हितगुज ग्रूप

मंद नाही तेवणारी वात मी

Submitted by निलेश वि. ना. शेलोटे on 22 September, 2020 - 13:32

शोधतो काही कुठे माझ्यात मी
हा बरा माझा मला अज्ञात मी

भोग सारे भोगणे आहे इथे
का कुणाला दाखवावे हात मी

टाळली नाही उगा मी माणसे
टाळले सांगू किती आघात मी

पाळला अंधार मी माझ्या घरी
पाळली झोकात आहे रात मी

भीड ठेऊ मी हवेची का उगा
मंद नाही तेवणारी वात मी

चर्चिले जाते असे काही मला
रान सारे जाळणारी बात मी

निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त :- मेनका
(गालगागा गालगागा गालगा)

इयरफोन आठवण

Submitted by राधानिशा on 5 September, 2020 - 14:47

इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स किंवा तत्सम वस्तूंचं आश्चर्य किंवा चकीत होणे असं होणं कमी होत चाललं आहे .. नवी पिढी तर मोबाईल बघतच पाळण्यातून रांगणे आणि पावलं टाकणे या फेज मध्ये पोहोचते आहे .. चिंटूच्या एका स्ट्राईपमध्ये चिंटूचे पप्पा विचारतात नवीन फोन आणला की मला त्यातलं शिकवशील ना ... चिंटू हसू लागतो , म्हणतो त्यात काय शिकायचं असतं ? ज्या मोबाईल कॉम्पुटरसंबंधित गोष्टी आधीच्या पिढीला थोडी शिकून घ्यावी लागतात ती आताची 5 - 7 वर्षांची मुलं सहज करतात जणू काही पोटातूनच शिकून आली आहेत मोबाईल वापरणं ... त्यांना कधी कुठलं गॅझेट चकीत करू शकेल असं वाटत नाही ...

शब्दखुणा: 

कोविड-१९ चा उद्रेक झालेला असताना पॅनिकनेस कसा कमी करावा

Submitted by DJ.. on 3 September, 2020 - 07:57

काल, माझा मित्र अमितचा फोन आला. बर्‍याच दिवसांनी कामाव्यतिरिक्त बोलायला त्याने फोन केलेला. या आधी आम्ही सगळे मित्र कुणाच्या वढदिवसाला म्हणा, कुणी गाडी घेतली म्हणुन म्हणा किंवा इतर कसल्याही सुख-दुखाच्या क्षणी एकत्र भेटायचो, खुप हसी-मजाक करुन वेळ सत्कारणी लावायचो पण गेल्या ५ महिन्यात सर्वकाही बदललं आहे. कुणाची साधी चौकशी करायलाही वेळ मिळत नाही कारण वर्क फ्रॉम होम मुळे तेवढा वेळ मिळतच नाही.

# पूमाराना

Submitted by mi manasi on 25 August, 2020 - 00:40

# पूमाराना
मी मायबोलीवर नविन आहे (आधीच सांगितलेलं बरं!). तर, पूमाराना शब्दप्रयोग वाचल्यावर जाणून घ्यावसं वाटलं, कशी होती पूर्वी मायबोली?
फार फार वर्षापूर्वीची गोष्ट....
सांगाल मला?

शब्दखुणा: 

मुंग्यांचा बंदोबस्त कसा करावा

Submitted by Priya ruju on 17 August, 2020 - 14:35

घरात प्रचंड प्रमाणात काळ्या मुंग्या झाल्या आहेत. खात्रीशीर घरगुती ऊपाय आहे का ?

मी आसवांना रांधून आलो

Submitted by निलेश वि. ना. शेलोटे on 17 August, 2020 - 08:08

मोळीत स्वप्ने बांधून आलो
बाजार माझा मांडून आलो

जाणीव होती केव्हा भुकेची
मी आसवांना रांधून आलो

लाजून गेलो का वेदनांना
हासून खोटे सांगून आलो

लावू नको तू दारास आता
दे ना निवारा लांबून आलो

जा तू म्हणाले होते जरीही
दारी कसा त्या थांबून आलो

खाते मनाला जे सांजवेळी
मी त्या घराशी भांडून आलो

सारे निघाले काढून फोटो
होतो मला मी टांगून आलो

निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त:- स्वानंदसम्राट
(गागालगागा गागालगागा)

पिणे म्हणूया पुरे अता

Submitted by निलेश वि. ना. शेलोटे on 6 August, 2020 - 07:23

कशास राखू धुरे अता
पळून गेली गुरे अता

फिरून जाऊ घरी कसे
घरी कुणी का उरे अता

बळेच ओठी हसू जरी
उरात मीही झुरे अता

कुणी न होते जगायला
तुझा सहारा सुरे अता

नशा न येते मलाच की
पिणे म्हणूया पुरे अता

ठिसूळ स्वप्ने असेल ती
निलेश झाली चुरे अता

निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त:- नृपात्मजा
( लगालगागा लगालगा )

भान तुझे तू सावर आता

Submitted by निलेश वि. ना. शेलोटे on 30 July, 2020 - 01:57

घेत सुखांचे गाजर आता
काय करू मी जागर आता

भाव मनाचे का हरवावे
का मन झाले सागर आता

ती छळणारी सांज अताशा
भासत नाही कातर आता

टाळत गेलो आर्जव सारे
फार उरी ना पाझर आता

मीच मलाही बोजड झालो
भान तुझे तू सावर आता

कोण कुणाचे रिक्त घरा या
जा निघ जा रे आवर आता

निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त :- चंपकमाला
(गालल गागा गालल गागा )

UK पासपोर्ट रिन्युअल

Submitted by सियोना on 27 July, 2020 - 02:48

भारतातून कोणी UK पासपोर्ट renew केले आहे का? Countersignatory द्यावे लागते त्यासाठी भारतीय पासपोर्ट असणारी व्यक्ती चालते का?

‘रफाल’ येतंय!

Submitted by पराग१२२६३ on 25 July, 2020 - 11:39

फ्रान्सकडून भारतीय हवाईदलासाठी अत्याधुनिक 36 ‘रफाल’ लढाऊ विमाने खरेदी केली जात आहेत. तत्संबंधीचा करार दोन्ही देशांदरम्यान सप्टेंबर 2016 मध्ये झाला होता. त्यापैकी पहिली काही विमाने जुलै 2020 च्या अखेरीस भारतात दाखल होणार आहेत. त्याआधी भारतीय हवाईदलाच्या गरजांनुरुप फ्रान्समध्येच घडवल्या गेलेल्या ‘रफाल’वर गेल्या दोन वर्षांपासून भारतीय लढाऊ वैमानिक, तंत्रज्ञ आणि अभियंत्यांना आवश्यक ते संपूर्ण प्रशिक्षण दिले गेले आहे.

Pages

Subscribe to RSS - हितगुज ग्रूप