रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाकडे सध्या जगाचे लक्ष लागले आहे. पण त्याचवेळी तिकडे आफ्रिकेमध्ये मालीमधून फ्रेंच सैन्याला आपली मोहीम अर्ध्यावर सोडून माघार घ्यावी लागली आहे, तीही घटना जगात चर्चेचा विषय ठरली आहे. फ्रांसने आपली मोहीम गुंडाळण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर लगेचच तेथील जिहादी गटांच्या कारवायांनी वेग घेतला आहे.
सध्या रशियाच्या युक्रेन, युरोप आणि अमेरिकेबरोबरच्या संबंधांमध्ये बराच तणाव निर्माण झालेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशियाने आपले सुमारे 1 लाख 10 हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर तैनात केलेले आहेत. त्यामुळे युक्रेनवर रशिया आक्रमण करण्याच्या तयारीत आहे, अशी भिती पाश्चात्य देशांकडून व्यक्त होत आहे. मॉस्कोकडून ती शक्यता फेटाळून लावली जात आहे. हा तणाव निवळावा यासाठी यात सहभागी असलेली प्रत्येक बाजू आग्रही आहे. मात्र त्याचवेळी यातील मुख्य घटक असलेले अमेरिका आणि रशिया आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत.
“हिंद-प्रशांत क्षेत्र सुरक्षित, मुक्त आणि खुले ठेवण्यासाठी अमेरिका तिच्या सहकार्यांसोबत कार्य करत राहील”, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन.
"या देशात अग्निशामक किंवा एंब्युलंस पेक्षा डिलिव्हरी बॉय अधिक जलदगत्या येतात" असे एक उपहासात्मक अवतरण काही वर्षांपूर्वी व्हायरल झाले होते.
स्विगी झोमॅटो सारख्या सेवा सध्या फार लोकप्रिय झाल्या आहेत. आपल्यापैकी अनेकांनी त्यांचा लाभ घेतला आहे. पण त्यामध्ये काम करणारे बहुतांश तरुण हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आलेले असतात व जीवनाशी त्यांचा झगडा फार तीव्र असतो. अनेक होतकरू तरुण शाळा/कॉलेज/व्यवसाय सांभाळून उरलेल्या वेळेत हे काम करतात व आपल्या कुटुंबाच्या मिळकतीस हातभार लावतात.
प्रत्येकाचं आयुष्य धावत असतं. धावणार्या आयुष्यात सतत काहीतरी बदलत असतं. आपली चेहरेपट्टी, रंग-रूप काय अगदी आपले शेजारी-पाजारी-नातेवाईक-मित्र-मैत्रिणीही सतत बदलत असतात. जुने जात असतात अन नवे येत असतात. बरीच माणसं घरही बदलतात एवढंच काय गावं, शहरं, देशही बदलतात. स्वभावाला औषध नसतं असं नुसतंच म्हणतात परंतु वेळ-काळ-स्थळ पाहून मनाला मुरड घालत स्वभावही बदलावा लागतो. भारतात तर रस्त्यांच्या नावां पासून ते सरकारी संस्थांची, इमारतींची, पुरस्कारांची नावंच काय अगदी योजनांची नावं बदलण्याचाही उपद्व्याप केला जातो. ठिकाणांची अन शहरांची नावं बदलण्याची तर रीतच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
माणसाला जीवनात कोणत्या ना कोणत्या गोष्टिंचं व्यसन हे असतंच. एखाद्याला वाचनाचं, लिहिण्याचं, गाण्याचं, खाण्याचं, खाऊ घालण्याचं, खरेदीचं, हॉटेलिंगचं, सहलीचं, वाहन वेगाने चालवण्याचं, जीमचं व्यसन लागतं.. तर एखाद्याला तंबाखू, दारू, धुम्रपान, ड्रग्ज यांचं व्यसन लागतं.
वाचण्याचं, लिहिण्याचं, गाण्याचं व्यसन लागलं तर शारिरीक तोटा होत नाही... त्यामुळे या कॅटेगरीतील व्यसनं लागलेली माणसं प्रतिभासंपन्न होत जातात असा माझा तरी समज.
नमस्कार मायबोलीकरहो!
गणेशोत्सव आला की मायबोलीवर सर्वात जास्त उत्सुकता असते ती पाककृती स्पर्धेची!
दरवर्षी संयोजक मायबोलीकरांसमोर आव्हान ठेवतात आणि सगळी कल्पनाशक्ती आणि कौशल्य पणाला लावून अनेक मायबोलीकर उत्साहाने सहभागी होऊन भरभरुन प्रतिसाद देतात.
अनेक शंका-कुशंका, नवनवीन पाककृती, पदार्थांचे रंगीत सजवलेले फोटो आणि शेवटी मतदानाद्वारे स्पर्धेचा निकाल!
पाककृती स्पर्धेचे नियम ठरवण्यापासून ते विजेता घोषित होईपर्यंत सगळ्यांसाठीच ती एक मोहीम झालेली असते.
आणि का नाही होणार..? मायबोली वरचा गणेशोत्सव हा प्रत्येकाला आपल्याच घरचे कार्य आहे इतका आपलासा वाटतो
{ भाग १ - https://www.maayboli.com/node/79721 }
{ अपेक्षित लेखनदुरुस्ती तसेच आवश्यक सुधारणा नक्की सुचवा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. }
___________________________________________________________________