आजकालच्या मालिका

Submitted by मी मधुरा on 13 December, 2012 - 11:47

आजकालच्या मालिकांचे काय चालू आहे ते माहितीच आहे सर्वांना........नव्याने सांगण्याची गरज नसावी त्यामुळे सरळ मुद्द्यालाच हात घालते......काय आहे, आजच्या मालिका, सिनेमे हे आपल्या जीवनावर,मानसिकतेवर किती प्रभाव टाकतात हे मी माझ्या रोजच्या जीवनात अनुभवल आहे. आणि अश्या साठी मला वाटत कि या मालिकेतील पात्र, त्यांचे संवाद, एकमेकांशी असलेली नाती ह्या गोष्टी कितीही अमान्य केल तरी आपल्या हृदयाच्या खूप जवळची असतात.
आता हेच उदाहरण पहा ना... काही दिवसांपूर्वीच माझी मामी आली होती. गोंडे लावलेली ओढणी, झालर लावलेली बाही आणि झगझगीत कापड असा अवतार पाहून तिला विचारलं तर म्हणाली त्या 'इस प्यार को क्या नाम दु?' मालिकेतल्या 'ख़ुशी' सारखी fashion केली आहे म्हणून. आणि तिन मला धर्म संकटात टाकल....हे विचारून कि 'कशी वाटली?'.....झाली का पंचाईत!!! तिच मन राखायला म्हणून हाताची दोन बोट (अंगठा आणि करंगळी ) जुळवून 'छान' आहे अस दाखवलं.
घरात तर रोज 'तू तिथे मी' मधल्या सत्यजित-मंजिरी आणि प्रिया बद्दल चर्चासत्र, विचारविनिमय चालूच असतात.....आज मंजिरी अस म्हणाली, काल सत्यजित तस ओरडला, प्रियानी हे नाव कारस्थान केल, मंजिरीन ४-५ लिटर आश्रु गाळले...वगैरे-वगैरे .
बर नुसत एव्हडच नाही, त्या मालीकांची पुन्हा पुन्हा Recaps पाहून पाहून त्या पात्रांचे संवाद इतके पाठ झालेले असतात कि त्या कलाकारांऐवजी या लोकांना उभ केल तरी काही बिघडणार नाही.....असो, विषयांतर नको.
म्हणजे तात्पर्य काय, तर या मालिका खूप जास्त व्यापून टाकतात आपल्या जीवनाला. म्हणजे काय तर, एखादी गोष्ट केली कि ती कोणत्यातरी मालिकेतल्या कोणत्यातरी पकाऊ पात्राप्रमाणे केली आहे अशी Comment सहसा ऐकायला मिळतेच......तूझ बोलण-वागण एकदम 'राधा'सारख आहे,तू अगदी 'घनश्याम'सारख ओरडतेस, तू अगदी त्या 'देवयानी'सारखी हेअरस्टाईल केली आहेस.....अशी ५५० उदाहरण आहेत पण तेवढा वेळ न माझ्याकड आहे ना वाचकांकडे.

महत्त्वाच अस कि ह्या मालिका ज्या सामान्य माणसाच्या देखील इतक्या जवळच्या बनून जातात त्या तितक्याच चांगल्या असायला पाहिजेत अस मला वाटत. नाती जपण, एकपत्नी असण, स्त्रीमुक्ती ला पाठींबा देण, सत्याचा विजय दाखवण हे त्या मालिकांच ध्येय असायला हव, अस माझ ठाम मत आहे.

तुम्हाला काय वाटत????

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाती जपण, एकपत्नी असण, स्त्रीमुक्ती ला पाठींबा देण, सत्याचा विजय दाखवण हे त्या मालिकांच ध्येय असायला हव, अस माझ ठाम मत आहे. >> कारण?? "मालिका खूप व्यापून टाकतात आपल्या जीवनाला" ... दोष आपला न हा कि मालिकांचा ??!!!

बघायच्याच नाहीत मालिका. सरळ टी व्ही बघणे सोडून द्या. खरंच. काहीतरी बघत बघत जेवणखाण करायचंच असेल तर चांगले चित्रपट, नाटके DVD/VCD/on demand/youtube etc वर बघावीत. निदान त्यातून करमणुक तरी बरी होते. आता काही मालिका चांगल्या असतात - एलदुगो. टाईमपास, संध्याकाळी विरंगुळा म्हणून बरी होती. पण शेवटी आपलं आयुष्य व्यापण्याइतका अधिकार आपणच द्यायचा नाही त्यांना.
हलके घ्या. Happy

आणि अगदीच पहायच्या असतील तर मनोरंजन म्हणून पाहून चांगल्या गोष्टी मनाशी साठवून उरलेलं चॅनल बदलताना किंवा टिव्ही बंद करताना विसरून जावं.

म्हणजे तात्पर्य काय, तर या मालिका खूप जास्त व्यापून टाकतात आपल्या जीवनाला. >>.

बापरे... अशा मालिकांनी व्यापावं येवढं आपलं "जीवन" फालतु आहे?

आपल्याला काय हवय आयुष्यात हे ह्या मालिका ठरवतात? बापरे!!!

आहो, टिव्ही बंद करा, मोकळ्यावर फिरायला जा, शतपावली घाला, इमारती मधे जागा असेल तर तिकडे फिरा, मैत्रिणींशी गप्पांचा फड जमवा, मुलांशी गप्पा मारा, कधी कधी त्यांच्या बरोबर छोटा भीम बघा, एखादा जूना मस्त सिनेमा पहा, जुन्या गाण्यांचे चॅनल लावा, झकास पुस्तक वाचा, मायबोली वर या, मुलां बरोबर खेळा (भले ते मग पत्ते असोत), साबांशी गप्पा मारा, मुलां बरोबर चित्र काढा....

रीमोट नावाची गोष्ट आहे अस्तित्वात. येवढे सगळे होवुन तुम्ही इमाने इतबारे बघताच ना त्या मालिका? होते ना तुमची करमणुक? मग त्यांना का दोष देता.... आपण सगळे मिळुन हे टिव्ही वरचे वेडे चाळे बंद पाडु, त्यांचे टि.आर.पी. कमी करु तेवढा हा निर्बुध्ध प्रकार बंद होइल... नाही तर नाही... असे अनेक चॅनल आहेत जे खुप महत्वाची माहिती देत असतात. ते बघा की. मग ही चर्चा करायला कारणच उरणार नाही.

धनश्री,दक्षिणा मी सहमत आहे तुमच्याशी.

धनश्री, मी सुद्धा ए.ल.दु.गो. पाहायचे. आणि खरच छान होती ती मालिका. इतर मालीकांहून वेगळी.पण अश्या मालिकाही दुर्मिळ झाल्यात आता.

आणि बाकीच्यांनी तर लेक्चर द्यायलाच सुरवात केली राव !!! त्यांना एवढच सांगते कि मी जे लिहिलंय ते नीट वाचा एकदा.......आणि कितीही नाही म्हणाल तरी मनोरंजन हा अविभाज्य हिस्सा आहे हे मान्य करावाच लागेल आणि मनोरंजन हे रोजच्या आयुष्यात मालिकाच करू शकतात, असे मला वाटते.

आज अस एखाद तरी घर दाखवा ज्यात मालिका पहिल्या जात नाहीत.
मालिकांचा प्रभाव माझ्या भोवती असलेल्या लोकांवर म्हणजे, शेजारी-पाजारी, नातेवाईक, मैत्रिणी....या सार्यांवर पडलेला आहे, हे मी अनुभवते. मी मालीकांविरुद्ध नाही बोलतेय, त्यात काय असायला हव त्या बद्दल बोलतेय. पण याचा अर्थ असा नाही कि मी त्या मालिकांच्या प्रभावाखाली आहे.
असो.......प्रतिसाद पाहून, वाचून छान वाटले हे नक्की.

लेक्चर नाही हो... पण हा विचार एकदम सवंग वाटला म्हणुन ही प्रतिक्रिया आली. कोणाला किती महत्व द्यायचं ते प्रत्येकाने ठरवायचं.

आणि कितीही नाही म्हणाल तरी मनोरंजन हा अविभाज्य हिस्सा आहे हे मान्य करावाच लागेल आणि मनोरंजन हे रोजच्या आयुष्यात मालिकाच करू शकतात, असे मला वाटते.>>>
मनोरंजंन फक्त मालिकाच करु शकतात हा विचारच मला न पटणारा आहे. त्यामुळे असो. माझ्या कडुन चर्चे ला पुर्ण विराम.

चूक पदरात घ्या ....

.......आणि कितीही नाही म्हणाल तरी मनोरंजन हा अविभाज्य हिस्सा आहे हे मान्य करावाच लागेल आणि मनोरंजन हे रोजच्या आयुष्यात मालिकाच करू शकतात, असे मला वाटते.<>>मनोरंजनाच्या व्याख्या खरंच पुन्हा एकदा तपासून घ्या.
नाती जपण, एकपत्नी असण, स्त्रीमुक्ती ला पाठींबा देण, सत्याचा विजय दाखवण हे त्या मालिकांच ध्येय असायला हव, अस माझ ठाम मत आहे.<> पुन्हा एकदा चूक. मालिकांचं ध्येय हे जास्तीत जास्त जाहिरातदार पदरात पाडून घेत लोकांना कार्यक्रम बघायला लावणे इतकेच असू शकते. जनरली असते. नॉन फिक्शन मालिका सोडल्यास प्रत्येक टीव्ही प्रोग्रामचे हेच उद्देश असते.

आज अस एखाद तरी घर दाखवा ज्यात मालिका पहिल्या जात नाहीत.
>>> आमच्याघरी कधीही या. आम्ही कुठलीही मराठी हिंदी मालिका दररोज पाहत नाही. Happy इंग्रजी मालिका पाहिल्या तरी ठराविकच. त्यामालिका काही महिन्यांतच संपत असल्याने वर्षानुवर्षे एकही मालिका पाहिलेली नाही.

मनोरंजनासाठी मालिका बघणं वेगळं आणि मालिकांना आयुष्याचा हिस्सा बनवणं वेगळं. असे लोक आपल्या घरात असतील तर टीव्ही किती वेळ बघायचा आणि काय बघायचं यावर बंधनं घालता येऊ शकतात. आजूबाजूला असतील तर "मी मालिका पाहत नाही, माझ्याकडे वेळ नसतो" असे एकदा सांहितल्यावर पुन्हा हे लोक मालिकांविषयी तुमच्याक्डे चर्चा करणार नाहीत. स्वानुभव!!!

नंदिनी, खर सांगताय कि काय ??? असो, तस असेल तर उत्तमच!!!
मोहन कि मीरा, आपण चर्चा करत आहोत न, मग त्यात 'चूक पदरात घ्या' वगैरे काय ग? Sad
प्रत्येकाची बाजू मला ऐकायची आहेच......पण विषयांतर झाल्यासारखे वाटले तुझ्या प्रतिक्रियेतून म्हणून फक्त.
आणि मी बंद केलेलच आहे मालिका पाहण.....पण इतरांचे? ते पाहतातच न???

आज अस एखाद तरी घर दाखवा ज्यात मालिका पहिल्या जात नाहीत.
>>> आमच्याघरी कधीही या. आम्ही कुठलीही मराठी हिंदी मालिका दररोज पाहत नाही. इंग्रजी मालिका पाहिल्या तरी ठराविकच. त्यामालिका काही महिन्यांतच संपत असल्याने वर्षानुवर्षे एकही मालिका पाहिलेली नाही.

>>
आमच्या पण घरी या
आमच्या घरात कुठल्याच मालिका रोज पाहिल्या जात नाहीत

भरतजी Happy
अगदीच टिव्ही पाहिलाच जात नाही अस कस म्हणु मी?
पाहिला जातोच पण आमच्यापैकी कोणालाही काल प्रियाला काय झालं, पिहूला अ‍ॅडमिशन मिळाली की नाही, रामचा आणि प्रियाचा घटस्फोट टळला की नाही हे कळलं नाही तर फरक पडत नाही
हे सांगायचं होतं मला

अरे मग काय!!! तुम्ही तर एकदम जनरलायझेशन करुन टाकलत... की मनोरंजन फक्त आणि फक्त मालिकां मुळेच होते. आहो इतरही कितीतरी गोष्टी आहेत ना!!! मालिकांनी काही शिक्षण वगैरे द्यायचे ठरवले तर मग जाहिरात दार काय करतिल?

इकडे मनोरंजना साठी टिव्ही पहायला कोणाचा विरोध नाहीये... पण त्याला किती महत्व द्यायचे ह्याला मात्र आहे..

जर तुम्ही रोज मालिका पहात असाल तर त्यात गैर काय? गैर काहीच नाहिये

गैरे हे आहे की मालिका पाहुनही तुम्ही त्यांना दोष देत आहात.

काही लोकांची मालिका पहाणे ही गरज असते. माझी आई संध्याकाळच्या ८ ते ११.३० पर्यंतच्या वेग वेगळ्या मालिका पहाते. तीन चार चॅनल वर. पण ती तिची गरज आहे, कारण ती ९०० स्क्वे. फु. च्या घरात एकटी रहाते. बरोबर कोणीच नाही. सकाळी येणारी कामवाली, दिवस भरातले ३-४ फोन आणि संध्याकाळी खाली राउंड मारताना भेटणारी लोकं सोडली तर ती दिवस भरात मानवी आवाजच ऐकत नाही. रोज मी सोडले तर कोण तिची बडबड ऐकणार. मग तिला ह्या मालिकांचाच आधार. पण तरीही ती अ‍ॅडिक्ट नाहिये. आम्ही तिकडे गेलो किंवा कोणी आलं की ती ताबडतोब टिव्ही बंद करते. टिव्ही सुरु ठेवुन वाचते, दुसर्‍या खोलीत बसुन इंटरनेट लावते. पण आवाज चालु ठेवते.

मी तिची कधीच टिंगल केली नाही.

माझा अक्षेप मालिका पाहुनही त्यांना नावे ठेवणार्‍या लोकांवर आहे. अरे पहाताना तुम्ही ! होते ना तुमची करमणूक!! काहीही असो बघताना तुम्ही!!! मग कशाला नावे ठेवता!!!!

आणि नाटका सिनेमातल्या सारख्या फॅशन्स तर येतच असतात. साधं उदाहरण आहे, एकेरी पदर, शीफॉनच्या साड्या, मोकळे केस, जिन्स वर मोठे टॉप घालणे, एकाच बाजुला दोन रंगीत हेअर क्लीप लावणे, चुडिदार सलवार पेक्षा लेगींग्ज घालणे, हे सगळे आपण सिनेमा, मालिकां मधुनच उचलत असतो ना? अगदी आपल्या कॉलेजच्या दिवसातही मीडी, ट्युब स्कर्ट्स हे आपण सिनेमातले पाहुनच उचलले ना!!! तोच सिनेमा आता घरात आलाय.

@भरत मयेकर: एकदम मुद्द्याच बोललात.....

@ रिया:
"पाहिला जातोच पण आमच्यापैकी कोणालाही काल प्रियाला काय झालं, पिहूला अ‍ॅडमिशन मिळाली की नाही, रामचा आणि प्रियाचा घटस्फोट टळला की नाही हे कळलं नाही तर फरक पडत नाही" >>>>> रिया, म्हणजे तू सुद्धा पाहतेस न, 'बडे अच्छे लागते है' मालिका पहातेसच न?

@ अजय जवादे:
"आम्ही टिव्हीच घेतला नाही">>>>>> हि अभिमानानी सांगण्याची गोष्ट नाही. याचा अर्थ बातम्यासुद्धा नाही पाहत का आपण?? कारण जगात घडणाऱ्या ताज्या घडामोडी टिव्हीवाचून कश्या कळणार? असे अज्ञानात राहणे योग्य नाही..... अर्थात हे माझे मत आहे फक्त.

@मोहन कि मीरा:
अग ते ठीकच आहे ना....माझा काय मालिका बघण्यालाच विरोध नाही. तुझी आई मालिका बघते, पण त्या मालिका चांगल्याच असतील न? आज 'तू तिथे मी' सारख्या मालिका तर नसेल न पाहत.....आणि तू जे बोलतियेस त्यावरून मला वाटत कि तू ती मालिका नसशील पाहिलेली. त्या मालिकेमुळे बिघडणाऱ्या भारतीय संस्कृतीचा आजच्या पिढीवर किती वाईट परिणाम होऊ शकतो ह्याची चिंता वाटते. म्हणून मला वाटत कि कथानक योग्य असाव. बाकी काही नाही ग.

जगात घडणाऱ्या ताज्या घडामोडी कळण्यासाठी इंटरनेट आहे की. इंटरनेटवर फक्त तुम्हाला महत्वाच्या वाटणार्‍या बातम्या वाचता येतात. बातम्यांच्या नावाखाली असलेला Breaking News चा त्रास आणि वेळही वाचतो.

@अजय जवादे :
Hmm, Point है Boss !! पण प्रत्येक वेळी थोडी इंटरनेट वापरता येत ? असो, विषयांतर नको.
तुम्ही सगळे जे टीव्ही पाहत नाही त्यांच्या साठी हा Chapter इथेच Close झाला. कारण मालिका पाहणाऱ्या लोकांसाठीच हा प्रश्न आहे. So, leave it.

आमच्या पण घरी या.
आम्ही टिव्हीच घेतला नाही
>>> आम्ही पण!!! अन टीव्ही नाही म्हणून काही वाईटही वाटत नाही मालिका ''मिस'' केल्याच!!!!!! डबल फायदा!!!!!!!!!!!!!! [:)]

बाप्रे. मधुरा, ?संचायामा ह्या धाग्यावर अजून गेला नाहीत का? तिथे जाऊन सगळी भडास काढली की कुठलीही मालिका पाहून लागणार्‍या पापांचे क्षालन होते. Happy मनोरंजनाचा दिव्य खजिना तेथेच असल्याचा भव्य साक्षात्कारही झाल्यावाचून राहणार नाही. तेव्हा एकदा येणेचे कराच!

आज अस एखाद तरी घर दाखवा ज्यात मालिका पहिल्या जात नाहीत.>>>>>>>>>>>आमच्याकडे पण कोणी टिव्ही पाहत नाही, आणि पाहिलाच तर नन्तर वाटते कि ऊगाच वेळ वाया घालवला.

मी या मताशी सहमत आहे. टी.व्ही. ला प्रबोधनाचे छानसे माध्यम म्हणता येईल. म्हणून चागले, स़कारात्मक
दाखवावे. आता ''उच माझा झोका '' नाही का ? त्यानी समाजासमोर धडधडीत सत्य ठेवले आहे. डोळ्यासमोर ध्येयवाद उभा राहतो.

मी रात्रि १० ल घरी पोहोचतो तेव्हा प्रिया राम कपूर रडतच असते... Happy
मग्ग काय टि. व्ही. बंद... ..! आणि गप्पा सुरु... Happy