विबासंच्छुक सदस्यांसाठी एक कार्यशाळा
माबोवर विबासंवर ब-याच साधक बाधक चर्चा झडून गेल्यात. काहींनी आपले अनुभव देखील लिहायला सुरूवात केली आहे. काही सदस्यांना मात्र विबासं हे प्रकरण अजूनही पचायला जड जातय हे दिसून आलय. सर्वांनी जगाबरोबर चालाव, कुणीच मागे पडू नये अशा उदात्त हेतूने अशा सर्व बुज-या विबासंच्छुक सदस्यांसाठी एक कार्यशाळा घ्यावी अशी कल्पना मनी आली आहे.
कार्यशाळेच स्वरूप, अवधी, दिनांक, वेळ, सदस्य शुल्क, आणि मार्गदर्शक कोण असाव यावर चर्चा करूनच कार्यवाही करण्यात यावी. इतर सर्व गोष्टी सर्वानुमते ठराव्यात मात्र कार्यक्रमाच स्थळ पुणे शहर हेच असाव अस सुचवावस वाटत. .
सूचना येउ द्यात.