नमस्कार,
मला १ महिन्यासाठी अमेरिकेस जायचे आहे, त्यासाठी IDP काढायचे आहे. तर काय प्रक्रिया आहे? (पुणे)
RTO Pune साईटवर जो फॉर्म आहे, तोच भरुन नेला तर चालेल का?
शिवाय प्रवासी विमा कोणता घ्यावा यावरही सल्ला हवा आहे. मार्चमधे जाणार आहे. अजून काही वेळ हातात आहे.
माझी एम एच १२ मला कर्नाटकात एक वर्षासाठी न्यायची असल्यास आरटीओचे काही नियम किंवा टॅक्स असतात का? की डायरेक्ट नेता येते ?
माझ्या मुलीला तिचे (दुचाकी गियर नसलेल्या गाडीसाठी) लर्नींग लायसन्स संपत आल्यामुळे आता परमनंट लायसन्स काढायचे आहे. आळंदी रोडला लायसन्स काढताना एजंट कडूनच काढा असे बर्याच लोकांनी सुचवले आहे. पण दीडशे रुपये फी असताना एजंट लोक ८५ ०/-रु. सांगत आहेत त्यामुळे काय करावे ह्या विचारात आहे. लर्नींग लायसन्स आम्ही स्वतःच काढले होते तेव्हा फार काही त्रास झाला नव्हता. आणि आपण तिथे "न" जाता कोणि ८५०/- मागितले असते तर एक वेळ ठीक होते पण आपण स्वतः जायचेच, १ दिवस घालवायचाच तर एजंटला पैसे देणे जिवावर येते आहे. कोणी स्वत: जावून ते काढले आहे का? खरंच स्वतःच ते काढण्यात फार कटकटी आहेत का?