भारत सरकारने देशाचे संरक्षण करायला राफेल विकत घेतले.
आणि मग त्या राफेलचे रक्षण करायला काही लिंबू विकत घेतले.
सोशलसाईटवर या प्रतापाची फारच खिल्ली उडवली जात आहे. आणि अर्थात ते स्वाभाविकच आहे. जिथे वैज्ञानिक दृष्टीकोन आवश्यक असतो तिथे या श्रद्धा म्हणा वा अंधश्रद्धा, शोभत नसल्याने उठून दिसतात. भले खिल्ली उडवणारे स्वत:च्या दाराखिडक्यांना लिंबाचे तोरणच का लावत असेना, ट्रोलिंगच्या या वाहत्या गंगेत यथेच्छ हात धुवून घेतात. त्यातही जर प्रकरणाला राजकीय झालर असेल तर विचारायलाच नको. समर्थनार्थ दुसरी पार्टीही उतरते आणि तुंबळ ट्रोलयुद्ध पेटते.
तर आज ऑफिसमध्येही लंचब्रेकला, ईतरवेळी राजकारण या विषयापासून चार बोटे दूर राहणारया बायकाही ईंटरेस्टींग विषय बघून चर्चेत उतरल्या. गाडीला लिंबू बांधणे ही कशी एक अंधश्रद्धा आहे, शिकली सवरलेली लोकंही कशी मुर्ख असतात, प्रवासात लिंबू नेणे पूर्वी कसे गरजेचे असायचे म्हणून ही प्रथा सुरू झाली असावी, पण आता तशी गरज नसतानाही लोकं बिनडोकपणे प्रथा आहे म्हणून करतात, पण आम्ही नाही बाई कधी गाडीला लिंबू लावला वगैरे एकेकाचा आणि एकेकीचा शहाणपना प्रकट होऊ लागला.
मी शांतपणे जेवण उरकले. एकच ढेकर दिला. आणि समस्त स्त्रीपुरुषांना श्रीकृष्णाने भगवदगीतेचा उपदेश द्यावा या थाटात एकच प्रश्न विचारला,
" तुमच्याकडे लहान बाळांची नजर काढणे, दृष्ट काढणे या प्रथा साजरया होत नाहीत का? "
..
..
याचं आपले काहीतरी नेहमी वेगळेच...
ते वेगळे असते रे...
कश्याचेही कश्याला जोडू नकोस रुनम्या...
तुझं जेवण झाले वाटते...
मी म्हटलं, हो ! अजून एक ढेकर दिला आणि उठलो.
तो तृप्तीचा होता
<< मुद्दाम लिहिले तसे.
<< मुद्दाम लिहिले तसे. स्पेलिंगमध्ये थोडा फेरफार केला तर धागा चालतो असा माझा वुश्वास आहे माझी ष्रद्धा आहे Happy >>
------- सहमत...
विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवायचे... त्याचे फोटो काढायचे, आणि प्रसिद्दी विभागाला (aka IT सेल) त्या अत्यंत क्षुल्लक घटनेला प्रकाश झोतात ठेवण्याचे काम द्यायचे.... जनतेने चर्वण च वाद घालायचा.
याने एक साध्य होते.... विकलांग अर्थव्यावस्थेवर, जॉब मार्केट वर लोक बोलत नाही...
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/26718
इथे अजून ऑप्शन आहेत
>>> याने एक साध्य होते....
>>> याने एक साध्य होते.... विकलांग अर्थव्यावस्थेवर, जॉब मार्केट वर लोक बोलत नाही... >>>
असल्या फालतू गोष्टींवर राळ उठविण्याऐवजी सरकार अपयशी ठरलेल्या गोष्टींवर आवाज उठवावा ही अक्कल विरोधकांना कधी येणार?
लोकसभा निवडणुकीत युवराज राफेल, राफेल बोंबलत बसले होते. बहुसंख्य जनतेला या प्रकाराची माहितीच नव्हती व ज्यांना माहिती होती त्यातील बहुसंख्यांना यात कणभरही रस नव्हता व या व्यवहारात काही काळंबेरं झालंय यावरही विश्वास नव्हता. हे न ओळखता युवराज फक्त राफेल, राफेल बोंबलत बसले आणि शेवटी बँकॉकला जाऊन बसायची वेळ आली.
तुमचे महाराज आज कचरा गोळा
तुमचे महाराज आज कचरा गोळा करायचा अवतार घेऊन आहेत म्हणे, अवतार सम्पला का ?
>>> तुमचे महाराज आज कचरा गोळा
>>> तुमचे महाराज आज कचरा गोळा करायचा अवतार घेऊन आहेत म्हणे, अवतार सम्पला का ? >>>
कचरा संपत आलाय. थोडाच कचरा राहिलाय आता. २०२४ नंतर अजिबात कचरा शिल्लक नसेल.
मग कोणाच्या मालकीचे होते ते
मग कोणाच्या मालकीचे होते ते लिंबू? जनतेच्याच ना?
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 12 October, 2019 - 15:28 >>>
हा एक कठीण प्रश्न आहे.. शस्त्रपूजन करण्यासाठी लिंबुंचा पुरवठा करण्यासाठी निविदा काढल्या की नाहीत ते आपल्याला माहीत नाय बुवा...
>>भाजप यांना हे असे येडे चाळे
>>भाजप यांना हे असे येडे चाळे करून खेळवतय आणि विरोधक आणि बाकी जनता तेच घेऊन बसते. बाकी इकॉनॉमी ला घेऊन काही विरोध केला तर मेजोरीटी ला काही कळेल अशीही परिस्थिती नाही त्यामुळे इकॉनॉमी चा कडेलोट होत नाही तोपर्यंत असाच चालणार.
अगदी बरोबर. कडेलोट झाला तरी फार फरक पडेल अश्यातला भाग नाही. जागतिक घडामोडी आहेतच की त्याचं खापर फोडायला.
भाजप यांना हे असे येडे चाळे
भाजप यांना हे असे येडे चाळे करून खेळवतय आणि विरोधक आणि बाकी जनता तेच घेऊन बसते>>>
जनता फक्त गेल्या 6 वर्षात येडी झाली का???बाकी विरोधक येडे झालेत याच्याशी सहमत, मूर्खासारखे वाट्टेल ते विषय घेऊन बसतात याच्याशीही सहमत
. पण जनतेला सगळे कळते हो, येडे समजू नका. जे येडे समजले त्याना जनतेने भुईसपाट केले.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बघा जनता कोणाला आणते ते. मजा येणारे यंदा. महाराष्ट्र विधानसभेत गेल्या लोकसभेसारखा एकतर्फी मामला नाहीये यंदा. कोण येणार ह्याची भारी उत्सुकता आहे. जनतेवर आहे सगळे शेवटी, कोणाला धोबीपछाड आणि कोणाला डोक्यावर घेते ते बघायचे आता.
रच्याकने, राफाईल वगैरे गोष्टीत जनतेला रस नाही हे काही लोकांना थोडे उशिराच कळले. असो.
राफाईल वगैरे गोष्टीत जनतेला
राफाईल वगैरे गोष्टीत जनतेला रस नाही >> अगदी
म्हणुन महराष्ट्र इधानसभेला पण ३७०/३५अ हाच मुद्दा धरुन बोंबलु रह्यलेत. राज्य गेलं खड्ड्यात पण काश्मीर महत्वाचं
म्हणुन महराष्ट्र इधानसभेला पण
म्हणुन महराष्ट्र इधानसभेला पण ३७०/३५अ हाच मुद्दा धरुन बोंबलु रह्यलेत. राज्य गेलं खड्ड्यात पण काश्मीर महत्वाचं
नवीन Submitted by चिवट on 13 October, 2019 - 20:40 >>>
मग दोन्ही कॉन्ग्रेस व त्यान्चे चेले काय गुत्त्यावर बसलेत? उठवा की रान .. आणा की तुमचे मुद्दे पुढे.. पण असो, थकलेल्यांकडुन व विरोधी पक्ष होण्याची आस बाळगण्यांर्याकडुन काय होणार?
मोदी नाना हे
मोदी नाना हे प्रसिध्दिअतिलोलूप माणूस आहे असं वाटायलंय. देशसेवेपेक्षा वैयक्तिक प्रतिमा उंचावण्यासाठी नाटकं करणारा, महत्त्वाकांक्षी माणूस वाटायलंय. पंप्र झाल्यावरच साफसफाई, मनकीबात, काय्काय काय्काय करत आहे. टृरंपचा भारतीय आवतार वाटायलंय माला.
>>> राज्य गेलं खड्ड्यात पण
>>> राज्य गेलं खड्ड्यात पण काश्मीर महत्वाचं >>>
देश गेला खड्ड्यात, काश्मीर गेलं खड्ड्यात पण माउंटबॅटन महत्त्वाचा, चीन महत्त्वाचा, पाकिस्तान महत्त्वाचा असं म्हणून तशी कृती करणारे एक जण होते.
>>> आणा की तुमचे मुद्दे पुढे.
>>> आणा की तुमचे मुद्दे पुढे.. >>>
राफेल, नोटबंदी, जीएसटी . . . असंख्य मुद्दे पुढे आणलेत . . . पण जनतेला या मुद्द्यात काडीमात्र रस नाही.
Pages