Submitted by नरेश रावताला on 27 December, 2024 - 11:13
कितीतरी बेत
जगावयाचे कितीतरी बेत होते;
पण अस्त मला कुठेतरी नेत होते...
जगण्यासाठी लढलो असेल कैकदा;
जिंकण्याचे श्रेय दुसरेच घेत होते...
पावसाळे किती आले अन् गेलेही;
इथे श्वास तेव्हढे धीर देत होते...
परिवाराचे पीक बहरले खरे;
हिरवळीचे तेही एक शेत होते...
फुकाचा सलाह देण्यात बर्बाद झालो;
बाकी जिंदगी तितकी भेत होते...
पानगळीचा मोसम सुरू झाला;
मव्हाची पानेही नशा पेत होते...
आता दिवस उरले थोडे-थोडकेच;
भरले घडे फुरण्यास येत होते...
जगावयाचे कितीतरी बेत होते;
पण अस्त मला कुठेतरी नेत होते...
© नरेश रावताला
nareshrawatala@gmail.com
***
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
>>>>मव्हा
>>>>मव्हा
महुआ?
>>>>भेत होते
बेत होते?
>>>> घडे फुरण्यास
???