कविताला आठवताना
कविता महाजनच्या पहिल्या स्मृतीदिनाचं औचित्य साधून 27 सप्टेम्बर 2019 ला ‘कविताला आठवताना’ हा अभिवाचनाचा एक सुंदर कार्यक्रम सुषमा देशपांडे आणि म्रुदुला बेहेरे-भाटकर यांनी पुण्यात सादर केला. कविताच्या असंख्य कविता, कादंब र्या, ललित लेख यातून नेमके वेचे निवडणं आणि संहिता तयार करण्याचं आव्हान उज्वला मेहेंदळे यांनी उत्तमरित्या पेललं होतं. अभिवाचनातलं नेटकेपण आणि सफाई यांमुळे कार्यक्रम संस्मरणीय झाला.
चटका लावून जाणारी एक बातमी. त्यांच्या असंख्य चाहत्या वाचकांपैकी मी एक. बस्स! एव्हढंच काय ते आमचं नातं. त्यांच्या ब्लॉग्वरच्या किंवा त्यांनी इ-मेल वरून पाठवलेल्या ताज्या कविता वाचणं हा माझा एक आवडता छन्द होता. अगदी अलीकडेच समजलं की त्या वसईहून पुण्याला वास्तव्याला आल्या आहेत. त्या एकदा स्थिर- स्थावर झाल्या की फोन करून त्यांना भेटायला जायचं असं मी ठरवलं होतं. व्हॉट्स अप वर फिरत-फिरत बातमी आली ती त्यांच्या आजारपणाविषयी आणि नंतर आज, आकस्मिक निधनाची. मराठी साहित्य विश्वात कधीही भरून न येणारी पोकळी वगैरे ठराविक साच्यातल्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया येत राहतील.
पुस्तकाचे नावः मृगजळीचा मासा
कवयित्री: कविता महाजन
प्रथम आवृत्ती: ऑगस्ट २००८
राजहंस प्रकाशन.
कविता कोणाला काय देते याचे उत्तर प्रत्येकासाठी वेगळे असले तरी कवितेचं हे देणं तिच्यासारखंच उत्कट व भरभरून असतं. आपण कधी नकळत, कधी जाणूनबुजून, कधी वेळ काढून हक्काने तिच्याकडे जात राहतो ही गोष्ट सगळ्यांतला समान दुवा आहे.