हितगुज ग्रूप
स्वंपाकासाठी बाई हवी आहे
कृपया स्वंयपाकच करणारी स्त्री हवी आहे. दोनच माणसे आहेत.
महाराष्ट्रीयन स्वंयपाक करणारी हवी आहे एका आजी आजोबांना जे वाशीत रहातात.
१) मुख्यतः मध्यमवयीन वयाची व “खरोखरच” स्वंयपाकचा अनुभव असणारी बरी. आजी त्यांचा काही आवडीचं शिकवेल जर येत नसेल तर पण अगदीच नन्ना असणारी नकोय.
२) मध्यमवयीन स्त्री हवीय ह्याचे कारण , तरुण बाया सतत सुट्ट्या घेतात त्यांच्या स्चतःच्या मुलांसाठी आणि आजींना होत नाही उभे राहून काह्र्री करणे. महिन्यतल्या सुट्ट्या देतील व अडिनडिला पण वारंवार शक्य नाही म्हणून मध्यमवयीन.
#मधुमेहीनो_गोड_खा
#मधुमेहीनो_गोड_खा
मला गेली २० वर्षांहून जास्तकाळ मधुमेहाची व्याधी जडली आहे.
मला माधुमेहाचे निदान झाले तेंव्हा पासून डॉक्टरांनी माझ्या गोड खाण्यावर पथ्य म्हणून बंदी घातली आहे.
पण गेली २० वर्ष माझा मधुमेह मी नियंत्रित ठेवलेला आहे.
आणि मला गोडाची इतकी प्रचंड आवड आहे की , दुपारच्या व रात्रीच्या जेवणानंतर मला काहीतरी गोड खाल्या खेरीज चैनच पडत नाही.
कोणाला चांगले कॉऊन्सेलर/थेरपिस्ट माहित आहे का भारतात
कोणाला चांगले कॉऊन्सेलर/थेरपिस्ट माहित आहे का भारतात ज्यांना NRI clients सोबत काम करायची सवय आहे? इथे (US )जे थेरपिस्ट आहेत त्यांना भारतीय कुटुंबांचे डायनॅमिकस समजणार नाहीत असं वाटतंय. बरेच साठलेले grievances आहेत, आणि नवरा थेरपी वगैरे थोतांड असं मानणारा आहे. त्यामुळे मला सुरुवात माझ्यासाठी करायची आहे. couples counselling पुढे लागेल, अस वाटतंय.
मराठी भाषा गौरव दिवस २०२५
मराठी भाषा गौरव दिवस २०२५
इथेच आहे
काचेची सुंदर खिडकी
भिंतीला लटकत आहे
देह सोडून गेला माझा
पण आत्मा इथेच आहे
छोटीशी चिऊ बागडते
ती बड-बड ऐकत हसतो
ती खांदे उडवत हसूनी
जणू मलाच गिरवत आहे
देह सोडून गेला माझा....
हे प्रवास जीवन माझे
जणू आठवणींचा ढीग
तुटलेल्या स्वप्नांसोबत
आनंद ओंजळीत आहे
देह सोडून गेला माझा....
मज नकोच होती शांती
की नकोच कर्कश नाद
मायेने घर भरण्यात
ते प्रेमळ संगीत आहे
देह सोडून गेला माझा....
राहत्या घराचे रंगकाम करण्याबाबत माहिती हवी आहे
राहत्या घराचे ( फ्लॅट) रंगकाम करायचे आहे . काय पूर्वतयारी , काळजी घ्यावी ? काही विशेष फेरफार करायचे नाहीत , फक्त ४ -५ खिळे ठोकायचे आहेत . कोणत्या प्रकारचा रंग टिकाऊ आणि मेंटेनन्ससाठी सोपा आहे.
आणि हो ब्राईट लाईट साठी सध्या काय पर्याय आहेत . फॉल्स सिलिंग नाही . माबोकर कृपया टिप्स द्या . तुमचे अनुभव शेअर करा .
धन्यवाद .
संवाद
नवी केलीस तू सुरुवात आई
कशी आहेस वैकुंठात आई?
अकल्पित हे कसे घडले अचानक?
असह्य आहे हा आघात आई...
तुला सोडावयासाठीच केला
यमाने वेदनेचा घात आई
मला तर जाणवत आहे अजूनी
तुझा पाठीवरीचा हात आई
मनी काहूर उठते भावनांचे
स्मृतींची मग होते बरसात आई
नकोसा वाटतो श्रावण असा हा
तुझा उत्साह नाही ज्यात आई
जखम भरणार नाही ही कधीही
हा घाला खोल आहे आत आई
मायबोली गणेशोत्सव २०२४
मायबोली गणेशोत्सव २०२४
दुःखद घटना २
Pages
