बातम्या हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होऊन बसलेला आहे. सध्या तर वृत्तमाध्यमांचा अक्षरशः महास्फोट झालेला आहे. आपण विविध बातम्या रेडिओ, वृत्तपत्रे, टीव्ही आणि आंतरजाल या सर्व माध्यमांमधून ऐकत, वाचत किंवा पाहत असतो. असा एखादाही क्षण जात नसेल, की जेव्हा एखादी बातमी आपल्या पुढे येऊन आदळायची थांबली आहे. काही वेळेस तर हे अजीर्ण होते. एकंदरीत बातम्यांमध्ये नको एवढी संख्यात्मक वाढ झाल्यामुळे त्यांचा गुणात्मक दर्जा मात्र यथातथाच झालेला आहे. या मुद्द्यावर आपण अन्यत्रही यापूर्वी चर्चा केलेली आहे. पण आज तो विषय नाही. आज मी तुम्हाला टीव्हीपूर्व काळाकडे घेऊन जाऊ इच्छितो.
निंबुडा यांचा पत्रकारितेची कमाल - मांजरीचे सूडनाट्य हा धागा वाचला..
या वरुन या धाग्याची संकल्पना घेतली
सकाळ, नवाकाळ इत्यादी बर्याच वृत्तपत्रांतुन आणि न्युज चॅनल्स च्या माध्यमातुन काही अचाट मजेदार बातम्या प्रसिध्द होतात......त्याला ना आगा असतो ना पिछा असतो..
यात इंडिया टिव्ही नावाचे न्युज चॅनल सर्वात पुढे आहेत......या चॅनल्स च्या हेडलाईन्स तर इतक्या अचाट असतात की हसुन हसुन पोट दुखायला लागते
काही उदा.
![1.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u39831/1.jpg)
![2_1.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u39831/2_1.jpg)
माझ्या चेपू वरच्या एका मित्राने टाकलेले स्टेटस अपडेट " समाजातल्या सर्व थरांमधून एक मागणी होत आहे की सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी दररोज त्यांच्या पेपर सोबत अँटी-डिप्रेसंट गोळयांचा पुरवठा करावा"
खरोखरच आजकाल चांगल्या बातम्या ऐका-वाचायला मिळतात कुठे? टीव्हीवर जाऊद्यात पण वर्तमानपत्रात देखिल चांगल्या बातम्या शोधाव्या लागतात.
मला नेहमीच एक प्रश्न पडत राहिलंय, टिवी वर दिले जाणारे बातम्या हे ऐकण्यासाठी असतं कि बघण्यासाठी हेच क़ळत नाही, काय ते सुटाबुटातली पोरी, काय त्यांचं फाडफाड विंग्रजी बोलणं, मनात इतकं गुदगुल्या होतात, काही विचारुच नका, घरी कोणाला सांगता ही येत नाही आणि सहन ही होत नाही अशी गत होते. असं वाटतं बातम्या बघतच (I mean ऐकतच
)रहावं, बातम्या कधी संपुच नये; निरस, माहित असलेली बातमी ही परत परत पहावसं वाटतं. कित्येक वेळा या बातम्यां च्या पायी माझ्यात आणि सौ मध्ये वाद झालेत. तिला बातम्या झी २४ तास किंवा स्टार माझा वरच्या पहायचे असतात आणि मला CNN IBN.