Submitted by poojas on 26 May, 2014 - 01:17
तशी ती ही कविता जरासा बदल
जिव्हारी रूते ती म्हणावी गझल..
कुणी शब्द शब्दांत घायाळ होतो
कुणी सांगता शेर होते कतल
कुणी प्रेम विरहात अव्यक्त होता
सुचे जी व्यथा ती म्हणावी गझल..
कधी शायरी केधवा फक्त ओवी
कधी चार ओळीतली दरमजल
जशी पूर्ण होता कळे चित्त आत्मा
उणे वृत्त मात्रा निनावी गझल..
मला काय भावे तिच्या कौतुकाचे
कडू बोल माझे जिथे बेदखल
मिळे दाद जेव्हा मुखाने कुणाच्या
खरी पूर्ण झाली म्हणावी गझल !!
poojaS..
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
मिळे दाद जेव्हा मुखाने
मिळे दाद जेव्हा मुखाने कुणाच्या
खरी पूर्ण झाली म्हणावी गझल !!..............................वाह!
धन्यवाद !!
धन्यवाद !!
कधी चार ओळीतली दरमजल<<< ह्या
कधी चार ओळीतली दरमजल<<< ह्या ओळीचा विस्तार करायला हवा. फार सुरेख ओळ व कल्पना आहे.
छान
छान
छान.... बेफींशी सहमत.
छान....
बेफींशी सहमत.
काव्य खूप आवडले.
काव्य खूप आवडले.
धन्यवाद पण विस्तार म्हणजे
धन्यवाद
पण विस्तार म्हणजे नेमकं काय करु बेफिकिर भाऊ??