Submitted by निलेश वि. ना. शेलोटे on 22 September, 2020 - 13:32
शोधतो काही कुठे माझ्यात मी
हा बरा माझा मला अज्ञात मी
भोग सारे भोगणे आहे इथे
का कुणाला दाखवावे हात मी
टाळली नाही उगा मी माणसे
टाळले सांगू किती आघात मी
पाळला अंधार मी माझ्या घरी
पाळली झोकात आहे रात मी
भीड ठेऊ मी हवेची का उगा
मंद नाही तेवणारी वात मी
चर्चिले जाते असे काही मला
रान सारे जाळणारी बात मी
निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त :- मेनका
(गालगागा गालगागा गालगा)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुपर
सुपर
खूप छान! दुसरा शेर विशेष
खूप छान! दुसरा शेर विशेष आवडला.
खूप छान!
खूप छान!
@बन्या @समीर @तेजो धन्यवाद
@बन्या
@समीर
@तेजो
धन्यवाद
सुंदर रचना...
सुंदर रचना...
>>>>>>>टाळली नाही उगा मी
>>>>>>>टाळली नाही उगा मी माणसे
टाळले सांगू किती आघात मी>>>>> सुंदर आहे.
छान. पहिल्या 2 ओळीच जास्त
छान. पहिल्या 2 ओळीच जास्त आवडल्या.
@रुपाली @सामो @नादिशा धन्यवाद
@रुपाली
@सामो
@नदिशा
धन्यवाद
टाळली नाही उगा मी माणसे
टाळली नाही उगा मी माणसे
टाळले सांगू किती आघात मी>> हे अगदी योग्य.
छान गझल.
@रुचा धन्यवाद
@रुचा धन्यवाद