रंग रेषांच्या देशा.... - तुझे रुप चित्ती राहो...
या विभागात सगळ्यात पहिला आलेला मल्लीनाथ चा गणपती पाहिला आणि ठरवले की आपण ही टाकू इकडे एखादे चित्र.. असंच झटपट काढून...
तसे भरपूर गणपती काढून झालेत... शाळेत असताना पेन्सील ने गणपती काढायचे वेगवेगळ्या मूडमधले... असा छंदच लागत असे गणपतीची सुट्टी पडली कि,
पण.. अजुन पेन्सील हातात घ्यायला सवडच झाली नाहीय... तोवर आठवलं .. मागे कधीतरी रंगां चे फटकारे मारुन एक समर्थ आणि गणपती काधलेला आहे... सध्या नवा काढुन होइपर्यन्त तो द्यावा.. माय्बोलीच्या गणेशोत्सवात आपला पण सहभाग...:)