पुणे ते कन्याकुमारी सायकल मोहीम
पुणे ते कन्याकुमारी सायकल मोहीम
पुणे - दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रदुषणाच्या भीषण समस्येच्या पार्श्वभूमीवर सायकलचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा या हेतूने पुण्यातील काही सायकलप्रेमींनी पुणे ते कन्याकुमारी अशा सायकल मोहीमेचे आयोजन केले आहे. ही मोहीम सारसबाग येथून २१ फेब्रुवारीला प्रस्थान करणार असून महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू अशा राज्यांतून प्रस्थान करत १६५० किमी प्रवास करून विवेकानंद स्मारक, कन्याकुमारी येथे सांगता करण्यात येईल.