कसा विसरलो मोठा झालो मी
मात्र आईसाठी नाही...!!
जेवण केल्यानंतर आज ही
पोटात जागा असते
मात्र आता आई च्या हातचा तो एक घास खात नाही
विखुरले असतात केस माझे
केसांचा भारा असते
मात्र आता आईला केसांचा भांग पाडून मागत नाही
चेहरा धुतल्यानंतर आत्ता ही
चेहऱ्याला पाणी चिकटून असते
मात्र आता आई च्या पदराने तो साफ करत नाही
तिच्या गोष्टी काही संपत नाही
जुन्या गोष्टींचा पिटारा खोलते
मात्र आता तिच्या मांडीवर बसून मी ऐकत नाही
इवल्याशा पिठाची इवलिशी पोळी
आता छान करता येते
मात्र आता आई ला पोळ्या बनवण्यात मदत करत नाही
मामाच्या गावाला जायची
आज ही इच्छा असते
मात्र आता मी आईकडे जावयास हट्ट करत नाही
ताकात लावायचो कोवळ्या हातांनी
आज मनगटात खूप बळ आहे
मात्र आता ताकत असून आईचे पाय चेपून देत नाही
लहानपणी कळली नव्हती
आता पूर्णपणे समजली आहे
तरी मात्र आधीसारखा मी तिचा मुका घेत नाही
साध्या सरळ शब्दांत लिहिली आहे
साध्या सरळ शब्दांत लिहिली आहे, त्यामुळे कवितेचा आशय सहज समजतो.