आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो......................
सलील-संदीप चि ही गझल ऐकताना मलाही कुठेतरी जाणवले
च्यायला गेली ४ वर्षे फेसबुक वर काढली, २५५० मित्र, १७६० ग्रुप चा सदस्य
पण हातात काय?
फेसबुक वर हजार मित्र आणि गावात विचारेना कुत्र ,अशी गत
मग ठरवलं ,आता जरा मायबोली वर जावून बघुया
बघुया मिळते का कोणी जिवाभावाचे?
अरेच्चा ! पण इकडे पाहिले तर सगळीच मारामारी चाललेली ---
कोणी भगवा ,कोणी हिरवा ,कोणी पांढरा शुभ्र ...
पण या झेंड्याच्या पाठीमागे होती मळकट अभ्र ...
प्रत्येक जण आपापला झेंडा घेवून नाचतोय
पण या झेंड्यांच्या रंगांच्या बाजारात आपला तिरंगा हरवलाय ,त्याचे काय रे भाऊ?
कुणी धार्मिक,कुणी नास्तिक ,कुणी विज्ञान-वादी
हरवले जीवन-ध्येय बापुड्या का लागशी यांच्या नादी?
विचार करा आणि प्रतिसाद द्या ...
आपण का आलोय एकत्र इथे?
सोशल साईट्स च्या स्थापनेचा उद्देश काय आणि आपण करतोय काय?
माणसे जोडतोय कि माणसे तोडतोय?
..................................................
+१ रमेश
+१ रमेश .....................मस्त !
खरोखरच विनोदी लेखन आहे हे.
खरोखरच विनोदी लेखन आहे हे.
पण हातात काय? >>> ते
पण हातात काय?
>>> ते तुम्हालाच तपासावे लागेल
फेसबुक वर हजार मित्र आणि गावात विचारेना कुत्र ,अशी गत
>>
कुत्र्याने तुम्हाला विचारावे अशी अपेक्षा आहे का?
कुणी धार्मिक,कुणी नास्तिक ,कुणी विज्ञान-वादी
हरवले जीवन-ध्येय बापुड्या का लागशी यांच्या नादी?
>>> वरील ओळीत त्यान्चे जीवन ध्येय आहे
आपण का आलोय एकत्र इथे?
>>> तुम्हाला अल्झायमरचा काही त्रास आहे का? इथे का आला हे कसे काय विसरला?
सोशल साईट्स च्या स्थापनेचा उद्देश काय आणि आपण करतोय काय?
>>>पहिल्या प्रश्नाच्या उत्तरासाठी १ दाबा, दुसर्या प्रश्नाच्या उत्तरासाठी २ दाबा
माणसे जोडतोय कि माणसे तोडतोय?
>>> आप कतार मे है, कृपया इन्तजार किजीये