राहत्या घराचे रंगकाम करण्याबाबत माहिती हवी आहे

Submitted by जयु on 6 October, 2024 - 07:51

राहत्या घराचे ( फ्लॅट) रंगकाम करायचे आहे . काय पूर्वतयारी , काळजी घ्यावी ? काही विशेष फेरफार करायचे नाहीत , फक्त ४ -५ खिळे ठोकायचे आहेत . कोणत्या प्रकारचा रंग टिकाऊ आणि मेंटेनन्ससाठी सोपा आहे.
आणि हो ब्राईट लाईट साठी सध्या काय पर्याय आहेत . फॉल्स सिलिंग नाही . माबोकर कृपया टिप्स द्या . तुमचे अनुभव शेअर करा .
धन्यवाद .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Asian Paints
A) Premium Emulsion
B) Royale

You can call on Company's Customer Care
They will send person to Estimate

एशियन पेंट्स
रॉयल ऍस्पिरिया रंग ( वॉटर बेस्ड प्लास्टिक पेंट) , नंतर वास येत नाही लस्टर रंग सारखा. त्रास होत नाही.
खिळे नंतर मारू शकता की.
ओल किंवा पोपडे येण्याची भिती असेल तर आधी वॉटर प्रूफिंग करून घ्या. Damp ब्लॉक एक हात मारून घेणे योग्य. कलर बुक देतील त्यातले बघून आवडीचे रंग सिलेक्त करा. कंपनीच्या साईट वरून माणूस बोलवून फिक्स कराल तर थोडेसे महाग जाईल पण ठराविक वर्षांची वॉरंटी मिळेल.

Urban company एक पर्याय आहे. माझ्या शेजारी २bhk (1100 sq.ft) Asian Paints Plastic emulsion रु. 35000/ त केले .

नुकतेच पुण्यातील घराचे नूतनीकरण केले तेव्हा रंगकाम केले . रंगकाम करणार्यांनी एशियन पेंट्स रोयाल सुचवले . आधीच लस्टर पेंट होता त्यामुळे जास्त घासणे , रंग उडणे करावी लागले नाही . पेन्ट्स चांगले असतातच पण पुट्टी /primer पण चांगल्या कंपनीची असावी. लस्टर, oilbond हेही करू शकता . पण किंमतीत खूप फरक नसतो .

शेड कार्ड दिले तरी ते काही वेळा जुने असते . मी एशियन पेन्टचे अँप डाउनलोड केले होते त्यातली शेड निवडून तुमच्या घरातील भिंतीवर कशी दिसेल ते फोनवर पाहता येते . रोयालमध्ये फिके कलर उदा व्हाईट , क्रीम लावायला सोपे असतात पण डार्क शेडचा रंग अचूक यायला ३/४ कधी तर याहून जास्त वेळा लावावा लागतो . रंगारी कंटाळा करू शकतात तेव्हा आपण फर्म राहायचे.
खिळे तर रंग लावल्यावरही ठोकू शकता , ते फ्रेमखाली झाकले जातात. नंतर लागल्यास टच अप साठी थोडा रंग ठेवून घ्या .
पण एकूण अनुभवावरून मागचा लस्टर साफ करायला सोपा होता , त्यावर डाग पडला तर पटकन पुसून निघून जातो , त्यामानाने रॉयलचा रंग डाग पुसल्यावर जाईल का अशी भीती वाटते . पाहूया अजून तर रंग छानच आहे . शिवाय एकूण प्रीमियम लुक आहे .

फॉल्स सिलिंग नसल्यास लाईटचे वायरिंग मात्र रंगाच्या आधीच करून घ्या शक्यतो concealed करा . बाजारात सॉफ्ट , वॉर्म व्हाईट , नॅचरल व्हाईट भरपूर पर्याय आहेत. किंवा एकाच चांगली led tube पण भरपूर प्रकाश देते.

कालच आम्ही घरात रंगकाम पुर्ण केले स्वतःच.
मास्कींग टेप्स, जमिनिवर अंथरायची शीट्स, शिडी, फर्नीचर झाकायला मोठी पडद्या टाईप फदकी, ब्रश पुसायला जुनी फडकी, न्युजपेपर्स, हँड ग्लोव्ह्स वगैरे लागतील. सिमेंट (खड्ड्यांत भरायला), पूट्टी वगैरे.
आम्ही निप्पोन पेंट वापरला, ऑडरलेस, वॉशेबल. रंग ठिपके जमिनीवर/शरीरावर, ब्रश रंगावल्या वर हे धुताना सरळ पाण्याने धुता येतात.
केसांना शॉवर कॅप, डोळ्यांना चश्मा, नाकावर मास्क वापरा. जास्त वेळ मास्किंग टेप्स लावण्यात जातो. वायर , बटन पॅनल्स, दार चौकट, ख्हिडकी फ्रेम, लाकडी इन बिल्ट कपाट ह्यांना कडेला लावायला. आम्ही सिलिंग & भिंत ह्यामधे पण मास्क टेप लावला कारण सिलिंग शुभ्र पांढरे आहे, & भिंत क्रिमी ऑफ्फ्व्हाईट. सध्या १ कोणती तरी भिंत आवडीचा रंग आणि बाकी ऑफ्व्हाईट ट्रेंड आहे, आम्ही तसे केलेय.
१ थर मारून झाला की सुकू द्या, मग दुसरा.

यूं तो हमे बेफिजूल बात करने कि आदत नही है, लेकीन क्युं की आपने समझाने के लिये कहा है, तो समझा देते है, क्युं कि हमे अच्छी तरह समझाना आता है..
मगर सोचने वाली बात ये है कि जब तक हमे ये पता नही चलेगा कि समझाना क्या है, तब तक हम क्या समझायें ?

दादा / ताई.
रंग कुठला द्यायचाय ? भिंती कशा आहेत ? ओल आहे का ? चुना कि पीओपी हे काहीच नाही सांगितलेलं.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर्वांना .
झकासराव , Damp Block चे लक्षात ठेवते.
aashu , आम्ही लेबर कडून करून घेणार आहोत . पण सगळ्या स्टेप्सू लक्षात ठेऊ.
सिलिंग शुभ्र पांढरे आहे, & भिंत क्रिमी ऑफ्फ्व्हाईट. सध्या १ कोणती तरी भिंत आवडीचा रंग आणि बाकी ऑफ्व्हाईट ट्रेंड आहे, आम्ही तसे केलेय. >> Same here . हरकत नसेल तर तुमच्या भिंतींचे फोटो दाखवाल का ?
र आ >> : हा हा : सिलिंग शुभ्र पांढरे आहे, & भिंत क्रिमी ऑफ्फ्व्हाईट. साध्या सिंपल सरळ प्लेन भिंती आहेत . बाथरूमच्या भिंतीला थोडी ओल आहे . अब समझाओ Happy

रंगकाम करताना घरातला पसारा कसा मॅनेज करायचा ? काही टिप्स् ?

आम्ही लेबर कडून करून घेणार आहोत . पण सगळ्या स्टेप्सू लक्षात ठेऊ>>> ओके, मास्किंग केले का नाही हे लक्ष द्या नीट, ते आळशीपणा करतात.
हो, आमचा टाकेन फोटो. हा जाला वरील-
Untitled.png

Luster oil based असल्याने साबणाच्या पाण्याने (body wash किंवा shampoo वापरतात) स्वच्छ साफ करता येतो. Asian paints च्या claim प्रमाणे 250-300 वेळा mild साबणाने साफ करू शकतो.
पण तरीही Royal emulsion recommend करेन. कारण oil based clrs काही काळाने पिवळट पडत जातात आणि भिंती वारंवार धुवाव्या लागतात (माझी living room 20X20 आहे. त्याच्या धुण्याची किंमत साधारण rs4000/ प्रत्येक वेळी होते. बाकी घराची लक्षात नाही)
अगदी पांढऱ्याशुभ्र भिंती नको म्हणून मी ivory/ pearl अशी shade लावली होती. पण ती नंतर बऱ्यापैकी पिवळसर होते. इतरांना ते कळत नाही पण आपल्याला मूळ शेड माहिती असल्यामुळे जास्त पिवळसर वाटते.

आशु, हा रंग स्वतः केला असेल तर साष्टांग नमन आणि दंडवत आणि रिस्पेक्ट.
सर्वांनी छान सांगितलं आहेच.माझे 2 आणे.
लॉकडाऊन मध्ये एकदा नुसता रिपेंट/रीटच आणि 2023 मध्ये एकदा पूर्ण रंग असे केले आहे
1. दोन्ही वेळा एशियन पेंट्स साईट वरून बुक केले.त्यांचा माणूस येऊन घराची मापं घेऊन अंदाजे एस्टीमेट देऊन गेला.रंग पहिल्या वेळी नॉर्मल डिसटेंपर दुसऱ्या वेळी Royale Glitz दिला. मॅट जास्त क्लासि दिसतो पण ग्लिट मुद्दाम निवडला कारण घरात रस्त्यावरून प्रचंड धूळ येते.मॅट वर जास्त दिसून येते.
2. घरात पसारा/लूज वस्तू जास्त नसल्यास सोपे पडते.बाकी सरफेस ते नीट प्लास्टिक रोल ने चिकटपट्टी लावून झाकून देतात.भिंतीला खेटून फर्निचर असेल ते पुढे झाकून त्यावर प्लास्टिक सील करून देतात.राहत्या घरात करत असल्यास रोज जमीन साफ करून राहण्यायोग्य करून देतात संध्याकाळी निघण्यापूर्वी.(हे त्यांचे kpi आहे)
3. ग्लिटझ वर एका फोटोच्या झेंडू हाराचा(1 दिवस जुना) डाग पडला तो मात्र कश्यानेच गेला नाही.झेंडू मध्ये नॅचरल ऑईल असेल त्याने पक्का बसला असेल.

आशु, हा रंग स्वतः केला असेल तर साष्टांग नमन आणि दंडवत आणि रिस्पेक्ट>> होय नवरा, मी & लेक (स्मॉल रोलर हाती घेऊन) स्वतःच केले आहे. Happy धन्यवाद. (ऱोलर मुळे शक्य होते, ब्रश ने खूप अवघड आहे, ओघळ येतात.)
अनू- ३ नंबर आयटम साठी- म्हणुन वॉशेबल रंग घ्यायला हवा ना?
मी ivory/ pearl अशी shade लावली होती. पण ती नंतर बऱ्यापैकी पिवळसर होते.>>> अगदी बरोबर मीरा. पण त्याला काही इलाज नसावा. मळखाऊ बिस्किट रंग खोलीत निरुत्साही वाटतो. आणि बाकी हल्का निळा, येलो, लिरील ग्रीन, पीच, बेबी पिंक, परपल हे रंग छान वाटतात पण अख्खी खोली ह्या रंगात का १ वॉल तशी- बाकी ऑफव्हाईट हा ज्याचा त्याचा चॉईस चा प्रश्न.

वॉशेबल लावून दाखवला होता 1 फूट एरियाला.खूप निस्तेज वाटला.लस्टर मध्ये सर्वात वरच्या शेड ला 1 शेड खाली होता ग्लिटझ, तो भिंतीवर लावल्यावर आवडला जास्त.म्हणून तो घेतला.

आशु
फार छान जमलाय रंग.
भारतात भिंतींना लांबी , पुट्टी भरणे आणि लेव्हल करणे हे काम स्किल चे आहे. ते आपल्याला जमत नसल्याने बाहेर द्यावे लागते रंगकाम.
पुट्टी घेताना एशियनचीच हवी असा आग्रह धरा.

Damp block बद्दल कोणीतरी विचारलं आहे.
गुगल करा, बरीच माहिती मिळेल. मला लिमिटेड अनुभव आहे त्याचा.

पिंची मध्ये 2 Bhk ला 50 ते 70 हजार रु खर्च सांगतात एशियन पेंट रॉयल चा
त्यात एखाद्या भिंतीवर टेक्श्चर , एखाद्या रूम मधील एखादी भिंत वेगळ्या रंगात असे काहीतरी करतात.
Damp block वै खर्च ऍड होईल.

हॉल किचन मध्ये पर्ल व्हाइट नामक रंग होता
ऑफ व्हाइट नंतर पिवळसर वाटतो म्हणून नाही घेतला

Sour cream नावाचा एक रंग आहे एशियन पेंट कॅटलॉग ला, तो आवडला.जास्तीत जास्त काम त्या रंगात केलं आहे.साधारण पांढराच, पण अगदी रिन की सफेदी नाही आणि अगदी ऑफ व्हाईट नाही असा मधला दिसतो.

मी हॉल मधे duel tone color scheme करून घेतली. डार्क शेड असल्याने आर्किटेक्ट कडे टीम असते तिलाच काम दिले. कोविड मधे काम केले. तेव्हा स्वस्तात झाले.
आता बेडरूम राहिले आहेत. किचन पण राहिले आहे. या भिंतींना पुन्हा पीओपी करून वॉलपेपर किंवा 3 D पॅनेल्स करायचा विचार आहे. किचनमधे हाफ पॅनेल हाफ oil paint. किचन मधे plastic emulsion heat मुळे toxic gas सोडतो. ते अभिजात unhealthy आहे.

Oil Bond distemper category त येतो. किचन साठी वेगळा पॅनेल लागतो. वरती पण निसर्गाचे फोटो असलेले पॅनेल्स चांगले वाटतील. त्यात मॅट फिनिश युट्यूबवर आहे. बाजारात उपलब्ध आहे का ते माहित नाही.

फॉल सिलिंग शक्यतो घरी करू नये. माणसाला 4 cu m हवा खेळती लागते. ( ASHRAE Handbook) त्यामुळे पूर्वी 10' 6" ही सिलिंगची उंची असायची. मनपा / कलेक्टर ते पाहूनच परवानगी देत. त्या वेळी वेंटिलेटर्स असायचे. गरम हवा निघून जायला. आता 9 फूट उंचीत फॉल सिलिंग केलं कि आजारपणं येतात.

आशु, हा रंग स्वतः केला असेल तर साष्टांग नमन आणि दंडवत आणि रिस्पेक्ट. >> +१ आशू , खूपच छान रंगवलेय तुम्ही. अगदी प्रोफेशनल .
थँक्यू मीरा, अनु , झकासराव , र आ . छान माहिती दिली आहे सगळ्यांनी .