प्रेमगीत

छेडिल्या कुणी सतारीच्या तारा

Submitted by Meghvalli on 22 March, 2024 - 00:09

सांजवेळी अवचित छेडिल्या कुणी सतारीच्या तारा ।
मन माझे धुंद करुन गेला तो मंद स्मृतीगंध वारा ।।
अजुनही तूझा स्पर्श आठवुन उन्मादीते अंग ।
रोमांच दाटते,अंगातून उठतो एक शहारा।।
तु एक शीतल नदी अन् मी तुझा किनारा।
एक दिस सुटणार साथ, मिळणार तू सागरा ।।
चालू चल काही काळ गुंफून हातात हात।
मावळतीस आला ग पहा तो शुक तारा ।।
मनातल्या प्रश्नांची तू आज उत्तरं शोध सखे ।
साचल्या गढुळतेचा स्वच्छ होऊदे पसारा ।।
अंगणात मंद मंद झुलतो शांत गार वारा।
मोरपंखी भावनांचा मनी फुलला पिसारा ।।

माझी गाणी... "कळेना मला हे कशी वेगळी तू..." (नवीन)

Submitted by limayeprawara on 16 January, 2016 - 04:51

मित्रांनो,
एक निखळ हळुवार प्रेमगीत... आणि एक उत्कृष्ट गझल...
प्रेयसी आणि प्रतिभा... दोघीही सारख्याच... कधी चांदणं बरसवणाऱ्या तर कधी उन्हात उभं करणाऱ्या... कंपोजर म्हणून मलाही असंच जाणवतं... "कळेना मला हे कशी वेगळी तू..." म्हणून... प्रियकर "अथांग यमन", मी आणि रोमँटिक वॉल्ट्झ...

"कळेना मला हे कशी वेगळी तू..."

जरूर ऐका आणि आपले मत नोन्दवा....
धन्यवाद.... प्रवरा

विषय: 
प्रांत/गाव: 
Subscribe to RSS - प्रेमगीत