झटपट आकाशकंदिल
दिवाळीपूर्वी कंदिलांचे आकाश शोधून देखील आम्हाला घरी लावता येईल असा आकाशकंदिल नाही मिळाला.
मग आम्ही हा झटपट आकाशकंदिल बनवला.
पेपर चा कंदिल बनवुन त्यावर ग्लिटर गम ने बॉर्डर काढली आणि खाली लाल रंगाच्या झिरमिळ्या लावल्या.
आतल्या पेपर वर पणती आणि मोराचे नक्षीकाम केलेय.
ही झटपट आकाशकंदिलाची कृती
तीन सारख्या रूंदीचे पेपर. पैकी A ची उंची सर्वात कमी आहे. B ची उंची त्यापेक्षा २-३ इंच जास्त C ची उंची आणि रुंदी सारखी आहे. चौरस आहे.
चित्रात दाखवल्या प्रमाणे A च्या कडा चिकटवुन सिलेंडर बनवायचा आहे. चित्रात A1. त्यापूर्वी त्यावर हाताने किंवा स्टेन्सिल ने डिझाईन काढून कटर ने कटींग करुन घ्यावे.
आता पेपर B ला चित्रात दोन रेषा दाखवल्या आहेत त्याप्रमाणे वरून खालून साधारण एक इंच अंतर सोडून कट मारून घ्यावेत. मग A1 आणि B एकमेकांवर चिकटवावे. B ची उंची जास्त असल्याने कंदिल मध्यभागी गोलाकार फुगीर दिसेल. तेच जर B ला मध्यभागी (अर्धी उंची) घडी केली तर अजुन वेगळ्या आकाराचा कंदिल बनु शकतो.
(B च्या वरच्या खालच्या किनार्यांवर डिझाईन काढायचे असेल तर चिकटवण्या आधी काढलेले चांगले. मी ते आकाशकंदिल बनवुन झाल्यावर त्याची सजावट केल्याने मला फार अवघड पडले. कंदिलाचा फुगिर भाग.. मधल्या नाजुन पट्ट्या तुटू न देता सांभाळत नक्षी काढावी लागली )
आता चित्रात दाखवल्या प्रमाणे C ला वर एक इंच जागा सोडून सारख्या अंतरावर कटर ने कट्स मारून झिरमिळ्या तयार करुन C चा वरचा भाग A1 आणि B च्या खालच्या भागाला आतुन चिकटवुन घ्यावा.
इथे रिबन वगैरे लाउ शकता. पण एकसारख्या अंतरावर लावणे वेळखाउ काम होईल. म्हणून एकाच कागदाच्या झिरमिळ्या.
ही अगदी सोप्प्या आकाशकंदिलाचि कृती आहे. ह्यावर हवे तसे आपण सोनेरी लेस वगैरे लाउन सजावट करु शकतो. A1 च्या सिलेंडर वर कटवर्क करून आतल्या बाजूने रंगित जिलेटिन लावल्यास अजून छान रंगीत प्रकाश पडेल.
(No subject)
मस्त! हॅप्पी दिवाळी
मस्त!
हॅप्पी दिवाळी
लाजो आत्ताच तुझी आठवण काढली
लाजो आत्ताच तुझी आठवण काढली होती. झाला का फराळ ?
डॅफो, मस्तच गं.
डॅफो, मस्तच गं.
सुंदर कंदील ... शुभ दीपावली
सुंदर कंदील ...
शुभ दीपावली .....!!!!!!!
अप्रतिम कंदिल डॅफो.
अप्रतिम कंदिल डॅफो.
मस्त !
मस्त !
छान नटवलाय आकाशकंदील
छान नटवलाय आकाशकंदील
मस्तच्
मस्तच्
डॅफोडिल्स, सुंदर आकाशकंदील
डॅफोडिल्स, सुंदर आकाशकंदील
सुंदर बनलाय आकाशदिवा
सुंदर बनलाय आकाशदिवा
किती सुंदर आहे तुझा आकाशकंदिल
किती सुंदर आहे तुझा आकाशकंदिल डॅफो.
असे मेले एक धड कधी जमणार नाही मला.
छानच आहे कि.. पण एक हरकत
छानच आहे कि.. पण एक हरकत आहे... याला सोपा म्हणू नये. प्लीजच.
मस्त गं डॅफो. सुरेख बनवला
मस्त गं डॅफो. सुरेख बनवला आहेस आकाशकंदील!
सुंदर... खरच कल्पक..
सुंदर... खरच कल्पक..
सुंदर!
सुंदर!
वा
वा
दिनेशदा, सोप्पा असतो पण हा
दिनेशदा, सोप्पा असतो पण हा खुपच.म्हणजे बेसिक कृती. वर डॅफोने फार मेहनतीने सजवलाय मात्र.
डॅफो, थोडक्यात कृती लिही ना.
कंदील मस्तच झालाय.
मला खालच्या रिबीन खूप आवडल्या.
सातीचे बरोबर आहे, बेसिक
सातीचे बरोबर आहे, बेसिक क्रुती अतिशय सोपी आहे पण पुढची सजावट हा खरा मेहनतीचा भाग आहे. डॅफोची मेहनत तिथे दिसून येतेय.
सुरेख दिसतोय डॅफो
सुरेख दिसतोय डॅफो
सहीच. केवढा सुंदर केलायस
सहीच. केवढा सुंदर केलायस आकाशकंदिल डॅफो. सजावट फारच आवडली. दिवाळीच्या शुभेच्छा.
मस्तच केलायस गं. छान दिसतोय
मस्तच केलायस गं. छान दिसतोय एकदम.
धन्यवाद मंडळी पण एक हरकत
धन्यवाद मंडळी
पण एक हरकत आहे... याला सोपा म्हणू नये>>> दिनेशदा सगळे कटवर्क अहो ने केल्यामुळे मला सोप्पाच वाटला
नुसते चिकटकाम आणि डिझाईन काढायला.
साती >> कृती लिहिणे अवघड काम.. पण केलेय वर अपडेट.. पुढल्या वर्षी उपयोगी येईल सगळ्यांना.
धन्यवाद !
मस्त दिसतोय अगदि! दिवाळीच्या
मस्त दिसतोय अगदि! दिवाळीच्या शुभेच्छा
<कृती लिहिणे अवघड काम.. पण
<कृती लिहिणे अवघड काम.. पण केलेय वर अपडेट.. पुढल्या वर्षी उपयोगी येईल सगळ्यांना. >
डॅफोडिल्स, कृती लिहिणेच कंदील करण्यापेक्षा जास्त कठीण आहे. असा कंदील शाळेत हस्तव्यवसायात शिकवला जायचा. त्यात A भाग नव्हता.
असेच अनेक मिनी कंदील करून त्यांचीच माळ दिव्याशिवाय शोभेला लावता येते.
हो आत्ताच मला एका छोटीचा तसा
हो आत्ताच मला एका छोटीचा तसा पिटुकला कंदिल घेउन शाळेच्या गणवेशातला फोटो दिसला फेबु वर
सुंदर आहे गं आकाशकंदील, किती
सुंदर आहे गं आकाशकंदील, किती हौशी आहेस तू! पुढच्या वर्षी दिवाळीआधी कंदील गटग करुयात
भारीये. यावेळी उशीर झाला. आता
भारीये. यावेळी उशीर झाला. आता पुढच्या वर्षी
खूपच सुंदर! डॅफो, तुझ्या
खूपच सुंदर! डॅफो, तुझ्या हातात किती कला आहे गं!
क्ल्चर प्रोजेक्ट ला आम्हाला
क्ल्चर प्रोजेक्ट ला आम्हाला म्हणजे लेकिला दिवाळि वर ३डि ईमेज आहे तेव्हा हा केलाय.. ़खरच सोपा आहे ़करायला.
Pages