आमचे दास काका आणि दास भाभी
माझ्या वयाच्या दहा-पंधरा वर्षांपर्यंतचा काळ अदभूत होता. आमच्या कॉलनीतील कुठल्याही घराचा दरवाजा दिवसभर उघडाच असायचा. आमच्यापैकी कुणीही कुणाच्याही घरात (बेल वाजवणं, आत येऊ का? वगैरे विचारणं न करता) थेट स्वयंपाकघरापर्यंत शिरू शकत होतं. आम्ही मुलंच नाही, तर कॉलनीतील महिलावर्गही असाच थेट कोणत्याही घरात अगदी आतपर्यंत शिरू शकत होता.
आपल्या आयुष्यात अनेक चांगले वाईट लोक येत जात राहतात. काही ठळकपणे लक्षात राहतात तर काहींसा मागमूसदेखील राहत नाही. काहींशी आपले कुठलेच नाते नसते तरी देखील आपण त्यांचे वेडे होतो. तर तुम्ही अशा व्यक्तींबद्दल वल्लींबद्दल लिहा ज्यांनी तुम्हाला चांगले अनुभव दिले आहे. ज्यांनी तुमच्यावर एक चांगला ठसा उमटवला आहे. मागे वळून भुतकाळात डोकावले असतात त्या व्यक्तीचे स्मरण करताच तुम्हाला जगावेसे वाटते, एक प्रेरणा मिळते!!!!! आलेय ना लक्षात.. समजून घ्या. धन्यवाद! यात प्राणी पण आलेत.