नविन पिढी

शाळे बाहेरच्या शाळा - भाग १

Submitted by रणजित चितळे on 14 December, 2010 - 02:35

आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमची आई रोज दुपारी आम्हाला रेल्वेलाइन जवळच्या गणपतीच्या देवळात घेऊन जायची. कधी तिथे कीर्तन चाललेले असायचे ते ऐकायला बसायचो, कधी प्रवचन चाललेले असायचे त्याला जायचो. कीर्तन दोन भागात असायचे पाहिल्या भागात भागवतातली एक कथा किंवा पुराणातली एखादी घटना भजनांबरोबर कीर्तनकार सांगायचे. मजा यायची. दुसऱ्या भागात सांगितलेल्या कथेचा मथितार्थ सांगायचे. हा भाग जरा गंभीर असायचा व सुरवातीला कंटाळा यायचा पण वय वाढल्यावर आवडायला लागला. कथेचे सार दुसऱ्याच भागात असते हे कळले. प्रवचनेचे विषय जरा गंभीर असायचे.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - नविन पिढी