तुला न पडलेली माझी स्वप्नं खुडून टाकताना,
कानात घुमत राहते तू न मारलेली हाक..
आणि तू मला न लिहिलेली पत्र फाडून टाकताना,
डोक्यात रुंजी घालते तुला न आलेली आठवण..
बंद पापण्यांआड उतू चाललेली तुझी स्वप्नं,
आणि शिवलेल्या ओठांमागे अडवून धरलेली साद घेऊन मी चालतेय,
तुझी सोबत न मिळालेल्या या वाटेवरुन..
पण तरीही मनात जपून ठेवेन मी कायम,
तू न केलेलं प्रेम.....
----------------------------
merakuchhsaman.blogspot.com
कृष्ण होण्याची ओढ असणं सहाजिक आहे, स्वाभाविक आहे. कारण ते पूर्णत्व आहे. विलोभनीय, आकर्षक, मोहवणारं, प्रत्येकाला आपलसं वाटून कधीच कोणाचं नसणारं पूर्णत्व! कृष्ण होण्याचा प्रवासही नैसर्गिक प्रवास आहे. अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे. एक एक पाऊल रोज स्वतःला घडवत, संघर्ष करत त्या वाटेवर चालत रहाणं.. हे सगळं प्रवाहाच्या दिशेनेच जाणं आहे.
चूड पेटवली आणि धडाडून उठल्या ज्वाळा
बघता बघता वेढून टाकतील मला असं वाटलं..
माझाच घास घेवू बघण्याइतक्या उन्मत्त..
चोहीबाजूंनी..
अक्राळविक्राळ ज्वाळा...
त्याचा असह्य विरह एकदमच अंगावर आल्यासारख्या..
त्याच्यापर्यंत कधीच पोहचू न शकणारी माझी तळमळ
बाहेर आल्यासारख्या..
त्याच्या आत्ममग्न अनभिज्ञतेला माझ्या प्रेमाची दखल घ्यायला लावण्याच्या अट्टहासासारख्या..
आता व्यर्थ आहे या ज्वाळांच्या तडाख्यातून स्वतःला वाचवणं..
पण ही आग पुरती भस्मही करुन टाकत नाहीये मला..
बचावतेच आहे मी..
असह्य वेदनेत तळमळण्यासाठी..
रोज कणाकणाने मरण्यासाठी...
अजून आहेच बाकी माझं जळणं...
डेनेरस,
चूड पेटवली आणि धडाडून उठल्या ज्वाळा
बघता बघता वेढून टाकतील मला असं वाटलं..
माझाच घास घेवू बघण्याइतक्या उन्मत्त..
चोहीबाजूंनी..
अक्राळविक्राळ ज्वाळा...
त्याचा असह्य विरह एकदमच अंगावर आल्यासारख्या..
त्याच्यापर्यंत कधीच पोहचू न शकणारी माझी तळमळ
बाहेर आल्यासारख्या..
त्याच्या आत्ममग्न अनभिज्ञतेला माझ्या प्रेमाची दखल घ्यायला लावण्याच्या अट्टहासासारख्या..
आता व्यर्थ आहे या ज्वाळांच्या तडाख्यातून स्वतःला वाचवणं..
पण ही आग पुरती भस्मही करुन टाकत नाहीये मला..
बचावतेच आहे मी..
असह्य वेदनेत तळमळण्यासाठी..
रोज कणाकणाने मरण्यासाठी...
अजून आहेच बाकी माझं जळणं...
डेनेरस,
पाऊस पाऊस
चिंब ओला
तुझ्या नजरेत
माझा झुला
पाऊस पाऊस
लपले पान
तुझ्या नजरेत
हिरवे रान
पाऊस पाऊस
गच्च भिज
तुझ्या नजरेत
वेडी वीज
पाऊस पाऊस
पुसले काजळ
तुझ्या नजरेत
भलते वादळ
!!!!!!!
-------------------------------------
merakuchhsaman.blogspot.in
पाऊस पाऊस
चिंब ओला
तुझ्या नजरेत
माझा झुला
पाऊस पाऊस
लपले पान
तुझ्या नजरेत
हिरवे रान
पाऊस पाऊस
गच्च भिज
तुझ्या नजरेत
वेडी वीज
पाऊस पाऊस
पुसले काजळ
तुझ्या नजरेत
भलते वादळ
!!!!!!!
-------------------------------------
merakuchhsaman.blogspot.in
Created two threads by mistake. Deleting this one. Sorry for the inconvenience.
तुझ्या घरात पाऊल टाकतानाच माहिती होतं,
हा काही आपला कायमचा मुक्काम नव्हे..
पण माझ्या विदग्ध आत्म्याला विसावा देऊ शकणारी,
हीच ती जागा...
आणि मग एकेक दिवस करत मुक्काम वाढतच गेला,
तुझं घर आपलंच समजू लागले मी..
कधी निघून जावं म्हटलं तर तू ही थांबवलस मला..
आणि मलाही नाही ओलांडता आला तुझा लोभसवाणा आपलेपणा..
मग सजवत गेले तुझं घर, आपलंच समजून..
कानेकोपरे धुंडाळले.. भूतकाळ चाचपला..
नवे रंग आणले, नवे गंध आणले, नवे सूर आणले..
बोलक्या झाल्या भिंती, हळुवार झाली हवा..
इतकंच काय पण,
तुझ्या अंगणभर मोगरासुद्धा बहरला,
आपल्या निरंतर गप्पांसोबत...
अॅनिमेशन चित्रपट म्हणजे फक्त लहान मुलांसाठी असलेला प्रकार हा आपल्याकडचा एक सर्वसाधारण समज आहे. पण परदेशातले अॅनिमेशन चित्रपट, त्यांतील विषयांचं वैविध्यं आणि प्रगल्भता बघता कोणत्याही प्रौढाला खिळवून ठेऊ शकतील असेच हे चित्रपट आहेत. त्यातही खास उल्लेखनीय म्हणजे अमेरीकन आणि जपानी चित्रपट. आणि अजूनच स्पेसिफिकली बोलायचं झालं तर जपानमध्ये अबालवृद्धांसाठी म्हणून जे काही अॅनिमेशन चित्रपट बनवले जातात त्यासाठी अॅनिमे (anime) ही संज्ञा वापरली जाते. या विभागात केवळ प्रौढांसाठीच असलेल्या अतिशय किचकट, गुंतागुंतीच्या विषयापासून लहान मुलांसाठी असलेल्या हलक्याफुलक्या विषयापर्यंत सगळ्याचा समावेश होतो.
जग चालतंच असतं
मागील पानावरुन पुढे..
चांदणीला फुलपाखरं पहिल्यांदा दिसतात तेव्हा..
पण चांदणीचं मात्र विश्व बदलून जातं..
हसत राहते लुकलुकत,
फुलपाखरं पाहता पाहता...
कोवळ्या फुलांत भिरभिरणारी फुलपाखरं..
निश्राप मनस्वीपणे लळा लावणारी फुलपाखरं...
नियती ठाऊक असतेच चांदणीला,
अगदी पहिल्यापासून..
अन् म्हणूनच फुलपाखरांचं तिला अप्रूपही जास्त..
फुलांनाही नसेल एवढं..
चांदणी निरखत राहते फुलपाखरांना कौतुकाने..
तो असह्य पण अटळ क्षण येईपर्यंत..
जग चालत राहतं..
काळाच्या ओघात फुलं प्रौढ बनतात... पोक्त नजरेसारखी..
आणि फुलपाखरं उडून जातात.. नजरेतल्या सुगंधासारखी...
फुलपाखरं उडून जातात तेव्हाही,