी आमच्या दोघांच्याही मताची किंमत एकसमानच होती.
आपण ईंजिनीअर म्हणजे एका चहावाल्या पोरापेक्षा काही भारी या अहंकाराच्या फेजमधून बाहेर पडून आता बराच काळ लोटला आहे. मात्र तो एक प्रश्न आजही सतावतो. लोकशाहीत प्रत्येक नागरीकाच्या मताची किंमत एकसमान असणे चूक कि बरोबर?
म्हणजे बघा हं,
एखादा पोस्ट ग्रॅज्युएट, एखादा दहावी नापास, एखादा चौथीतच शाळा सोडलेला, आणि एखादा कधी शाळेचेही तोंड न बघितलेला यांना योग्य अयोग्य सरकार निवडायची समान जाण असू शकेल का?
सुशिक्षित लोकांमध्येही एखादा नागरीकशास्त्रात पैकीच्या पैकी गुण मिळवणारा आणि त्या विषयात काठावर पास होणारा यांच्या अकलेत काहीच फरक नाही का?
चला एखादा माझ्यासारखा सुशिक्षित असेल आणि नागरीकशास्त्रातही रट्टा मारून पास झाला असेल पण चालू घडामोडींची माहीती शून्य असेल तर माझ्या आणि येथील राजकारणाच्या धाग्यावर हक्काने लिहीणारया दिग्गजांच्या मताची किंमत एकसमान असावी का?
एखादी अभ्यासू व्यक्ती आणि एखादी व्हॉटसपवर ग्यान मिळवणारी व्यक्ती यांच्या मतात काहीही फरक असू नये?
एखादा उद्योगपती जो मोठाली कंपनी चालवतो आणि त्या कंपनीत काम करणारा एक तळाचा कर्मचारी या दोघांमध्ये देश कोण चांगल्या प्रकारे चालवू शकते हे ओळखायची अक्कल कोणात जास्त असेल?
नक्कीच समसमान नसेल
मग नक्की कुठल्या निकषावर प्रत्येक मताची किंमत एकच असते.
एक व्यवहारातले उदाहरण घेऊया, समजा जर उद्या मी रस्त्यात चक्कर येऊन पडलो आणि मला दहा लोकांनी सल्ले दिले, त्यातील सात लोकांनी एक सल्ला दिला तर तीन लोकांनी त्याविरुद्ध सल्ला दिला, तर कदाचित मी सात लोकांचे बरोबर मानून तेच करेन.
पण जर मला समजले की त्या तीन लोकांमध्ये दोन डॉक्टर आहेत तर मी कोणाचा सल्ला ऐकेन?
भावना पोहोचल्या असतीलच. आता तुम्ही म्हणाल, बर्रं मग यावर उपाय काय? तर तो मलाही माहीत नाही, की असा काय निकष लाऊन प्रत्येकाच्या मताला वेगवेगळे वेटेज देता येईल.
पण मग याला लोकशाहीतील त्रुटी समजावी का?
मलापण एक प्रश्न पडला.
मलापण एक प्रश्न पडला. महाराष्ट्रातले क्रमांक एकचे अभियांत्रिकी महाविद्यालय कुठले आहे?
Britishanni he Africa madhye
Britishanni he Africa madhye khuup purwi kele hote. Sadhyachya kaalaat te outdated samajle jaate
अतुलजी, कॅन यू प्लीज ईलॅबोरेट
अतुलजी, कॅन यू प्लीज ईलॅबोरेट? काय केले होते?
अमेरिकेत इलेक्टोरल कॉलेजची
अमेरिकेत इलेक्टोरल कॉलेजची स्थापना कशी व का केली ते वाचा. गूगल वर, विकी वर सापडेल.
पण गेल्या काही वर्षात त्या पद्धतीत अत्यंत स्वार्थी लोकांनी बदल करून आता त्याच्या मागच्या उच्च हेतूचे वाट्टोळे केले आहे. त्यामुळे त्या पद्धतीबद्दल आता शंका सुरु झाल्या आहेत.
जशी भारताची संस्कृति, तत्वज्ञान उच्च आहे (तत्वज्ञान आता कुणाला कळत नाही, नि संस्कृति केंव्हाच नष्ट झाली) .
म्हणजे कुठलीहि चांगली गोष्ट घेऊन स्वार्थी लोक त्या चा दुरुपयोग कसा करतात ते कळेल.
<< ओळखायची अक्कल कोणात जास्त
<< ओळखायची अक्कल कोणात जास्त असेल?>>
अरे देवा!! आता कुणाची अक्कल जास्त हे कसे ठरवायचे?
मायबोलीवर तर आलटून पालटून सर्वांच्याच अकलेबद्दल शंका येतात लोकांना!
नि उद्या फक्त इंजिनियर लोकांनी मतदान करायचे म्हणालात तर परवा अधिक अक्कल असलेल्या इंजिनियरांनीच मतदान करावे असे म्हणाल. मग हे असे करत मतदारांची संख्या कमी करत राहिलात नि शेवटी दोनच मतदार उरले नि त्यांचे एकमत झाले नाही, तर एक दिवस एखादा बलदंड, अशिक्षित गुंड माणूस हातात सोटा घेऊन सर्वांच्या टाळक्यात हाणेल नि म्हणेल गप्प बसा, आजपासून मी राजा!!
<<<<एखादा उद्योगपती जो मोठाली
<<<<एखादा उद्योगपती जो मोठाली कंपनी चालवतो आणि त्या कंपनीत काम करणारा एक तळाचा कर्मचारी या दोघांमध्ये देश कोण चांगल्या प्रकारे चालवू शकते हे ओळखायची अक्कल कोणात जास्त असेल?>>>
अहो सध्या हेच चालू आहे सगळीकडे!! मोठाली कंपनी चालवणारे उद्योगपतीच ठरवतात कोण निवडून येणार नि तो काय करणार!! काही काही देशांत गुंडगिरीचा उद्योग करणार्यांचे दादा लोक पण यात सहभागी असतात.
म्हणजे कसे, अक्कल नि सामर्थ्य दोन्ही पारखू शकणारे लोकच राज्य करतील.
लोकशाहित धनदांडग्यांनी किंवा
लोकशाहित धनदांडग्यांनी किंवा बहुमत असणार्यांनी दुर्बळांना/अल्पसंख्यांकांना वेठिस धरु (टेक'म फॉर ए राइड) नये याकरता इलेक्टोरल कॉलेज हि ब्रिल्यंट संकल्पना जन्मलेली आहे. आता काय झालंय, तुम्ही कितिहि टाइट प्रोसेस बनवा, त्यात लूपहोल्स शोधणारे निपजतातंच; त्याला नाईलाज आहे. बट दीज लूपहोल्स आर नॉट बिग इनफ टु शन इलेक्टोरल कॉलेज...
एखादा पोस्ट ग्रॅज्युएट, एखादा
एखादा पोस्ट ग्रॅज्युएट, एखादा दहावी नापास, एखादा चौथीतच शाळा सोडलेला, आणि एखादा कधी शाळेचेही तोंड न बघितलेला यांना योग्य अयोग्य सरकार निवडायची समान जाण असू शकेल का?>>>>
शिक्षण घेतल्याचे सर्टिफिकेट हातात असलेले लोकच शहाणे असतात हा ह्याच लोकांनी बाळगलेला भ्रम कधी बरे दूर होणार??
ऋन्मेष उद्या तुमच्या पेक्षा
ऋन्मेष उद्या तुमच्या पेक्षा एखादा हुशार किंवा शक्तिवान माणूस येऊन म्हणेल माझ्या मताला जास्त किंमत हवी. तेंव्हा या देशावर सर्वांचा समान हक्क आणि देशाप्रती सर्वांची समान कर्तव्ये अश्या मूलभूत सिद्धांतावर लोकशाही चालते. पण ऑर्वेल म्हणतो तसं लोकशाही मध्ये सगळे समान आहेत पण काहीजण जास्त समान आहेत. बाकी लोकशाही विसाव्या शतकातील संकल्पना आहे. त्यानंतर बराच काही बदलले आहे. सध्या तरी काहीपण त्रुटी असल्या तरी लोकशाही ला पर्याय नाही.
तुम्हाला जसा प्रश्न पडलाय माझ्या मताची किंमत काय तसा प्रश्न जेंव्हा जास्तीत जास्त लोकांना पडेल तेंव्हा ते लोक विचार करून मत देतील आणि लोकशाही व्यवस्था जास्त प्रगल्भ होईल. समाज किंवा देश फारच क्लिष्ट यंत्र आहे. आज काल आपल्याला झटपट बदल हवा असतो आणि पण तसा तो होत नाही. व्यायाम करून तब्येत सुधारायला जसा वेळ लागतो तसाच देशातल्या लोकांची साक्षरता आणि विचार करण्याची क्षमता वाढायला वेळ लागतो. जसा शरीरातला एकच स्नायू बळकट झाला आणि त्याने सगळं शरीर बळकट व्हावे अशी अपेक्षा ठेवून काही फरक पडत नाही संपूर्ण शरीराने हळू हळू व्यायाम आणि योग्य आहार घेतला तरच तब्येत सुधारू शकते. तसाच देशाचा किंवा समाजाचा देखील आहे. गेल्या काही दशकातली दिशा पहिली तर आपण योग्यच दिशेने जातोय. साक्षरता १२% वरून ७५% आलीये. आयुष्मान ३० वर्षांवरून ७० वर्षे झालाय. प्रति माणशी उत्पन्न ४२०$ वरून ७०००$ पर्यंत आलाय. फारच काही मूर्खपणा ना करता दिशा योग्य ठेवली तर आपण पुढेच जाणार आहे. वेग कमी जास्त होत राहतो. व्यायाम करणार्याने जसा कितीही त्रास होत असला तरी व्यायाम करणे सोडायचे नसता तसाच आपण देशाचे नागरिक म्हणून प्रयत्न करणे सोडायचा नसते.
अवांतर: पहिली ते दहावी इतिहास आणि नागरिकशास्त्राच्या पुस्तकात हे सगळे असते पण आपल्याला कळायला बरीच वर्षे जावी लागतात. फ्रेंच राज्यक्रांती किंवा बोल्शेव्हिक च्या मागे कशी असमानता कारणीभूत होती आणि त्यानंतर सर्व राज्यकर्त्यांना कशी क्रांतीची भीती बसली आणि कितीही नाईलाज असला तरी फार कोणी असमानता आणायचा प्रयत्न करत नाही. केला तरी फार काळ चालत नाही. सध्याचा भांडवलवादाच्या काळात आर्थिक विषमता नियंत्रणात आणायला, श्रीमंतांवर जास्त कर लावून त्याद्वारे बाकीच्या लोकांचा राहणीमान सुधारणे हा सध्याचा उपाय चालूये.
तसा विषय फार मोठा आहे पण हे दोन शब्द!
प्रतिसाद आवडला चिडकू!
प्रतिसाद आवडला चिडकू!
===
उपाशी बोका > +१
जरा राज्यशास्त्र आणि
जरा राज्यशास्त्र आणि नागरिकशास्त्राचा अभ्यास करावा धागाकरते..
तुम्हाला मुळापासून सगळे शिकायची गरज आहे.
Submitted by चिडकू on 30
Submitted by चिडकू on 30 October, 2018 - 09:33
एक नंबर..
धाग्याचा मथळा असणारा प्रश्नही
धाग्याचा मथळा असणारा प्रश्नही पडायला नको खरं तर.
चकली
चकली
सु/उच्च शिक्षित व्यक्ती
सु/उच्च शिक्षित व्यक्ती देशाच्या राजकारणात लक्ष घालून, सारासार विचार करूनच मतदान करेल याची कितपत खात्री असते, मतदान करेलच याची कितपत खात्री असते?
या उलट कमी शिकलेली व्यक्ती असे करणार नाही याची कितपत खात्री असते? अशांची टक्केवारी किती असते?
उच्चशिक्षित व्यक्ती अशिक्षित लोकांचे कल्याण होईल हे बघून मतदान करील याची कितपत खात्री असते?
मला बर्याच दिवसापासून प्रश्न
मला बर्याच दिवसापासून प्रश्न पडला होता धागामालक गायब कसे?
दमदार पुनरागमन
बाकी चालू द्या
जेव्हा मी मायबोलीवर अर्धवट
जेव्हा मी मायबोलीवर अर्धवट ज्ञानावर वा अपुरया माहीतीवर धागा काढायचो तेव्हा लोकं म्हणायचे आधी अभ्यास करून या....
आणि आता म्हणत आहेत की शिक्षणाने, अभ्यास केल्याने अशी काय अक्कल येते..
गंमतच आहे
मलापण एक प्रश्न पडला.
मलापण एक प्रश्न पडला. महाराष्ट्रातले क्रमांक एकचे अभियांत्रिकी महाविद्यालय कुठले आहे?
<<<<
हे ठरवायला लोकशाही पद्धतीने एक पोल घेतला तर....
ऑन ए सिरीअस नोटेवर विचारतोय हे !
खोचक प्रश्न आहे.. विचार करून उत्तर द्या
>> अतुलजी, कॅन यू प्लीज
>> अतुलजी, कॅन यू प्लीज ईलॅबोरेट? काय केले होते?
>> Submitted by ऋन्मेऽऽष on 30 October, 2018 - 02:18
अमेरिकेत १७८७ साली कृष्णवर्णीयांच्या (त्या काळातले गुलाम) मतांचा निवडणुकीत जास्त प्रभाव पडू नये म्हणून पाच कृष्णवर्णीय व्यक्तींना तीन व्यक्ती समजले जावे असा ठराव केला गेला होता. (मी हे खूप खूप पूर्वी कुठेतरी "ब्रिटिशांनी आफ्रिकेत" असे वाचले होते. म्हणून आधीच्या प्रतिसादात तसा उल्लेख आहे).
इंजिनिअर म्हणजे सकाळी 9 ते
इंजिनिअर म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळी 6 कॉम्प्युटरसमोर बसून ctrl+c आणि ctrl+v बटणं दाबणारे का? ही दोन बटणं तो चहावाला पण दाबू शकतो हे बहुदा त्या उमेदवाराला माहीत होतं म्हणून त्याच्यासोबत पण तो तितक्याच प्रेमळपणे बोलला.
जेव्हा मी मायबोलीवर अर्धवट
जेव्हा मी मायबोलीवर अर्धवट ज्ञानावर वा अपुरया माहीतीवर धागा काढायचो तेव्हा लोकं म्हणायचे आधी अभ्यास करून या....
याचा अर्थ तू कुठल्यातरी संस्थेत दाखल होऊन तिथे शिकून डिग्री / सर्टिफिकेट घेऊन यावे असा घेतोस का?
तू इंजिनिअर आहे, मी पण. तरी जर इथे आपण अर्धवट ज्ञानावर धागा काढत असू आणि लोक आपल्याला अभ्यास करून या सल्ला देत असतील, तर उलट "केवळ शिक्षणाने होत नाही रे आधी जे करायचेय त्याचा अभ्यास केला पाहिजे" असा होतो ना!
शिक्षण आणि अभ्यास हे
शिक्षण आणि अभ्यास हे परस्परावलंबी शब्द नाहीत का?
आणि आता एक मूलभूत प्रश्न -
जर एखाद्या लोकशाही देशातील शिक्षणव्यवस्था तेथील लोकांना सुजाण नागरीक करत नसेल वा त्यासंदर्भात ज्ञान देत नसेल तर ती शिक्षणव्यवस्था किंवा लोकशाही या दोघांपैकी एक गण्डलेय असा अर्थ होत नाही का?
देशासाठी योग्य काय याचे ज्ञान शिक्षणाने आले पाहिजे अशी त्या अभ्यासक्रमात तजवीज हवीच.
अमेरिकेत १७८७ साली
अमेरिकेत १७८७ साली कृष्णवर्णीयांच्या (त्या काळातले गुलाम) मतांचा निवडणुकीत जास्त प्रभाव पडू नये म्हणून पाच कृष्णवर्णीय व्यक्तींना तीन व्यक्ती समजले जावे असा ठराव केला गेला होता.
>>>>
येस्स साधारण असेच अपेक्षित आहे मला. फक्त जातीवर्णवंशभेदावर नाही तर पात्रतेवर..
जेव्हा मी मायबोलीवर अर्धवट
जेव्हा मी मायबोलीवर अर्धवट ज्ञानावर वा अपुरया माहीतीवर धागा काढायचो तेव्हा लोकं म्हणायचे आधी अभ्यास करून या....>>>
मग हा धागा काढायच्या आधी करायचं ना तसं
देशासाठी योग्य काय याचे ज्ञान
देशासाठी योग्य काय याचे ज्ञान शिक्षणाने आले पाहिजे अशी त्या अभ्यासक्रमात तजवीज हवीच.>>>
सहमत. सध्या हे अभ्यासक्रमात नाही.
तसेच ज्यांचे शिक्षण पूर्ण झालेय, जे शिकले नाहीत त्यांच्यासाठीही या अभ्यासक्रमाची तजवीज करावी, प्रौढ शिक्षण वर्ग, दूरदर्शन, ऑनलाईन कोर्सेस, संमेलने इत्यादी, अजून काही व्यवस्था जसे जिथे योग्य असेल तिथे.
या करिता एक कालावधी, पाच / दहा वर्षे देण्यात यावा.
त्यानंतर ज्यांनी हा कोर्स पूर्ण केलाय त्यांनाच व्होटिंग कार्ड द्यावे.
यात सिव्हीकसेन्सच्या विविध अंगांचाही समावेश असावा.
शाळेची पुस्तके परत वाचा एकदा.
शाळेची पुस्तके परत वाचा एकदा. सगळं आहे त्यात. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय रचना आणि न्यायालये सगळ्यांची व्यवस्थित माहिती आहे त्यात.
http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx#
इयत्ता आठवी:
http://cart.ebalbharati.in/BalBooks/pdfs/801000584.pdf
तेंव्हाच अभ्यास केला असता तर हि वेळ आली नसती.
चिडकू तुम्ही तर पार हवाच
चिडकू तुम्ही तर पार हवाच काढून टाकली.
डाउनलोड करून वाचतो.
धन्यवाद!