छेडिल्या कुणी सतारीच्या तारा

Submitted by Meghvalli on 22 March, 2024 - 00:09

सांजवेळी अवचित छेडिल्या कुणी सतारीच्या तारा ।
मन माझे धुंद करुन गेला तो मंद स्मृतीगंध वारा ।।
अजुनही तूझा स्पर्श आठवुन उन्मादीते अंग ।
रोमांच दाटते,अंगातून उठतो एक शहारा।।
तु एक शीतल नदी अन् मी तुझा किनारा।
एक दिस सुटणार साथ, मिळणार तू सागरा ।।
चालू चल काही काळ गुंफून हातात हात।
मावळतीस आला ग पहा तो शुक तारा ।।
मनातल्या प्रश्नांची तू आज उत्तरं शोध सखे ।
साचल्या गढुळतेचा स्वच्छ होऊदे पसारा ।।
अंगणात मंद मंद झुलतो शांत गार वारा।
मोरपंखी भावनांचा मनी फुलला पिसारा ।।
डोळ्यांत तुझ्या मी देखिले प्रतिबिंब माझे।
हृदयांत तुझ्या ग मनस्विने मी शोधतो निवारा ।।
हे बंध रेशमाचे आपल्या नात्यांत गुंफलेले ।
चल प्रेमगीत गाऊ हळुवार छेडून हृदयीच्या तारा ।।

बुधवार , २८/२/२०२४ , ०८:२२ PM
अजय सरदेसाई (मेघ )
https://meghvalli.blogspot.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Very sweet