सर्वांना नमस्कार. कधी कधी एखाद्या कार्यक्रमाला वक्ता म्हणून एखाद्याला बोलावलं जातं. त्याचं भाषण झाल्यानंतर लोकांना प्रश्न पडतो की तो माणूस कोण ज्याने ह्या वक्त्याला बोलावलं! काहीसं तसंच पण वेगळ्या अर्थाने. माझे नांदेडचे आजोबा- श्री. गजानन महादेव फाटक ह्यांचं जगणं बघताना हाच प्रश्न मनात येतो आणि आश्चर्य वाटत राहतं की- बनानेवाले ने क्या खूब बनाया है! अतिशय वेगळं आणि काहीसं दुर्मिळ जगणं ते जगले. कधी कधी ९८ धावांवर एखादी इनिंग थांबते कारण वेळच संपून जातो. फलंदाज नाबादच राहतो. तसं त्यांचं जगणं आहे असं मनात येतं.
फार जुनी गोष्ट आहे. इसवी सन २००० च्या शेवटी आमचं गलबत अमेरिकेच्या पश्चिम किनार्यावर येऊन थडकलं. त्या काळी (फार जुन्या ऐतिहासिक काळाबद्दल असंच बोलतात ना?!) भारतात टर्रर्र टिन्टॅन टिणॅण टिणॅण खर्रर्र असा आवाज करणारे मोडेम वापरून इन्टरनेट उघडून ईमेल्स डाउनलोड करण्याइतकंच वापरलं जात होतं. कारण नेट चा स्पीड हा सुमारे ३ केबिपिएस वगैरे असा मिळायचा! त्यामुळे अमेरिकेत आल्यावर अगागागा एम बिपिएस मधे इन्टरनेट चा स्पीड असू शकतो? हे एक प्रचंड अप्रूप होते.
"काय लहान मुलांसारखं खेळत बसता रे ? बघावं तेव्हा आपला तो कॉम्प्युटर, घरात मित्र गोळा करून बसायचे.. आणि दिवसभर गोंधळ" आई वैतागून ओरडली.
"आई, हे बघ तुला बोर वाटत असेल, पण आम्हाला मात्र एज ऑफ एम्पायर्स खेळायला मजा येते. तुमच्या वेळी काहीतरी वेगळे खेळ असतील.. तुम्ही पण ते खेळत असाल तासंतास.. आठव आठव.." मी आईला उलट प्रश्न केला .
.......प्रिय मायबोलीकर बहुतांश वाचकांनी आपले काॅलेज जीवन अनुभवले असेल तर आपल्या गोड आठवणींना पुन्हा उजाळा द्यायला घेऊन आलो आहे महाविद्यालयीन जीवनाची सफर! चला तर मग या सफरीचा आनंद घेऊया मनमुराद!
"सुर्य जरी मावळला,
तरी त्याचा संधिप्रकाश रेंगाळत असतो!
त्यांचा सहवास जरी संपला;
तरी आठवणींचा सुगंध दरवळत असतो!!"
पहिले प्रेम, पहिला पगार, पहिला पाऊस, नोकरीचा पहिला दिवस... ह्या आणि अशा अनेक गोष्टी पहिलेपणाच्या न विसरण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
पण ह्या व्यतिरिक्त अनेक "पहिल्या" अविस्मरणीय गोष्टी असतात कि ज्या आपण कधीतरी पहिल्यांदाच केलेल्या, पाहिलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या असतात. आणि तेंव्हा हे पहिल्यांदाच असल्याने आपल्याला त्याविषयी काही माहित नसते त्यामुळे कधी थरार तर कधी गोंधळ अशा गमतीजमती घडत असतात. आणि आता आपण जेंव्हा मागे वळून पाहतो तेंव्हा ह्या मजेशीर आठवणी आपल्याला गालातल्या गालात हसायला लावतात. इथे अशाच काही मजेशीर आठवणी आपण शेअर करूया...
बातम्या हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होऊन बसलेला आहे. सध्या तर वृत्तमाध्यमांचा अक्षरशः महास्फोट झालेला आहे. आपण विविध बातम्या रेडिओ, वृत्तपत्रे, टीव्ही आणि आंतरजाल या सर्व माध्यमांमधून ऐकत, वाचत किंवा पाहत असतो. असा एखादाही क्षण जात नसेल, की जेव्हा एखादी बातमी आपल्या पुढे येऊन आदळायची थांबली आहे. काही वेळेस तर हे अजीर्ण होते. एकंदरीत बातम्यांमध्ये नको एवढी संख्यात्मक वाढ झाल्यामुळे त्यांचा गुणात्मक दर्जा मात्र यथातथाच झालेला आहे. या मुद्द्यावर आपण अन्यत्रही यापूर्वी चर्चा केलेली आहे. पण आज तो विषय नाही. आज मी तुम्हाला टीव्हीपूर्व काळाकडे घेऊन जाऊ इच्छितो.
अगदी सहज मनात आलं म्हणून.....
आठवणींच्या रेषा
जाणीवेच्या पटलावर आठवणींच्या रेषा उमटतात. पण रेषा-रेषामध्येही फरक असतो. काही रेषा समुद्रकिनाऱ्यावरच्या रेशमी रेतीत मारलेल्या रेघोट्यांसरख्या असतात. एखादी लाट येते आणि त्या रेषा पुसट होतात. येणारी प्रत्येक लाट त्या रत्नाकराच्या खजिन्यातले शंखशिंपले घेऊन किनाऱ्यावर येते. पण त्या मारलेल्या रेघोट्या मात्र पार पुसून जातात.
काही रेषा मात्र घाटातून दिसणाऱ्या डोंगरावरच्या रेषांसारख्या असतात. डोंगरावरून वाहत येणारे पाणीच या रेषा तयार करतं. आणि त्यावरून जेवढं पाणी वाहून जाईल तेवढ्या या रेषा अजून ठळक होत जातात.
प्रसंग अगदी काल घडलाय असा डोळ्यासमोर आहे...
आमचे दास काका आणि दास भाभी
माझ्या वयाच्या दहा-पंधरा वर्षांपर्यंतचा काळ अदभूत होता. आमच्या कॉलनीतील कुठल्याही घराचा दरवाजा दिवसभर उघडाच असायचा. आमच्यापैकी कुणीही कुणाच्याही घरात (बेल वाजवणं, आत येऊ का? वगैरे विचारणं न करता) थेट स्वयंपाकघरापर्यंत शिरू शकत होतं. आम्ही मुलंच नाही, तर कॉलनीतील महिलावर्गही असाच थेट कोणत्याही घरात अगदी आतपर्यंत शिरू शकत होता.
पंधरा ऑगस्ट ला भारतातील सर्व लोकांबरोबर स्वातंत्र्यदिन साजरा करत असतानाच आमच्या घरात अजून एक आनंद वाहत होता . तो दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल होता , खूप गोडकडू आठवणींचा पिसारा सोबत घेऊन आलेला होता , कारण त्या दिवशी असतो आमच्या लग्नाचा वाढदिवस !यावर्षी हा दिवस आमच्यासाठी अजून खास होता , कारण त्या दिवशी होती, आमच्या लग्नाची दशकपूर्ती !
त्या दिवसभरात सुहृदांच्या शुभेच्छा घेता घेता त्यांच्या कोपरखळ्यांनाही आम्हाला दरवेळी तोंड द्यावे लागते, "असा काय दिवस निवडला तुम्ही लग्नासाठी?" "सगळ्या देशाला स्वातंत्र्य मिळाले या दिवशी आणि तुम्ही मात्र पारतंत्र्यात!"... वगैरे.. वगैरे..