फ्रान्सकडून भारतीय हवाईदलासाठी अत्याधुनिक 36 ‘रफाल’ लढाऊ विमाने खरेदी केली जात आहेत. तत्संबंधीचा करार दोन्ही देशांदरम्यान सप्टेंबर 2016 मध्ये झाला होता. त्यापैकी पहिली काही विमाने जुलै 2020 च्या अखेरीस भारतात दाखल होणार आहेत. त्याआधी भारतीय हवाईदलाच्या गरजांनुरुप फ्रान्समध्येच घडवल्या गेलेल्या ‘रफाल’वर गेल्या दोन वर्षांपासून भारतीय लढाऊ वैमानिक, तंत्रज्ञ आणि अभियंत्यांना आवश्यक ते संपूर्ण प्रशिक्षण दिले गेले आहे.
भारत सरकारने देशाचे संरक्षण करायला राफेल विकत घेतले.
आणि मग त्या राफेलचे रक्षण करायला काही लिंबू विकत घेतले.
सोशलसाईटवर या प्रतापाची फारच खिल्ली उडवली जात आहे. आणि अर्थात ते स्वाभाविकच आहे. जिथे वैज्ञानिक दृष्टीकोन आवश्यक असतो तिथे या श्रद्धा म्हणा वा अंधश्रद्धा, शोभत नसल्याने उठून दिसतात. भले खिल्ली उडवणारे स्वत:च्या दाराखिडक्यांना लिंबाचे तोरणच का लावत असेना, ट्रोलिंगच्या या वाहत्या गंगेत यथेच्छ हात धुवून घेतात. त्यातही जर प्रकरणाला राजकीय झालर असेल तर विचारायलाच नको. समर्थनार्थ दुसरी पार्टीही उतरते आणि तुंबळ ट्रोलयुद्ध पेटते.