लेख

पाऊसःआगळावेगळा - पण ओळखीचा

Submitted by आशिका on 12 August, 2015 - 05:23

पाऊस - कधी धो-धो पडणारा, तर कधी रिमझिम बरसणारा, कधी रौद्र रुपात तांडव करणारा तर कधी गायब होणारा ! अशी पावसाची विविध रुपे तर सर्वज्ञात आहेत. पण या नेहमीच्या पावसाव्यतिरिक्त आहे का असा एखादा पाऊस जो आपल्या सार्‍यांना चिरपरिचित आहे अगदी अनादि काळापासून?

अगदी तान्हे बाळ असतानाही आपल्या गरजा, हट्ट पूर्ण करुन घेण्यासाठी आपण 'या पावसाचा' उपयोग करुन घेत असतो. या पावसाचे थेंब पाहून भलेभले घायाळ होतात, अगदी शरणागतीही पत्करतात.

गॄहराज्यावरी गाजवी सत्ता राजा चिमणा एक
अन या 'चिमण्या राजाचं' हुकुमी अस्त्र असतं 'हा पाऊस' !

आलं ना लक्षात मी कोणता पाऊस म्हणतेय ते?

शब्दखुणा: 

तुम मुझे यूं भुला ना पाओगे...(रफी पुण्यस्मरण)

Submitted by अतुल ठाकुर on 30 July, 2015 - 13:41

होला.......स्पेन!........भाग ४ आणि समाप्त.

Submitted by पद्मावति on 15 June, 2015 - 16:26

सेविलाच्या अनेक पर्यटन-स्थानांमधे प्रमुख दोन आकर्षणे आहेत. त्यातील एक म्हणजे Royal Alcazar Palace.
साधारण बाराव्या शतकात बांधल्या गेलेला हा पॅलेस इस्लामी स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमूना म्हणून गणल्या जातो. हा राजवाडा युरोप मधील राहत्या राजवाड्यांपैकी सर्वात प्राचीन आहे. स्पॅनिश राजघराण्याचं सेविला मधील हे निवासस्थान...अर्थातच काही भाग. बाकीचा भाग आम जनतेसाठी खुला आहे. ही शाही इमारत आणि बाग म्हणतात की अप्रतिम सुरेख आहे. पण वेळेच्या अभावी आम्ही तिथे जाऊ शकलो नाही.

विषय: 
शब्दखुणा: 

Hola.......स्पेन!!.......भाग ३.

Submitted by पद्मावति on 11 June, 2015 - 06:37

Sevilla ...स्थानिकांच्या शब्दात सेविया.
आंड्यूल्यूशियाच्या राजधानिचे हे शहर Guadalquivir या नदीच्या तीरावर वसलेले आहे. स्पेनच्या इतिहास आणि संकृतीचं एक मानचिन्हं म्हणून याची ओळख आहे.
साधारण 206 B.C. रोमन राज्यकर्त्यांंनी याचं Hispalis हे नाव ठेवलं. रोमन काळात हे शहर वैभवाच्या शिखरावरती पोहोचले होते. मग नंतर इ.स.७०० नंतर अरबांनी याचा कब्जा घेतला आणि नाव ठेवलं Isbiliah. त्यानंतर जवळजवळ पाचशे वर्षं इथे इस्लामी सत्ता होती. या काळात पण हे शहर समृद्धशाली होते. तेराव्या शतकाच्या मधे फर्डिनॅंड-तिसरा याने सेविला जिंकून घेतले आणि तिथे ख्रिस्ती धर्माची स्थापना केली.

विषय: 
शब्दखुणा: 

मनातले मनापासून

Submitted by दीप्ति काबदे on 11 April, 2015 - 02:23

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते मानले तरी सुद्धा प्रत्येक स्त्री पत्नीच असते किंवा असायला नाही !

पाठीवर हात ठेवून लढत राहा म्हणणारी स्त्री कुणी मैत्रीण सुद्धा असू शकते .

कित्येक वेळेला पुरुष ज्या गोष्टी आपल्या पत्नीशी बोलू शकत नाहीत त्या सुद्धा एका चांगल्या मैत्रिणीशी मोकळेपणाने बोलतात .

असे नाते फारच सुंदर असते .

अपेक्षा नसतात . फक्त आधार असतो , एकमेकांना दिलेला . आणि विश्वास असतो, निस्वार्थी प्रेमाचा .

शारीरिक वासनेचा स्पर्श सुद्धा नसलेले मैत्रीचे निखळ नाते आयुष्य जगण्याची आणि येईल त्या संकटांना सामोरे जाण्याचे बळ देत राहते .

दुसरं काय हवं असतं ?

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लेख