हा एक तुकडा तुझा..
आणि हा तुझा..
हा माझा खूप आवडीचा आणि लखलखता,
हा तुझ्याचपाशी असला पाहिजे..
आणि बाकी राहिलेलं सगळं तर आहेच माझं..
नाही का?
.
.
.
.
आता लक्षात येतय, माझं म्हणून जे ठेवलेलं ते फारच कमी होतं,
गहाळ होऊन गेलय कदाचित ते कधीच,
आणि असेलच तर ते बाकी तुकड्याशिवाय पूर्ण होत नाही,
सगळे तुकडे वेगवेगळ्या दिशांना ओढतात आता,
त्यांना जोडून ठेवण्यात दमछाक होते
आणि हाती काहीच लागत नाही..
कोणे एके काळी जन्माला आले तेव्हा एकसंध होते मी कदाचित...
"ज्याला देव हवा आहे त्यानं तो आपापला शोधावा.. ज्याला नको आहे त्यानं शोधू नये, हे स्वातंत्र्य सगळ्यांना आहे" हे जितकं खरं आहे तितकंच हे ही खरं आहे की ज्याला कथा हवी असते, त्याला ती कुठेही मिळते, तो ती मांडतो.. ती पाहण्याचं किंवा न पाहण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे.. पण लोकहो, हे स्वातंत्र्य घ्या आणि 'देऊळ' नक्की पहा. मध्यंतरापर्यंत फार्सिकल टोन असलेला सिनेमा, मध्यंतरानंतर बराच गंभीर होतो. सिनेमाचं नाव आणि टॅग लाइन वाचून काही आडाखे बांधले असतील तर ते बर्यापैकी खरे निघतात पण खरी गंमत कथेच्या मांडणीत आहे.
जन्माला येतो तेव्हाही वाहतच असतं रक्त शरीरात,
वाढत जातं दिसामासांनी..
आपल्याही नकळत अव्याहतपणे सुरु असते प्रक्रिया त्याच्या निर्माणाची..
शुद्धीकरणाची..
येणार्या प्रत्येक क्षणागणिक
आणि जाणार्या प्रत्येक श्वासागणिक
एकेका थेंबामागे घडत असतं महाभारत...
अखंडपणे..
अचानक वार होतो एखादा आणि भळभळायला लागतं..
.
.
.
.
.
.
कवितापण अशीच जन्माला येते....
हाय..!
प्रिय लिहिलं नाही कारण तू मला प्रिय आहेसच याची मला खात्री नाही. किंवा खूप जास्त प्रिय असावीस. Narcissist ना शेवटी.. ह्म्म्म.. कशी आहेस? म्हणजे आता मला खरच आठवत नाही की तू कशी आहेस. स्वतःविषयी विचार करताना मला नेहमी असं वाटतं की, ' अर्रे मी अशीच तर आहे पहिल्यापासून, फक्त आता स्वतःविषयी अमुक अमुक गोष्ट शब्दांत मांडू शकते. (आणि गरज पडलीच तर त्यामागची कारणमीमांसादेखिल स्पष्ट करु शकते.)' असो, तर याप्रकारे तुझ्याविषयीदेखिल मला काही आठवत नाही, त्यामुळे काही नवीनही वाटत नाही.
पुस्तकाचे नावः मृगजळीचा मासा
कवयित्री: कविता महाजन
प्रथम आवृत्ती: ऑगस्ट २००८
राजहंस प्रकाशन.
कविता कोणाला काय देते याचे उत्तर प्रत्येकासाठी वेगळे असले तरी कवितेचं हे देणं तिच्यासारखंच उत्कट व भरभरून असतं. आपण कधी नकळत, कधी जाणूनबुजून, कधी वेळ काढून हक्काने तिच्याकडे जात राहतो ही गोष्ट सगळ्यांतला समान दुवा आहे.
काल टिव्हीवर अर्थातच लोकपाल चालू होतं सगळीकडे. मध्ये एक अॅड पाहिली Lay’s ची. तो तिला विचारतो "कँडल मार्च के बाद कँडल लाईट डिनर के लिये चले?" त्या अॅड बनवणार्याचं कौतुक करावं तेवढं कमी असं वाटलं खरच त्या क्षणी. किती मार्मिक भाष्य केलय. आणि बहुतेकदा अशा मोर्चामध्ये सहभागी होणार्या लोकांची धाव तिथवरच असते.
स्वप्नभरल्या लोचनांना त्रास नुसता
चांदणे आहे खरे की भास नुसता..
परतवूनी लावले मी आसवांना
मग मुक्याने सोडला नि:श्वास नुसता..
बघ अबोली गंध मी केलेत गोळा
तू उधारीने मला दे श्वास नुसता..
एकही उरणार नाही प्रश्न बाकी
फक्त वळुनी एकदा तू हास नुसता..
भास! सारे भास!! - अंती हे उमजता,
मी सुखाचा निर्मिला आभास नुसता..
(व्हॅन गॉग.. पोस्ट इंप्रेशनिस्ट कलाकारांमधलं खूप महत्वाचं नाव. त्याच्या रंग, रेषा जशा भुरळ घालतात तसाच त्याच्या आयुष्याचा प्रवासही. स्टारी नाईट्स नावाने प्रसिद्ध असलेल्या त्याच्या ३ कलाकृती. Starry Night Over the Rhone, Cafe Terrace at Night आणि The Starry Night)
------------------------------------------------------------------------------------

निळेपणाच्या छटा नवीन नव्हत्याच मला कधी,
आठवणी येतात त्याच्या कितीतरी आधीपासून वाहतेय निळाई श्वासात..
पण तू अंधार रंगवायला काढलास तेव्हा
कोणाला वाटलं होतं अंधार पण असा..
अजून मला आठवतात तुझ्यासोबतचे क्षण..
परत एकदा प्रेमात पडल्यासारखं काहीतरी झालेलं..
मनात म्हटलं हे काय भलतच,
आणि आयुष्याच्या अशा वळणावर...?
बरं.. तू असा जगमित्र,
मला अजून माझाही शोध नीटसा नाही लागलेला..
अनंत विस्तारलेली क्षितिजं समोर घेवुन तू उभा,
आणि मी परतीच्या वाटा बंद झालेल्या वळणावर..
प्रश्न तुझ्या वार्यालाही फिरकत नाहीत,
आणि माझ्यासमोर उत्तरांचीच कोडी..
अजून आठवतात ते क्षण.. वेडावलेले..
युगांनंतर जिवंत झाल्यासारखं वाटलेलं..
गुलमोहराच्या झाडाखाली,
अमलताशाला कवेत घेवुन येणारं वारं,
स्पर्शून जात होतं तुझ्या-माझ्यातील पोकळीला..
तुझ्या पौर्णिमेच्या सावळ्या चेहर्यावर
हे म्हणजे भलतंच...
माध्यम आलं म्हणजे माध्यमाची चौकट आली..
बंधनं आली..
गावाला पोहचणं लांब राहिलं..
गाडीचा मेंटेनंस आणि वाहतुकीच्या नियमांनीच जीव काढलाय..
बरं सगळं असच असावं ना मग.
तर ते ही नाही..
अफाट वेगाचं वेड घेवुन दर्याखोर्यांतून पर्वतांना टक्कर देणारी वावटळ,
आणि खोलीतल्या पंख्याची नियंत्रित झुळूक
यांना कोणीतरी एकत्र बांधून आता सोबत चाला म्हटलय..
छ्या...
जगण्यासाठी शरीर हे भलतच गैरसोयीचं माध्यम आहे..