लहापणी न्हावी काकाकडे गेलो की काका खुर्चीवर पाटली टाकायचे पाटलीवर बसने मला फार कमीपणाचे वाटायचे, आपण उगीच लहान असल्याची जाणीव होत असे. एकदा ती कसरत काकाची सुरु झाली की बस, मधे मधे मान आपण सरळ करायची तर काका दुसऱ्या बाजूला एकदम दाबायाचे. समजा त्याच बाजूला ठेवावी तर परत दुसऱ्या बाजूला दाबल्या जायची. नेमके कुठल्या बाजूला डोके ठेवावे हा प्रश्न मनात यायचा अवकाश की समोर एकदम झटक्यान डोकेे दाबल्या जाई व मागच्या बाजूच्या केसावर आक्रमण होई. बऱ्याचवेळा डोक्याला वाटेल तसे झटके देवून झाले की मग कैचीचे काम संपे, मग कैचिची जागा वस्तारा घेत असे.
नमस्कार मायबोलीकर,
हा आपला एक हलकाफुलका 'आपला कट्टा'..येथे थोड्याफार गप्पा मारू, हितगुज करू. हलकेसे विनोद टाकू..भरपूर हसू... नविन काही शिकू -शिकवू.. विचार मांडू ,त्यांची देवाणघेवाण करू.
एकदुसर्यांच्या आवडीनिवडी जाणून घेऊ. अनुभव सांगू...
येथे येणाऱ्या सर्वांचे मनापासून स्वागत 
हे वाहते पान आहे.
तुझे माझे
तुझे माझे बंध
जसा मोग-याचा गंध
किती दडपू पाहिला
दरवळे मुक्तछंद....
तुझी माझी भाषा
निशब्दाची रेषा
अबोल भासे तरी
पुर्णत्वाची परिभाषा...
तुझे माझे गाणे
ना सूर ना तराणे
गवसले मज त्यात
जगण्याचे किती बहाणे...
तुझी माझी भेट
नभ धरेचा समेट
होता नजरानजर
कळ काळजात थेट...
तुझा माझा प्रवास
मनी क्षितीजाची आस
गुंफता हात हाती
पायी नक्षत्रांचा भास...
मी
आजकाल मी स्वतःलाच भेटत नाही
या माणसांच्या गर्दीपासून
पळते आहे दूर कुठेतरी....
माझीच ओळख अजून
मला पटलेली नाही
कोण आहे कोण मी ??
या जगण्याच्या शर्यतीत
हरवून बसले आहे
स्वतःचचं अस्तित्व
इथे पंख छाटलेल्या
पक्षाला हक्कच नाही
स्पर्धेत भाग घेण्याचा
अन् घेतलाच तर
सारेजण जातील
त्याला पायदळी तुडवून
मी पण त्यातलीच एक ??
की मीही चालले आहे
खुरडत खुरडत त्या पक्षाप्रमाणे
या दुनियेची तमा न बाळगता
फक्त अंतिमरेषेकडे लक्ष ठेऊन.......
- मीनल
काय सांगावे...
फुलासवे जरी बोचती काटे
तरी परिमल सुखावे....
अंधारात धुके दाट तेंव्हा
हात तुझे हाती असावे...
देह घुटमळे उंबरठ्यापाशी
वेशीपार वेडे मन धावे...
माझे असे काही नाही मजपास
तुजला मी आता काय द्यावे....
माझा जन्म आहे आधी अर्थहीन
तुज मी कैसे उध्दारावे....
आयुष्य सारे आहे एक फसगत
कोणास आपले मानावे....
शब्दच सखा शब्द सोबती
शब्दांनाच घेऊन संगे चालावे...
"मीनू" म्हणे एवढी ठेव आठवण
आणि काय वेगळे सांगावे...
- मीनल