तंत्रज्ञान

अग्नीशमन कवायतीची विस्तारित संकल्पना

Submitted by तुष्कीनागपुरी on 28 March, 2025 - 01:58

अग्निशमन कवायतीचा तुमच्या आयुष्यातला अनुभव तुम्हाला वयाच्या कोणत्या वर्षी मिळाला?
.
मी पर्सिस्टंट सिस्टिम्स च्या नागपुरातल्या नव्या इमारतीमधे माझ्या निर्धारित डेस्कवर काम करत असताना २०१२ मधे म्हणजे वयाच्या सुमारे चाळिसाव्या वर्षी मला हा अनुभव पहिल्यांदा मिळाला होता. (संभाव्य घटना नियोजनाची एक संकल्पना, अग्निशमन कवायत जी जगण्याच्या अनेक पातळ्यांवर मला मदत करतेय तिची ओळख आयुष्याच्या इतक्या पुढच्या पातळीवर मिळावी ही खंत आहे.)
.

मुक्तस्रोत – एक भन्नाट कल्याणकारी संकल्पना – ३

Submitted by तुष्कीनागपुरी on 11 March, 2025 - 00:25

मुक्तस्रोत ही सहकारी तत्वावर चालणारी एक उपयुक्त प्रणाली आहे.
.
या आधीचा भाग१ – https://www.maayboli.com/node/86463
या आधीचा भाग२ - https://www.maayboli.com/node/86464
.

मुक्तस्रोत – एक भन्नाट कल्याणकारी संकल्पना – 2

Submitted by तुष्कीनागपुरी on 11 March, 2025 - 00:19

या आधीचा भाग – https://www.maayboli.com/node/86463
.
मागच्या लेखात मी उल्लेख केला होता १९८० च्या दशकात झालेल्या महत्वाच्या घडामोडीचा आणि नंतर १९९० च्या दशकात आलेल्या मोफत संचालन प्रणालीचा. त्याचे कालानुसार सारांश बघुया.
.
१९८३ – रिचर्ड स्टॉलमॅन यांनी जिएनयू प्रकल्प सुरू केला
१९८५ – फ्री सॉफ्टवेयर फाऊंडेशन तयार केले आणि जिएनयू जिपिएल हा करार शब्दबद्ध केला
१९९१ – लिनस टॉरवाल्ड यांनी लिनक्स कर्नल लिहिले आणि कालांतराने त्याला मोफत उपलब्ध करून दिले
.

मुक्तस्रोत – एक भन्नाट कल्याणकारी संकल्पना

Submitted by तुष्कीनागपुरी on 11 March, 2025 - 00:15

.
एकोणीसशे ऐंशी च्या दशकात युनिक्स नावाची संगणक संचालन प्रणाली लोकप्रिय होत होती. संगणक आपल्या मेंदूपेक्षा अधिक गतीने ठराविक दिलेली कामे करणारे यंत्र आहे असे मानले तर संगणकाला आपली कामे संगणकाच्या भाषेत सांगू शकेल आणि आपल्याशी संवाद साधू शकेल अशी प्रणाली लागते आणि तिला मी संचालन प्रणाली म्हणतोय.
.
युनिक्स अशीच एक संचालन प्रणाली होती. सध्याच्या काळाच्या भाषेत बोलायचे तर आता आपल्याला माहिती असलेल्या संचालक प्रणाल्या म्हणजे मायक्रोसॉफ्ट विंडोज, उबुंटू आणि मॅकओएस या संगणकावर चालणाऱ्या आणि आयओएस आणि एंड्रोइड या मोबाईल वर चालणाऱ्या संचालन प्रणाल्या आहेत.
.

उपग्रह इंटरनेट सेवा आणि भारत

Submitted by निमिष_सोनार on 7 March, 2025 - 00:27

सध्या उपग्रह इंटरनेट सेवा चर्चेत आहे. हयूजेसनेट, वनवेब, आणि स्टारलिंक सारख्या कंपन्या भारतात उपग्रह इंटरनेट आणत आहेत. सध्या, स्टारलिंक आणि वनवेबच्या सेवा लाँच होण्याच्या प्रक्रियेत आहेत. एलोन मस्कची उपग्रह ब्रॉडबँड इंटरनेट सेवा कंपनी "स्टारलिंक", भारतात प्रवेश करणार आहे. स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट आता भारताच्या शेजारील देश भूतानमध्ये उपलब्ध आहे. डिसेंबर २०२४ मध्ये अधिकृतपणे भूतानमध्ये स्टारलिंक सेवा उपलब्ध असल्याची पुष्टी केली आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना दुर्गम भागातही हाय-स्पीड सॅटेलाइट इंटरनेटची सुविधा मिळत आहे.

महाविद्यालयांची घसरणारी गुणवत्ता

Submitted by तुष्कीनागपुरी on 26 February, 2025 - 23:12

आम्ही जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा क्रमिक पुस्तके असायची. वर्गात प्राध्यापक खडू ने काळ्या फळ्यावर शिकवायचे. तेव्हा पण एकविस अपेक्षित आणि गुरूकिल्या मिळायच्या बाजारात, पण त्यांना तितका मान आणि महत्व नव्हते. ज्यांना गांभिर्याने अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी क्रमिक पुस्तकेच अभ्यासाचा आधार घटक होता.

किनेस्थेटिक शिक्षणपद्धती आणि त्यात एआय चा प्रभावी वापर

Submitted by निमिष_सोनार on 22 February, 2025 - 08:26

Kinesthetic learning (स्पर्शज्ञानाधारित शिक्षण) म्हणजे शारीरिक हालचालींवर आधारित शिकण्याची एक पद्धत. या पद्धतीत विद्यार्थी प्रत्यक्ष कृती, प्रयोग आणि हालचालींमधून शिकतात. ही पद्धत विशेषतः अशा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरते, ज्यांना केवळ वाचून किंवा ऐकून शिकणे अवघड जाते. किनेस्थेटिक शिक्षण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी देते, त्यामुळे त्यांची समज आणि स्मरणशक्ती अधिक चांगली विकसित होते. हे शिकण्याचे तंत्र केवळ शाळेतच नव्हे, तर कौशल्य शिक्षण, खेळ, कला आणि तंत्रज्ञान यामध्येही मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरते.

सामाजिक अभियांत्रिकी

Submitted by तुष्कीनागपुरी on 11 February, 2025 - 23:21

असे समजा की मी एक हॅकर आहे.

हॅकर म्हणजे? तोच हो जो तुमचे जिमेल अकाऊंट लंपास करतो, चोरतो, हॅक करतो आणि तुमचा पासवर्ड बदलून तुम्हालाच तुमच्या घरातून बेदखल करतो. तो वाला हॅकर.

मी काही सुपरमॅन नाही बरं का! मला संगणकाबद्दल सखोल माहिती असते आणि त्याहूनही अधिक मला मनुष्याच्या मनोव्यापारांबद्दल माहिती असते आणि मी चतूर असतो.

बिटकॉइन, क्रिप्टो, ब्लॉकचेन.. वगैरे वगैरे म्हणजे रे काय भाऊ ... ?

Submitted by छन्दिफन्दि on 21 January, 2025 - 15:07

चार डिसेम्बरला जगभरातील क्रिप्टोचाहत्यांमध्ये उत्साहाची मोठी लाट उसळली, त्याला कारणही खासच होतं, गेले काही वर्ष क्रिप्टोतज्ञ जे भाकीत करत होते ते प्रत्यक्षात झालं होतं, पहिल्यांदाच एका बिटकॉइनची किंमत शंभर हजार (एक लाख) अमेरिकन डॉलर्सच्यावर गेली होती. कदाचित म्हणूनही बिटकॉइनला डिजिटल सोनं म्हणत असावेत का ? गेल्या दशकभरातला “बिटकॉईन म्हणजे एक निव्वळ बुडबुडा आहे.. “ इथपासून ते “ हे तर डिजिटल सोनंच.. ” हा प्रवास अक्षरश: खाचखळगे, शिखरे, दऱ्या, ह्यातून गेलेला आहे.

शब्दखुणा: 

बिटकॉइन, क्रिप्टो, ब्लॉकचेन.. वगैरे वगैरे म्हणजे रे काय भाऊ ... ?

Submitted by छन्दिफन्दि on 20 January, 2025 - 22:20

चार डिसेम्बरला जगभरातील क्रिप्टोचाहत्यांमध्ये उत्साहाची मोठी लाट उसळली, त्याला कारणही खासच होतं, गेले काही वर्ष क्रिप्टोतज्ञ जे भाकीत करत होते ते प्रत्यक्षात उतरलं, पहिल्यांदाच एका बिटकॉइनची किंमत शंभर हजार (एक लाख) अमेरिकन डॉलर्सच्यावर गेली होती. कदाचित म्हणूनही बिटकॉइनला डिजिटल सोनं म्हणत असावेत का ? गेल्या दशकभरातला “बिटकॉईन म्हणजे एक निव्वळ बुडबुडा आहे.. “ इथपासून ते “ हे तर डिजिटल सोनंच.. ” हा प्रवास अक्षरश: खाचखळगे, शिखरे, दऱ्या, ह्यातून गेलेला आहे.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - तंत्रज्ञान