" गझल"
तशी ती ही कविता जरासा बदल
जिव्हारी रूते ती म्हणावी गझल..
कुणी शब्द शब्दांत घायाळ होतो
कुणी सांगता शेर होते कतल
कुणी प्रेम विरहात अव्यक्त होता
सुचे जी व्यथा ती म्हणावी गझल..
कधी शायरी केधवा फक्त ओवी
कधी चार ओळीतली दरमजल
जशी पूर्ण होता कळे चित्त आत्मा
उणे वृत्त मात्रा निनावी गझल..
मला काय भावे तिच्या कौतुकाचे
कडू बोल माझे जिथे बेदखल
मिळे दाद जेव्हा मुखाने कुणाच्या
खरी पूर्ण झाली म्हणावी गझल !!
poojaS..