सारीपाट

Submitted by Girish2009 on 8 October, 2023 - 02:07

कुणाचे कुणाशी दुरावे दाटलेले
मनांचे मनांशी पुरावे झाकलेले

सारीपाट हाती..सोंगट्या फेकलेल्या
नटांचे नटांशी किती देखावे पोसलेले

शोधात सगळे बांधील सोयरीकीच्या
कितीसे पसारे इथे मांडून मोडलेले …

तुझ्या काजळाच्या किती प्रती निघाल्या
डोळ्यांत बाहूल्यांचे छंदी रकाने छापलेले …

जीवनाचे सारे करार छापील होते तरीही
शेवटी ते ही हारलेले अन हे ही गांजलेले …

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users