जीव गुंतलेला भाव मांडलेला
अंधारल्या मनाचा आधार सांडलेला
दिसते तशी समोरी
का काळजात आहे
निघता मला निघेना
हा तीर खोचलेला
अंधारल्या मनाचा.........
रक्ताळल्या मनाला
इकडे दवाच नाही
तिकडे तिच्या नखांनी
हा खेळ खेळलेला
अंधारल्या मनाचा.........
आता हवी नशा ही
मदीरा किंवा धुराची
बुजवायची कशाने
हि भेग काळजाला
अंधारल्या मनाचा.........
जगतो तसाच जैसा
निष्प्राण देह आहे
कर्पुरा परी जळालो
काही न राहिलेला.
अंधारल्या मनाचा.........
--जोतिराम
लिक्खा करे हैं ..तुम्हे रोज ही मगर...
ख्वाहीशोन कें खत तुम्हें भेजेही नही,,,,,,
एनक लगाके कभी पढनां वो चिठीया..
पल्कोन्के पानीमें रखना वो चिठीया,....
तैरती नजर आयेगी जनाब.....
गेला श्रावण मला खूप सुखावून गेला
कारण माझ्याही नकळत
‘ तो ‘ माझ्या आयुष्यात आला.
तो आला माझ्या आयुष्यात
तेव्हा कळलं
यालाच प्रेम म्हणतात.
मग मी वहातच गेले
प्रवाहासारखी खळाळून गात गेले
मी विचारलं त्याला, ” आपण कोण आहोत ?”
तो म्हणाला, ” आत्मा एक असलेली
वेगवेगळ्या ठिकाणी धडधडणारी दोन हृदयं.”
मग आम्ही दोन हृदयांना एक करण्यासाठी धडपडलो
वेळ पडली तेव्हा प्रवाहाच्या विरुद्धही पोहत गेलो.
मग लाभला आयुष्याला एक नवा सूर
कधी आनंदाचा पूर
कधी विरहाची हुरहूर
चिवचिवणारे पक्षी, आभाळातली नक्षी
वाटलं निसर्ग आपल्या प्रेमाला साक्षी……..
……………..
………………
ना मी करतो प्रेम कुनावर.
ना मी झुरतो खास कुनावर
अश्रु नाहीत डोळ्यांमध्ये
कुसळच सलते उगाच सर - सर
ना मी करतो.....
म्हणती मजला उदास का तू
म्हणती मजला भकास का तू
भकास आणि उदास चेहरा
असाच दिसतो पाहता वर - वर
ना मी करतो.....
हसता मी ;" तू उगाच हसतो"
बसता मी ;" का उदास बसतो ?"
खरे बोलता "खोटे" म्हणती
" सांग मला तुज कसली हुर - हुर "
ना मी करतो.....
तु न बोलता, मला समजले
मलाच कळले, मला उमगले.....
आठवल्या मग गोड आठवणी
मन झाले मग पाणी - पाणी
पाहुन हास्य त्या ओठावरचे
तुझ्याबरोबर मनही हसले
तु न बोलता.....
प्रिय सखेगं हसलीस जेंव्हा
बहरले मन तेव्हा - तेव्हा
प्रेम तुझ्या त्या नजरेमधले
तु न खुणवता मलाच दिसले
तु न बोलता.....
वाट पाहिली, आलीच नाहीस.
का गं ? माझी तु झालीच नाहीस.
काय प्रेम ते तुला न कळले
मला समजले मला उमजले.
तु न बोलता.....
---------------------जोतिराम
संध्याकाळच्या त्याच वेळी
आठवण तुझीच आली
क्षणभर माझी पापणी
आसवांमध्ये न्हाली
मला साद देताना
डोळे तुझे खुलायचे
ओठ हसर्या झोक्यावरती
खुप खुप झुलायचे
आठवुन आता काळजामधे
होतय पाणी - पाणी
क्षणभर ......
तीच आठवण येते पुन्हा
गुलाबावाचुन घडलेली
माझा प्रश्न नि उत्तर तुझं
दोन्ही वाचुन नडलेली
डोळ्यामधल्या भावनांना
अधिरता मग आली
क्षणभर ......
एका घराची गोष्ट
ही गोष्ट आहे या चित्रातल्या घराची. अगदी "खेड्यामधले घर कौलारू" म्हणण्यासारखं घर. कौलारू असलं तरी खेड्यातलं नाही. चांगलं रत्नागिरीत आहे. हे घर आहे माझ्या आजोबांचं. खरं तर त्यांच्या वडिलांचं. म्हणजे माझ्या पणजोबांचं.
मला आठवतंय तेव्हापासून माझ्या आजोबांकडे एक सुंदर काठी होती. त्यांना ती कोणीतरी मोठ्या व्यक्तीने भेट दिली होती. नक्षीदार मुठीची, सुबक बाकदार आकाराची, किंमती लाकडाची आणि एकदम ऐटदार! आजोबा आणि त्यांची काठी ह्यांचे अगदी जुळ्याचे नाते होते. जिथे जिथे आजोबा जातील तिथे तिथे ती काठी त्यांच्याबरोबर प्रवास करत असे. मला आणि इतर सर्व भावंडांना त्या काठीचे विलक्षण आकर्षण होते. पण आजोबा तिला जीवापाड जपत. आम्ही खोडसाळ पोरांनी त्यांच्या काठीला हात लावलेला त्यांना बिलकुल खपत नसे.