तिन्हीसांज
तिन्हीसांज होता दिवेलागण झाली,
तुझ्या आठवणींचे तेव्हा हळूच येणे झाले ।
दबक्या पावलांनी आले चंद्र तारे ,
श्वास अडकायला सखे हेच बहाणे झाले ।
गुंतला जिव उंबऱ्यात ,
पण ना तुझे येणे झाले ।
मी लावली सांजवात ,
पण ना मला गाणे आले।
दूर कुठूनसा आला आवाज कानी ।
वाटले मला जणू तुझी चाहूल आली ।
पायातल्या पैंजनांचे तेव्हा कानी पडसाद आले ।
श्वास अडकायला सखे हेच बहाणे झाले ।
चंद्र खिडकीतून पार डोईवर आला ।
बघता बघताच अचानक ढगांआड गेला ।
वारा आला आंगचटीला पडद्याचे उडणे झाले ।