Submitted by हर्ट on 16 May, 2010 - 05:44
आपल्या आयुष्यात अनेक चांगले वाईट लोक येत जात राहतात. काही ठळकपणे लक्षात राहतात तर काहींसा मागमूसदेखील राहत नाही. काहींशी आपले कुठलेच नाते नसते तरी देखील आपण त्यांचे वेडे होतो. तर तुम्ही अशा व्यक्तींबद्दल वल्लींबद्दल लिहा ज्यांनी तुम्हाला चांगले अनुभव दिले आहे. ज्यांनी तुमच्यावर एक चांगला ठसा उमटवला आहे. मागे वळून भुतकाळात डोकावले असतात त्या व्यक्तीचे स्मरण करताच तुम्हाला जगावेसे वाटते, एक प्रेरणा मिळते!!!!! आलेय ना लक्षात.. समजून घ्या. धन्यवाद! यात प्राणी पण आलेत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बी,चांगला विषय ! ज्यांनी
बी,चांगला विषय !
ज्यांनी आपल्यावर एक चांगला ठसा उमटवला आहे, असे लोक बहुधा माझ्या मते तरी आपले आईवडील, घरचे आणि नातेवाईक यापैकींच असतात, आहेत !!
रिचर्ड फाइन मन
रिचर्ड फाइन मन शास्त्रज्ञ.
गौरी देशपांडे लेखिका.
अभय राणी बंग.
आदरणीय व्यक्तिमत्त्वे.
आपल्या आयुष्यावर नेहमी
आपल्या आयुष्यावर नेहमी व्यक्तीच ठसा उमटवतात असं नाही वाटंत मला. सध्या तरी प्रकर्षाने जाणवणार्या २ गोष्टी इथे नमूद कराव्याश्या वाटतात.
माझ्या आयुष्यावर ठसा उमटवणारी (कुटुंबाबाहेरील) संस्था म्हणजे माझी सद्याची नोकरी... आज इथे गेली ७ वर्षं मी काम करतेय.. कंपनीत जॉईन झाले तेव्हा कंपनी खूप छोटी होती आणि मी पण खूप लहान होते, कॉर्पोरेटचा पहिला वहीला अनुभव सुरू होणार होता... तरिही इथल्या अनेल लोकांनी समजावून घेतलं त्यांच्यात सामावून घेतलं. मला इंग्लिश अज्जिबात बोलता येत नव्हतं. (अजूनही तसं फर्ड बोलता येत नाही, पण कामचलाऊ जमतं.) ४ लोकांत मिसळण्याचा आत्मविश्वास मला इथेच मिळाला, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, मॅनर्स, Professionalism, Corporate Etiquettes and many more.
खूप attached आहे मी कंपनीशी. support group मध्ये ४ वर्षं काढल्यावर जेव्हा प्रोजेक्ट मध्ये शिफ्ट झाले तेव्हाही प्रचंड त्रास झाला. कंपनी सोडणं will be the most difficult and painful task for me.
दुसरी आयुष्यावर ठसा उमटवणारी
दुसरी आयुष्यावर ठसा उमटवणारी व्यक्ती आहे. माझी खास मैत्रिण...
गेली १० पेक्षा जास्त वर्षं मी तिला ओळखते. पहिल्यांदा इतकी गाढ मैत्री नव्हती. माझ्या कठिण काळात तिने खूप मदत केली मला. आयुष्य म्हणजे काय आणि त्याच्याकडे कसं पहायचं? नाती म्हणजे काय? हे सर्व शिकवलं. प्रेमाने कुटुंबातली व्यक्ती करणार नाही इतकी माया आणि जिव्हाळा तिने निर्माण केला. मला कुटुंबाचं सुख अजिब्बात मिळालं नाही. विशेषकरून आईचं प्रेम... पण ती प्रेमाने करते तेव्हा असं वाटतं की सख्खी आई अशीच असेल कदाचित.
वाद - विवाद पण खूप होतात आमच्यात पण नात्याचा बेस प्रचंड मजबूत असल्याने छोट्या कारणावरून कधीही नातं तुटण्याचा संबंध आला नाही.
ती एक मैत्रिण असेल तर अजून कोणी मित्रं/मैत्रिण म्हणून असावं अशी गरज भासली नाही.
(No subject)
धाग्याचा विषय अतिषय छान
धाग्याचा विषय अतिषय छान आहे.
प्रथम तुम्ही तुमचे अनुभव लिहा चांगले वाईट दोन्ही.
खूप छान विषय आहे धाग्याचा.
खूप छान विषय आहे धाग्याचा. खरं तर आपले पालक, कुटुंबीय, इतर नातलग, मित्र परिवार यांचा काही ना काही प्रभाव पडत असतोच आपल्या जडण-घडणीवर. पण या धाग्याचे हेडर वाचत असताना एक व्यक्ती डोळ्यांसमोर येत होती, त्या आहेत माझ्या शाळेच्या शिक्षिका. त्यांच्याबद्दल मी इथे आधीच लिहिले आहे सविस्तर, त्यामुळे दुरुक्ती न करता फक्त ती लिंक देते इथे. आजही आम्ही एकमेकींच्या संपर्कात आहोत आणि आजही त्यांच्याशी बोलून खूप मस्त वाटतं, पॉझिटिव्हिटी मिळत रहाते.
http://www.maayboli.com/node/49617