महाराष्ट्र

पावसाळ्यातील आठवणी??

Submitted by अस्मि_ता on 21 June, 2016 - 08:18

मायबोलीकरांनो ,
पाऊस हा सगळ्यांच्या आवडीचा विषय. ह्या पावसाळ्यात एकीकडे अनेक सहली, गेट टुगेदर होत असतात तर दुसरीकडे प्रेमी युगुल चोरून चोरून भेटत असतात. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात पावसाळ्यातले आवर्जून आठवावेत असे काही प्रसंग असतील तर जरूर share करा आणि ह्या पावसाळ्यात जुन्या आठवणींनी चिंब भिजा..

प्रांत/गाव: 

यथा शास्त्रप्रमाणेनं...

Submitted by अत्रुप्त आत्मा on 2 May, 2016 - 12:45

सदर लेखनाचा रोख हा धार्मिकविधींमध्ये साध्या साध्या व्यवहाराच्या गोष्टी धार्मिक-आचार म्हणून कश्या रूढ होतात? हे दाखवून देणे हा आहे.

1)मुंजीतील क्षौर विधी-(न्हाव्याकडून) डोक्याचे केस काढणे. (गोटा करणे)

प्रांत/गाव: 

आजारी मुलाचा आहार

Submitted by friend१६ on 2 February, 2016 - 10:20

5 year old have very bad cough and cold, what should I give him as snacks in cough and cold?

Doc told to give less oily food but he is not interested in soup etc. and I am out of ideas, please suggest something healthy.

He lost 0.5 kg in 4 days as he is not eating properly.

Please help

प्रांत/गाव: 

जम्मू ते पुणे - सायकल मोहीम

Submitted by MallinathK on 27 January, 2016 - 03:22
तारीख/वेळ: 
25 January, 2016 - 19:30 to 11 February, 2016 - 09:30
ठिकाण/पत्ता: 
प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून मोहीम जम्मू येथून प्रस्थान करेल व पंजाब, राजस्थान, गुजरात अशा राज्यांतून प्रवास करत ११ फेब्रुवारी रोजी पुण्यातील प्रसिद्ध सारसबाग गणपती मंदिरापाशी मोहीमेची सांगता करण्यात येईल. जम्मू, पठाणकोट, अमृतसर, श्री मुक्तसर साहीब, हनुमानगड, सरदारसहर, डिडवाना, अजमेर, भिलवारा, नाथद्वारा, खेरवारा, मोडासा, वडोदरा, अंकलेश्वर, वलसाड, वसई आणि खोपोली असा मोहीमेचा मार्ग आहे.

शांततेचा प्रसार करण्यासाठी सात पुणेकर करणार जम्मू ते पुणे असा २२०० किमी चा प्रवास.

सध्या वाढत चाललेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या आणि वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे व शांतता नांदावी अशा सदिच्छा घेऊन दहा पुणेकर सायकलपटू २६ जानेवारीपासून जम्मू ते पुणे अशी सायकल मोहीम करणार आहेत.

प्रांत/गाव: 

माझी गाणी... "कळेना मला हे कशी वेगळी तू..." (नवीन)

Submitted by limayeprawara on 16 January, 2016 - 04:51

मित्रांनो,
एक निखळ हळुवार प्रेमगीत... आणि एक उत्कृष्ट गझल...
प्रेयसी आणि प्रतिभा... दोघीही सारख्याच... कधी चांदणं बरसवणाऱ्या तर कधी उन्हात उभं करणाऱ्या... कंपोजर म्हणून मलाही असंच जाणवतं... "कळेना मला हे कशी वेगळी तू..." म्हणून... प्रियकर "अथांग यमन", मी आणि रोमँटिक वॉल्ट्झ...

"कळेना मला हे कशी वेगळी तू..."

जरूर ऐका आणि आपले मत नोन्दवा....
धन्यवाद.... प्रवरा

विषय: 
प्रांत/गाव: 

हॉरर चित्रपटांची नावे सांगा.

Submitted by Swara@1 on 11 January, 2016 - 02:10

आज ऑफिसमध्ये काही काम नसल्याने(आणि बॉस हि नसल्याने) तुनळि वर चित्रपट पहायचा विचार करतेय. तर कृपया एखादा चांगला हॉररपट सुचवा.

विषय: 
प्रांत/गाव: 

आयटी आणि भाकरी

Submitted by mi_anu on 12 October, 2015 - 09:55

(हा धागा काढण्यास लायक नाही असे वाटल्यास काढून टाकावा.)
अगदीच राहवलं नाही म्हणून लिहीतेय.
हे सकाळ मध्ये आयटी आणि भाकर्‍यांबद्दल लेख लिहीणारे साहेब खरंच आयटीत आहेत का? त्यांच्या लेखनात थोडं सरसकटीकरण आणि विसंगती दिसतात म्हणून.
या लेखांबद्दल चर्चा करायची असल्यास इथे लिहा.

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4688866888234778423&Se...

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

अर्धा-दशक लहान बायको - भाग २

Submitted by आशयगुणे on 2 October, 2015 - 04:02

आम्ही आता घरी आलो होतो. एकमेकांची सवय होऊ लागली होती आणि हळू हळू स्वभाव देखील समजू-जाणवू लागले होते. अर्थात निश्चित स्वरूपात नाही. पण एक अंदाज येऊ लागला होता एवढं मात्र खरं! काही वेळेस त्यामुळे खटके देखील उडायचे.जेवण झाल्यावर गाणी ऐकायची मला लहानपणापासून सवय. त्यात 'जो जीता वोही सिकंदर' किंवा 'दिलवाले दुल्हनिया जायेंगे' मधली गाणी अगदी विशेष आवडीने. कधी कधी 'अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का' होऊन जायचं. अधून मधून ८० च्या दशकातील आर.डी बर्मन ची गाणी किंवा त्याचीच '१९४२ - अ लव्ह स्टोरी' मधली गाणी असायची. कधी कधी 'तेझाब', 'बेटा' वगेरे सिनेमे हजेरी लावायचे.

प्रांत/गाव: 

अर्धा-दशक लहान बायको - भाग १

Submitted by आशयगुणे on 2 October, 2015 - 04:00

प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात एक असा दिवस येतो जेव्हा त्याची चौकशी आणि उलटतपासणी एकदम होते! आणि साहजिकच तो दिवस त्याला स्वच्छ आठवतो. म्हणूनच ह्या गोष्टीची सुरुवात 'तो दिवस मला स्वच्छ आठवतो' ह्याच वाक्याने करतो आहे. अनेक मुलीकडल्यांच्या - पोलिस स्टेशनच्या पायऱ्या चढाव्या तशा - पायऱ्या चढून आणि तिथे 'चौकशी' शिवाय काहीही हाती न लागून आम्ही ह्या घराचे दार वाजवले. आधी एवढे अनुभव घेतल्यामुळे आमच्या घरच्यांचे चेहरे 'इथे तरी न्याय मिळेल काय' असे झाले होते. मी मात्र 'आता पुढे काय' असे भाव ठेवून होतो.

Pages

Subscribe to RSS - महाराष्ट्र