भारत सरकारने देशाचे संरक्षण करायला राफेल विकत घेतले.
आणि मग त्या राफेलचे रक्षण करायला काही लिंबू विकत घेतले.
सोशलसाईटवर या प्रतापाची फारच खिल्ली उडवली जात आहे. आणि अर्थात ते स्वाभाविकच आहे. जिथे वैज्ञानिक दृष्टीकोन आवश्यक असतो तिथे या श्रद्धा म्हणा वा अंधश्रद्धा, शोभत नसल्याने उठून दिसतात. भले खिल्ली उडवणारे स्वत:च्या दाराखिडक्यांना लिंबाचे तोरणच का लावत असेना, ट्रोलिंगच्या या वाहत्या गंगेत यथेच्छ हात धुवून घेतात. त्यातही जर प्रकरणाला राजकीय झालर असेल तर विचारायलाच नको. समर्थनार्थ दुसरी पार्टीही उतरते आणि तुंबळ ट्रोलयुद्ध पेटते.
तर आज ऑफिसमध्येही लंचब्रेकला, ईतरवेळी राजकारण या विषयापासून चार बोटे दूर राहणारया बायकाही ईंटरेस्टींग विषय बघून चर्चेत उतरल्या. गाडीला लिंबू बांधणे ही कशी एक अंधश्रद्धा आहे, शिकली सवरलेली लोकंही कशी मुर्ख असतात, प्रवासात लिंबू नेणे पूर्वी कसे गरजेचे असायचे म्हणून ही प्रथा सुरू झाली असावी, पण आता तशी गरज नसतानाही लोकं बिनडोकपणे प्रथा आहे म्हणून करतात, पण आम्ही नाही बाई कधी गाडीला लिंबू लावला वगैरे एकेकाचा आणि एकेकीचा शहाणपना प्रकट होऊ लागला.
मी शांतपणे जेवण उरकले. एकच ढेकर दिला. आणि समस्त स्त्रीपुरुषांना श्रीकृष्णाने भगवदगीतेचा उपदेश द्यावा या थाटात एकच प्रश्न विचारला,
" तुमच्याकडे लहान बाळांची नजर काढणे, दृष्ट काढणे या प्रथा साजरया होत नाहीत का? "
..
..
याचं आपले काहीतरी नेहमी वेगळेच...
ते वेगळे असते रे...
कश्याचेही कश्याला जोडू नकोस रुनम्या...
तुझं जेवण झाले वाटते...
मी म्हटलं, हो ! अजून एक ढेकर दिला आणि उठलो.
तो तृप्तीचा होता
पण खरच बड्या बड्या लोकांनी
पण खरच बड्या बड्या लोकांनी असे करणे हे हास्यास्पद नाही का? म्हणजे आम्ही मारे बाळाची दॄष्ट काढत असू पण आम्ही एक तर अनुकरणीय अशा बड्यांमध्ये मोडत नाही. दुसरं म्हणजे बाळाची दॄष्ट काढताना, लोक कॅमेरे सज्ज करुन प्रक्षेपण करत नाहीत




काहीतरीच बाई आचरटपणा. आणि हे म्हणे नेतृत्व करणार देशाचे.
.
.
_______________________
अशीच एक 'टच्वुड' म्हणायची पद्धत. जर ला़ऊड, लाकडाचे टेबल, खुर्ची नाही सापडली की आपल्याच डोक्याला स्पर्श करुन 'नॉक ऑन वुड' वगैरे म्हणतत
_____________
तो शब्दखूणांमध्ये 'ढेकर' शब्द टाकलाय ते एक बरं केलत
कडूलिंबू काय असत? कडूनिंब
कडूलिंबू काय असत? कडूनिंब असतो, ईडलिंबू असते. ... कडूलिंबू काय असत?
(कडूनिंबाला कडूलिंबू असे फळ येत नाही. त्याला निंबोण्या येतात.)
आणि हे म्हणे नेतृत्व करणार
आणि हे म्हणे नेतृत्व करणार देशाचे. >>
तुमच्या आमच्या सारख्यां पेक्षा हे बघून दिपून जाणाऱ्यांची, कौतुक करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. (वर वर खिल्ली उडवणाऱ्यांपैकी बरेच आतून सुखावलेलेही असतील.)
त्या लोकांना खुष करून तुमचे नेतृत्व योग्य आहे याची ग्वाही देणारी खेळी आहे ही.
खालील बातम्या सांगतील की हे
खालील बातम्या सांगतील की हे प्रकार धर्मनिरपेक्ष आहेत. अर्थात हिंदू धर्म त्यातल्या त्यात मऊ माती असल्याने बोटाने खणायला सोपी आहे.
आपल्यापुरता यावर उपाय म्हणून खिल्ली उडवणाऱ्यांनी स्वतः मेहनत घेऊन सत्तेत येण्याची व स्वतच्या कृतीतून सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा दूर करण्याची गरज आहे.
https://www.dawn.com/news/1303222
https://www.google.com/amp/s/www.theverge.com/platform/amp/2015/4/1/8324...
https://www.google.com/amp/s/www.wired.com/2012/08/space-mission-superst...
एक व्हिडियो पाहायला मिळाला.
एक व्हिडियो पाहायला मिळाला. उ प्रतल्या मेट्रो लाइनच्या उद्घाटनाच्या वेळी आदर्णीय मोदी वाहनाला, दारावर लिंबू मिरची बांधणार्या अंधश्रद्धाळूंची खिल्ली उडवत आहेत.
सगळ्यासमोर ढेकर देणं इज नॉत
सगळ्यासमोर ढेकर देणं इज नॉत गूड मॅनर.
बाकी जाउ द्या. ढेकर दिला या
बाकी जाउ द्या. ढेकर दिला या मुळे बर वाटल. बायको दिली म्हणते. कोकणस्थ आहे ना!
मैं आधुनिक युग की बात कर रहा
मैं आधुनिक युग की बात कर रहा हूँ, एक मुख्यमंत्री ने कार खरीदी, पर कार के कलर के सम्बंध में किसी ने कुछ बता दिया तो उन्होंने कार के ऊपर नींबू , मिर्ची न जाने क्या क्या.... ऐसे लोग देश को क्या नया देंगे ? ऐसी अंधश्रद्धा में जीने वाले लोग सार्वजनिक जीवन का बहोत अहित करते है.." : मोदी जी
भाजप यांना हे असे येडे चाळे
भाजप यांना हे असे येडे चाळे करून खेळवतय आणि विरोधक आणि बाकी जनता तेच घेऊन बसते. बाकी इकॉनॉमी ला घेऊन काही विरोध केला तर मेजोरीटी ला काही कळेल अशीही परिस्थिती नाही त्यामुळे इकॉनॉमी चा कडेलोट होत नाही तोपर्यंत असाच चालणार.
आपल्यापुरता यावर उपाय म्हणून
आपल्यापुरता यावर उपाय म्हणून खिल्ली उडवणाऱ्यांनी स्वतः मेहनत घेऊन सत्तेत येण्याची > पण हम नही सुधरेंगे!!
> पण हम नही सुधरेंगे!!
> पण हम नही सुधरेंगे!!
Submitted by चिवट on 10 October, 2019 - 10:49 >>> विमानाची पुजा करुन त्याच्या चाकाखाली लिम्बु ठेवणे हे दुसर्या व्यक्तीच्या आडनावाचे मुद्द्दाम व वारन्वार विक्रुतीकरण करणे या उपद्रवी व्रुत्तिसमोर काहीच नाही. त्यामुळे सुधारण्याचा प्रश्नच येत नाही. उलट पुढील ३६ विमानांचीही याच प्रकारे पुजा झाली पाहिजे असे माझे मत आहे.
मैं आधुनिक युग की बात कर रहा
मैं आधुनिक युग की बात कर रहा हूँ, एक मुख्यमंत्री ने कार खरीदी, पर कार के कलर के सम्बंध में किसी ने कुछ बता दिया तो उन्होंने कार के ऊपर नींबू , मिर्ची न जाने क्या क्या.... ऐसे लोग देश को क्या नया देंगे ? ऐसी अंधश्रद्धा में जीने वाले लोग सार्वजनिक जीवन का बहोत अहित करते है.." : मोदी जी
Submitted by भरत. on 10 October, 2019 - 09:34 >>>
लढाउ विमानान्चा उपयोग नक्की कसा करायचा असतो हे मोदी, शहा व राजनाथ या तिघान्नी बालाकोट एअरस्त्राइक तुन मे २०१४ आधीच्या सरकारातील बुळचट लोकांना समर्पकपणे दाखवुन दिलेले आहे. त्यामुळे काळजी नसावी.
अरेरे, हिंदू प्रथेची खिल्ली
अरेरे, हिंदू प्रथेची खिल्ली उडवणारे मोदीजी आज हिंदू आदर्श आहेत
चाकाखाली लिंबू ठेवायच मायबोली
चाकाखाली लिंबू ठेवायच मायबोली , फेसबुक इ. वर सुशिक्षित लोक समर्थन करताना पाहून वाईट वाटत.
राजनाथ सिंहानी घरी काहीही श्रद्धा पाळाव्या (अंध शब्द मुद्दाम वापरला नाही कारण तो सापेक्ष आहे याची जाणीव आहे) . तो त्यांचा हक्क आहे.
पण अस सरकारी कामात करण चुकीच आहे यात काय वाद असू शकतो.
आता पाकिस्तान मधे बकर कापल हा युक्तिवाद असेल तर मग काही हरकत नाही
पण अस सरकारी कामात करण चुकीच
पण अस सरकारी कामात करण चुकीच आहे यात काय वाद असू शकतो. आता पाकिस्तान मधे बकर कापल हा युक्तिवाद असेल तर मग काही हरकत नाही>> हे नासाचे शास्त्रज्ञ सुद्धा करतात असा युक्तीवाद केला तर?
(नासाबद्दलच्या बातमीच्या सत्यासत्यतेची मला खात्री नाही)
चाकाखाली लिंबू ठेवायच मायबोली
चाकाखाली लिंबू ठेवायच मायबोली , फेसबुक इ. वर सुशिक्षित लोक समर्थन करताना पाहून वाईट वाटत. >>>
चाकाखाली लिंबू ठेवायच यात नक्की वाईट काय आहे ते सान्गता का राव? त्याने रक्ताचे पाट वाहीले की कुणाच्या कानफाटात बसली? नक्की प्रॉब्लेम काय आहे?
चाकाखाली लिंबू ठेवायच मायबोली
चाकाखाली लिंबू ठेवायच मायबोली , फेसबुक इ. वर सुशिक्षित लोक समर्थन करताना पाहून वाईट वाटत. >> हो हे मलाही कळालं नाही. सुशिक्षित लोक गणपती विसर्जनाचे कसे समर्थन करतात ते समर्थनीय असते का?
भरत ह्यांच्या देशाच्या सर्वोच्च्य नेत्याने राजकारणासाठी का असेना पण प्रत्यक्ष बोलण्यात दुतोंडी असू नये ह्या मुद्द्याला मात्र समर्थन. पदाची गरिमा सांभाळणे आवश्यक आहे.
नक्की प्रॉब्लेम काय आहे?
नक्की प्रॉब्लेम काय आहे?
उत्तर आधीच कोणीतरी दिलंय.
ऐसी अंधश्रद्धा में जीनेवाले लोग सार्वजनिक जीवन का बहोत अहित खरते हैं - नरेंद्र मोदी .
चाकाखाली लिंबू ठेवायच मायबोली
चाकाखाली लिंबू ठेवायच मायबोली , फेसबुक इ. वर सुशिक्षित लोक समर्थन करताना पाहून वाईट वाटत. >>>
चाकाखाली लिंबू ठेवायच यात नक्की वाईट काय आहे ते सान्गता का राव? त्याने रक्ताचे पाट वाहीले की कुणाच्या कानफाटात बसली? नक्की प्रॉब्लेम काय आहे?
>> कारण सरकारी मालकीच्या विमानाला दुष्ट शक्तींपासून वाचवायला लिंबू वापरतात हा चुकीचा संदेश जातोय .
मी वर ही लिहिलय , राजनाथ
मी वर ही लिहिलय , राजनाथ सिंहानी त्यांच्या घरच्या गाडीला कितीही लिंबू वापरले तरी मला काहीही म्हणायच नाही .
कारण सरकारी मालकीच्या
कारण सरकारी मालकीच्या विमानाला दुष्ट शक्तींपासून वाचवायला लिंबू वापरतात हा चुकीचा संदेश जातोय . >>केदार, हळद कुंकू लाऊन विमानांची शस्त्र पुजा केली(आपणही करतो) त्याबद्दल काय मत आहे? ते योग्य आहे का? त्याने सुष्ट शक्ती प्रसन्न होतात असा संदेश जात नाही का?
हळद कुंकू योग्य असेल तर मग लिंबू का नाही?
नांदेडला म्हणे लिंबू ऐवजी
नांदेडला म्हणे लिंबू ऐवजी अंडी फोडतात चाकाखाली.
अंड्यात जीव नसला तरी जीव देण्याची क्षमता, आधीच अंडी मारून घे बये पुढे कुणाचा जीव घेऊ नकोस असा काहीसा तर्क. यात गाडी मालक, ड्रायव्हर आणि इतर कुणालाही मारू नये अशी अपेक्षा असते. लिंबुसुध्दा याच श्रद्धेने चाकाखाली फोडत असतील.
तसं असेल तर आता लढाऊ विमान पायलटलाही मारणार नाही आणि शत्रूलाही. अहिंसा रक्षक विमाने.
कारण सरकारी मालकीच्या
कारण सरकारी मालकीच्या विमानाला दुष्ट शक्तींपासून वाचवायला लिंबू वापरतात हा चुकीचा संदेश जातोय .
नवीन Submitted by केदार जाधव on 10 October, 2019 - 20:10. >>
दुष्ट शक्तींपासून वाचवण्यासाठी लिंबू "बांधतात" असा माझा आतापर्यंतचा समज होता. नवीन माहितीबद्दल धन्यवाद. लिंबू विमानाच्या चाकाखाली चिरडला तर त्याने काय वाईट संदेश जातो तेच कळत नाही. असे करू नये असा कायदा आहे काय ? जगातल्या सर्व देशांकडून त्यांच्या प्रथा आनंदाने व गर्वाने मिरवल्या जातात. हे लिंबू वगैरे चाकाखाली ठेवणे व त्यांना चिरडणे यांने बऱ्याच जणांना मिरच्या (प्रत्यक्षांत त्या प्रसंगात नसताना देखील) झोंबल्या. मग सरकारी कार्यक्रमात विदेशी अतिथीना ओवाळणे, दीपप्रज्वलन करणे इत्यादी प्रकारही थांबवायला हवेत काय? या सर्व आपल्या प्रथा आहेत तशीच ही एक प्रथा आहे.
हा.. आता कुणाला आपल्या देशातील प्रथा इतर देशातील नागरिकांसमोर मांडण्याची लाज वाटत असेल तर त्या स्वभावाला काही औषध नाही.
>>>>>>> मग सरकारी कार्यक्रमात
>>>>>>> मग सरकारी कार्यक्रमात विदेशी अतिथीना ओवाळणे, दीपप्रज्वलन करणे इत्यादी प्रकारही थांबवायला हवेत काय? या सर्व आपल्या प्रथा आहेत तशीच ही एक प्रथा आहे.>>>>>>> पॉइन्ट आहे. परंतु ते लिंबू वगैरे चिरडतात ते वाईट घटना, टाळण्याकरता चिरडले जाते बहुतेक.
शत्रूचा नाश करायच्या रणगाडे, विमानांनी अशी लिंबं चिरडु नयेत अशी माफक अपक्षा.
चाकाखाली लिंबू ठेवणे यात मला
चाकाखाली लिंबू ठेवणे यात मला तरी काही वावगे वाटत नाही. ते यासाठी की त्याने काही नुकसान झालेले नाही. याउलट राजनाथ सिंह यांनी अमुक एक दिवस अशुभ आहे, अमुक दिवस शुभ आहे, त्यादिवशी दिवशी विमान ताब्यात घेऊ असे म्हणून विमानाचा ताबा घ्यायला उशीर केला असता तर मात्र ते वावगे ठरले असते.
स्वागताचा भाग म्हणून ओवाळणे
स्वागताचा भाग म्हणून ओवाळणे आणि एखादी निरर्थक गोष्ट केल्यावर अमुकतमुक प्राप्त होते या अंधश्रद्धेने ती करणे या दोन कृतीत फरक आहे.
अजून एखादे उदाहरण द्यायचे झाल्यास पाचपर्तावनाला कोंबडं मारणे आणि गुप्तधन मिळावे म्हणून बोकड कापणे यात जसा फरक आहे.
असो, पर्सनली मला या लिंबू कृत्यात काही ईशेष वाटले नाही. फक्त वरचे उदाहरण चुकलेय ईतकेच.
तरी ज्या लिंबाचे छान सरबत झाले असते ते फुकट गेल्याचे वाईटही वाटले.
बड्डेला तोंडाला केक फासल्याने अन्नाची नासाडी होतो म्हणून मागे एका धाग्यावर फार ओरडा चालू होता.
ज्यांना ती नासाडी वाटत होती त्यांचे आता मत जाणून घ्यायला आवडेल
चाकाखाली लिंबू ठेवणे यात मला
चाकाखाली लिंबू ठेवणे यात मला तरी काही वावगे वाटत नाही. ते यासाठी की त्याने काही नुकसान झालेले नाही. याउलट राजनाथ सिंह यांनी अमुक एक दिवस अशुभ आहे, अमुक दिवस शुभ आहे, त्यादिवशी दिवशी विमान ताब्यात घेऊ असे म्हणून विमानाचा ताबा घ्यायला उशीर केला असता तर मात्र ते वावगे ठरले असते.
>>>
जी व्यक्ती वरील पहिल्या गोष्टीवर विश्वास ठेवते आणि ती करते ती व्यक्ती वरच्या दुसरया गोष्टीवरही विश्वास ठेवू आणि ती करू शकते. कारण मानसिकता सेम !
त्यामुळे हा बचाव चूक
नवीन Submitted by विक्षिप्त
नवीन Submitted by विक्षिप्त_मुलगा on 10 October, 2019 - 21:55 >>>
सहमत, ते चाकाखाली लिंबू ठेवणे वगैरे पूजेचा भाग होता आणि पूजेत काही विधी असतातच. ते एक शस्त्र असल्यामुळे दसऱ्याच्या दिवशी त्याची पूजा केली गेली. लिंबू चाकाखाली ठेवणे हा त्या पुजेचाच भाग होता.
मग आपल्याच संस्कृतीची लाज बाळगणारे "हा काय गावंढळपणा चाललाय" म्हणून बोंबा मारू लागले.
तेच राजनाथ सिंग जर मौलवी, पुजारी व पाद्री या तिघांना घेऊन साग्रसंगीत 3 तास पूजन करत बसले असते तर याच फुरोगाम्यानि त्यांचे "किती हा सेक्युलर पणा!" असे कौतुक केले असते.
ऐसी अंधश्रद्धा में जीनेवाले
ऐसी अंधश्रद्धा में जीनेवाले लोग सार्वजनिक जीवन का बहोत अहित खरते हैं - नरेंद्र मोदी .
>>>>>
हे मोदींचे वैयक्तिक मत आहे. ते आपले मत प्रत्येकावर लादू शकत नाहीत. श्रद्धेबाबत ते योग्यही ठरत नाही. त्यामुळे मोदींचे हे मत घेऊन बघा त्यांच्या सरकारातील माणसेच काय करत आहेत असा आरोप करणे चूक !
सहमत, ते चाकाखाली लिंबू ठेवणे
सहमत, ते चाकाखाली लिंबू ठेवणे वगैरे पूजेचा भाग होता आणि पूजेत काही विधी असतातच
>>>
याचे काही डॉक्युमेंटेशन आहे का? कुठे ही पूजेची विधी लिखित स्वरुपात आहे का?
Pages