गुलजार
"हाल चाल ठीक ठाक है"
जनरली आपण गप्पा मारताना सरकार, समाज/लोक यांचा विषय आला, की "पूर्वीपेक्षा आता बेकार आहे" असा टोन आपोआप ऐकू येतो. दहा वर्षांपूर्वी, वीस वर्षांपूर्वी तेव्हाच्या परिस्थितीबद्दल तसेच ऐकू यायचे. मग प्रश्न पडतो की हे सगळे चांगले होते कधी? गुलजार च्या 'मेरे अपने' मधले हे गाणे ऐकले तर पूर्वीही लोक तसेच म्हणत असेच वाटेल.
पंचम (३): टॉप टेन- ऊत्कृष्ट दहा गाणी (माझ्या नजरेतून)
पंचम (३): ऊत्कृष्ट दहा गाणी (माझ्या नजरेतून)
या लेखमालिकेतील भाग १ मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे- "अर्थातच हीच गाणी टॉप टेन का, दुसरी का नाही यावर ऊत्तर नाही.. माझ्या एकंदरीत सर्व पार्श्वभूमी, दृष्टीकोनातून ती तशी आहेत, ईतकेच. प्रत्त्येकाचे कारण वेगळे. काही गाण्यांना वैयक्तीक वा व्यावहारीक आयुष्यातील काही घटनांचे, स्थळांचे संदर्भ आहेत, काहींना तंत्र (टेक्नोलॉजी) चे, काहींना ईतर कसले. मला जो पंचम सापडला तोच तसाच तुम्हालाही सापडायला हवा असा आग्रह नाही, पण एकदा माझ्याही नजरेतून पहा एव्हडीच अपेक्षा."
पंचम (२): 'पंचमयुग'- कारकीर्द (२.४-२.६)
२.४ तंत्र आणि मंत्र.
मंत्र हा स्वयंपूर्ण आहे, कालातीत आहे, अचल आहे; तर तंत्र हे कालानुसार बदलत असते, अधिक सशक्त होत असते. मंत्र स्वतः कुठल्याही तंत्राशिवाय टिकू शकतो असे म्हणता येईल, पण मंत्रच नसेल तर तंत्राला अर्थ ऊरत नाही. तंत्र आणि मंत्राचे हे गणित अचूक साधणार्या कलाकारांची कारकीर्द व्यावसायिक वा व्यावहारीक दृष्ट्या यशस्वी व दीर्घायुषी असते असे अनेक ऊदाहरणांवरून दिसून येते.
माझ्या मनातील 'त्रिवेणी' एक अनोखा संगम.
आज अचानक माझे एक मित्र श्री. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी 'सहज सप्रेम' म्हणून भेट दिलेले,
थोर रचनाकार श्रेष्ठ कवी गुलजार यांचे त्रिवेणी हे पुस्तक हाती आले.
दहा वर्षांपूर्वी वाचून हातावेगळे केलेले हे पुस्तक,आज गतस्मृतींना उजाळा देवून गेले.
पुस्तकात गुलजार यांच्या रचनांचा भावानुवाद कवियत्री शांता ज. शेळके यांनी केलेला आहे.
मेहता पब्लिशिंग हाऊस यांच्या या प्रकाशनाच्या मलपृष्ठावर -
'त्रिवेणी' हा गुलजारांनीच निर्माण केलेला कवितेचा नवा आकृतिबंध.
कोणत्याही भारतीय भाषांतील कवितेत हा रचनाबंध नाही.
हि त्यांची कवितेला देणगीच ! या अल्पाक्षरी कवितेत
लिक्खा करे हैं ..तुम्हे रोज ही मगर....
नॉस्टॅल्जिया.. गुलजार..!
गुलजार.... नाव ऐकलं की आजही एक क्षण खूप मोठा प्रवास करुन येते मी.. काळजाचा ठोका चुकल्यासारखा वाटतो त्या सगळ्या क्षणांच्या आठवणींनी.. गुलजारविषयी हे असं नक्की कशामुळे वाटतं? "ए जिंदगी गले लगाले.." या त्यांच्या शब्दांचा आधार घेत अनेक कडवट क्षणांनंतर आयुष्याला मिठीत घेण्याचा प्रयत्न करत राहिले म्हणुन? मनाच्या तळापासुन जीव पिळवटुन प्रेम करावसं वाटलं तेव्हाही त्यांचे अनेक अनेक शब्द मनात घुमत राहिले म्हणुन? "मुस्कुराऊ कभी तो लगता है, जैसे होठोंपे कर्ज रखा है.." या शब्दांचा शब्दश: प्रत्यय घेतला म्हणुन?