आवाहन - कविता पाठवा : कै. सुचेता जोशी स्मृतीप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा (नवोदितांसाठी)
नमस्कार,
कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धेचे यंदाचे ४थे वर्ष. दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता या स्पर्धेसाठी मागविल्या जातात. त्या कवितांचे काव्यलेखनाचे परीक्षण केले जाते. त्यातील पहिल्या १५ ते २० कवितांचे प्रत्यक्ष काव्यवाचन त्या त्या कवीने सादर करायचे असते. त्यानुसार ५ क्रमांक काढले जातात. आतापर्यंत जवळपास १५० कवींनी यात सहभाग घेतला आहे. आतापर्यंत व्यक्ती, पाणी, निसर्ग संतुलन असे विषय गेले तीन वर्ष दिले होते.