Submitted by mi_anu on 12 October, 2015 - 09:55
(हा धागा काढण्यास लायक नाही असे वाटल्यास काढून टाकावा.)
अगदीच राहवलं नाही म्हणून लिहीतेय.
हे सकाळ मध्ये आयटी आणि भाकर्यांबद्दल लेख लिहीणारे साहेब खरंच आयटीत आहेत का? त्यांच्या लेखनात थोडं सरसकटीकरण आणि विसंगती दिसतात म्हणून.
या लेखांबद्दल चर्चा करायची असल्यास इथे लिहा.
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4688866888234778423&Se...
===================
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5759371515977280688&Se...
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
आमटी आणि भाकरी
आमटी आणि भाकरी
रॉबिनहूड, तुम्ही जे काम करता
रॉबिनहूड, तुम्ही जे काम करता ते तुमच्या आवडीमध्ये येत असेल तर 24 तास तो विचार एंजॉय करायला हरकत नाही. मी जे काम करतो ते माझ्या आवडीचे नाही, बस्स उदरनिर्वाहासाठी करतोय. कधी गरजा भागवण्यापुरते पैसे कुठल्या आवडीच्या कामात मिळाले तर लगेच सोडेन.
इस धंधेमे आना आसान है. लेकिन
इस धंधेमे आना आसान है. लेकिन इससे बाहर पडना मुश्किल.
दुसरा लेख कॉमेंट करायच्या
दुसरा लेख कॉमेंट करायच्या लायकीचा लायकीचाही नाही. फारच विनोदी आहे. पहिला लेख जरा अतिशयोक्ती वाटला तरी त्यातील काही प्रश्न लक्षात घेण्यासारखे आहेत.
खरेतर फक्त आयटी नव्हे तर कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी "खूप" पैसा महत्वाचा की क्वालिटी ऑफ लाइफ़ महत्वाचे हा विचार करावा.
खूप पैसा असला की क्वालिटी ऑप।
खूप पैसा असला की क्वालिटी ऑप। लाईफ ऑटोमॅटिक येतेच ना? ::अओ:
रॉबीनहूड माझ्या दृष्टीने
रॉबीनहूड माझ्या दृष्टीने क्वालिटी ऑफ लाइफ मध्ये पुष्कळ वेळा पैशाने विकत न घेता येणाऱ्या गोष्टी येतात….
वाहता धागा झालाय. माझी विचार
वाहता धागा झालाय.
माझी विचार मौक्तिके वाहून गेली.
हो खरेचः( सेव्ह केली होती का?
हो खरेचः(
सेव्ह केली होती का?
वाहताच काढला होता की
वाहताच काढला होता की अॅडमिनने वाहता केला?
दरवेळी सुख बोचतच असा का
दरवेळी सुख बोचतच असा का अट्टाहास असतो लेखांचा कळत नाही. म्हणजे गावाकडची साधी भाकरीच सुखी करू शकते. शहरातली चपाती पिझ्झा वगैरे सुखी करू शकत नाही. असा काहीतरी निराशाजनक सुर आजकाल कुठेही ऑनलाईन वाचल कि दिसतोच. आठवणीत रमणे हीच सुखाची व्याख्या झालीये आहे का?
परदेशात गेला कि आई वडिलांशी क्रुतघ्न, पिझ्झा खाल्ला कि संस्क्रुती बुडाली, आयटीत काम केल कि भाकरी साठि आई महाग असा तद्दन फिल्मी टोकाचा विचार का?
नॉस्तालजियात रमण समजू शकते मी. पण अधिक सुख उप्भोगणे, पैसा कमविण वाईटच ही व्रुत्ती काही समजत नाही.
सीमा +++१
सीमा +++१
मी च गप्पान्चे पान काढले होते
मी च गप्पान्चे पान काढले होते नजरचुकीने.
सीमा एकदम सहमत.आपल्याकडे लोकांना सुखात आहोत हे मानायला भीती वाटते दृष्ट लागेल म्हणून.यात मी ही आले.
दृष्ट लागेल म्हणून. मग तुम्ही
दृष्ट लागेल म्हणून.
मग तुम्ही लगेच दृष्ट काढून टाका, ऑन लाईन, जशी ऑन लाईन गणपती पूजा असते तशी.
म्हणजे मग वाट्टेल तेव्हढे सुख एन्जॉय करा.
अधून मधून लिहीत जा, पूर्वीचे दिवस आठवतात. आज जरी भारी शूज घातले तरी पूर्वी ते भर उन्हात अनवाणी चालणे, त्यातहि मज्जा वाटणे वगैरे! (बाहेर टेंप्रेचर ७० डिग फॅ होते नि तुम्ही ५ स्टार हॉटेलच्या लॉनवर चालत होता, हे कुणाला कशाला समजायला पाहिजे?)
मी सुखाला पाळले बांधून दारी
मी सुखाला पाळले बांधून दारी माझीया
ते सुखाने झोपले मी गस्त द्याया जागलो...
अगदी असेच झालेय आजकाल लोकांचे.... मग कधीतरी जुन्या दिवसांचे उमाळे येतात आणि मग लोक लेख पाडत बसतात!
दरवेळी सुख बोचतच असा का
दरवेळी सुख बोचतच असा का अट्टाहास असतो लेखांचा कळत नाही.
>>>>
सुख बोचतं एखाद्याला असे आपण म्हणने म्हणजे समोरची व्यक्ती पिझ्झा खातेय तर सुखातच आहे हे आपण ठरवणे हे देखील चुकीचेच ना
म्हटलं तर सुख पिझ्यातही असते आणि भाकरीतही असते, म्हटले तर सुख पिझ्यातही नसते आणि भाकरीतही नसते, सुख सुखाच्या आठवणी जपण्यात असते..
माझा कालचा प्रतिसाद वाहिला
माझा कालचा प्रतिसाद वाहिला का?
ईसकाळम्ध्ये छापलेलं सगळं फालतू, रद्दी असतं. ते वाचून, त्यावर विचार करून वेळ अजिबात वाया घालू नका.
अधिक सुख उप्भोगणे, पैसा कमविण
अधिक सुख उप्भोगणे, पैसा कमविण वाईटच ही व्रुत्ती काही समजत नाही
>>
+१ अगदी हेच म्हणायचे होते.
केवढ ते गरीबीच कवतिक! लुळीपांगळी श्रीमंती अन धडधाकट गरीबीच्या तद्दन टाकाऊ सुभाषितावर आधारलेलं तत्वज्ञान आयटीच्या नावावर खपवण्याचा आत्यंतिक केविलवाणा प्रयत्न!