दिवाळी.. आकाशकंदील..आठवणी...
दिवाळी.. आकाशकंदील..आठवणी...
दिवाळी.. आकाशकंदील..आठवणी...
मागच्या वर्षीचे कंदिलांचे आकाश आठवतेय का तुम्हाला ?
ह्या वर्षी देखिल इथे डॅलस मध्ये चायनिज लॅन्टर्न फेस्टीव्हल सुरु आहे.
त्यातिल गेल्या वर्षिपेक्षा वेगळी असलेली निवडक प्रकाशचित्रे इथे शेअर करत आहे.
प्रतिबिंबित ही बिंब जाहले....
ड्रॅगन ची बोट आणि मागे दिसणारा रंगिबेरंगी पॅलेस....
हे दोन ड्रॅगन्स
नमस्कार मंडळी !
झाली का दिवाळीची तयारी ?
दिवाळी म्हणजे फ़राळ. . . तो फ़राळाचा दरवळ, दिवाळी म्हणजे तोरणे रांगोळ्या फुलांच्या सजावटी . . . . दिवाळी म्हणजे दिव्यांचा लखलखाट, माळा…. पणत्या आणि मुख्य म्हणजे आपला घरादाराची शान वाढवणारा आकाशकंदिल.
मी शक्यतो पारंपरिक पद्धतीचा रंगित कागदाचा बनवलेला आकाशकंदिल प्रेफर करते. आणि तो मला स्वत:ला बनवायला आवडतो. मागच्या वर्षी इथे शेअर करायला उशीर केला म्हणून काही फ्रेंड्स नाराज होते. म्हणून आज दिवाळीच्या आधीच तुमच्याशी हे फोटो शेअर करतेय.
दिवाळीपूर्वी कंदिलांचे आकाश शोधून देखील आम्हाला घरी लावता येईल असा आकाशकंदिल नाही मिळाला.
मग आम्ही हा झटपट आकाशकंदिल बनवला.
पेपर चा कंदिल बनवुन त्यावर ग्लिटर गम ने बॉर्डर काढली आणि खाली लाल रंगाच्या झिरमिळ्या लावल्या.