Submitted by मी मुक्ता.. on 6 May, 2011 - 00:05
हे म्हणजे भलतंच...
माध्यम आलं म्हणजे माध्यमाची चौकट आली..
बंधनं आली..
गावाला पोहचणं लांब राहिलं..
गाडीचा मेंटेनंस आणि वाहतुकीच्या नियमांनीच जीव काढलाय..
बरं सगळं असच असावं ना मग.
तर ते ही नाही..
अफाट वेगाचं वेड घेवुन दर्याखोर्यांतून पर्वतांना टक्कर देणारी वावटळ,
आणि खोलीतल्या पंख्याची नियंत्रित झुळूक
यांना कोणीतरी एकत्र बांधून आता सोबत चाला म्हटलय..
छ्या...
जगण्यासाठी शरीर हे भलतच गैरसोयीचं माध्यम आहे..
गुलमोहर:
शेअर करा
जगण्यासाठी शरीर हे भलतच
जगण्यासाठी शरीर हे भलतच गैरसोयीचं माध्यम आहे..>>>>>>>> हे सगळ्यात जास्त आवडल
हे कैच्याकै आहे? जबरदस्त..!
हे कैच्याकै आहे?
जबरदस्त..!
जगण्यासाठी शरीर हे भलतच
जगण्यासाठी शरीर हे भलतच गैरसोयीचं माध्यम आहे..>>> ही ओळ अप्रतिम!
मुक्ता, कविता वाचत होते आणि
मुक्ता,
कविता वाचत होते आणि अर्थ लावू पाहात होते... जमत नव्हतं
तू माध्यम कशाल म्हणत आहेस ते समजत नव्हतं
शेवटाची ओळ वाचली आणि डोळे उघड्ले गं!
अप्रतिम
ह्या माध्यमाला धरून वाट्चाल करुन, बंधनं पाळत जगण, वेगाची अन आस्तित्त्वाची सांगड घालत. बापरे....!
विचार करायला लावणारी कविता...
उचल गो इथून! (काकाक मधून)
ह्म्म्म्म्म्म
ह्म्म्म्म्म्म
हे वाचून मला "आज फिर जीनेकी
हे वाचून मला "आज फिर जीनेकी तमन्ना है..." म्हणत धावत सुटलेली वहिदा आठवली...
सर्वांचे खूप खूप आभार..
सर्वांचे खूप खूप आभार..
आनंदयात्री, "आज फिर मरने का इरादा है" जास्त योग्य नाही का..
(मुक्ता, आनंदयात्री, दोन्ही
(मुक्ता, आनंदयात्री, दोन्ही एकच नाही का? )
मुक्ता, नाही... अजिबात
मुक्ता, नाही... अजिबात नाही...
(किंवा तू तसं म्हण, मी असं म्हणेन... )
खरय.. दोन्ही एकच.. मला एकदम
खरय.. दोन्ही एकच..
मला एकदम या ओळी आठवल्या,
" मै बोलू दिन है तो, तू बोले रात नहीं..
बात तो वोही है ना, बस्स वो ही बात नही.. "
.
.
आज कुछ नयी बातें करने का
आज कुछ नयी बातें करने का इरादा है
जीने की तमन्ना पे मरने का इरादा है!
मस्त कविता आहे मुक्ता!
क्या बात है ! सुप्पर्ब !
क्या बात है ! सुप्पर्ब ! ह्या गैरसोयीच्या माध्यमामुळे मनाची मात्र ओढाताण होते.
वा वा ! क्या बात है | एकदम
वा वा !
क्या बात है |
एकदम मस्त !
आज कुछ नयी बातें करने का
आज कुछ नयी बातें करने का इरादा है
जीने की तमन्ना पे मरने का इरादा है!>>> व्वा.. क्या बात है क्रांतिजी.. भारीच..
धन्यवाद, रुणुझुणू, अवल..
"जगण्यासाठी शरीर हे भलतच
"जगण्यासाठी शरीर हे भलतच गैरसोयीचं माध्यम आहे.."
...... वेगळाच विचार ..... छान
हाय... मुक्ते, कधी नव्हे ती
हाय... मुक्ते, कधी नव्हे ती कविता वाचायला बसले. काही अतिशय सुंदर, आतलं, भिडणारं वाचलं तर पुढे काही वाचायचं नाही... हा माझा नियम.
घे... आज इतकच, म्हणजे!
इति
ग्रेट एक्स्प्रेशन .
ग्रेट एक्स्प्रेशन .
UlhasBhide, छाया देसाई.. खूप
UlhasBhide, छाया देसाई..
खूप खूप आभार..
दाद,
अनंत धन्यवाद..!
जगण्यासाठी शरीर हे भलतच
जगण्यासाठी शरीर हे भलतच गैरसोयीचं माध्यम आहे..>>>>>>अग्ग्ग्ग्ग्ग्ग!!! काय भन्नाट ओळ आहे ही
भन्नाट !!
भन्नाट !!
क्या बात... अन त्या हिंदी
क्या बात...
अन त्या हिंदी ओळीही ...
(No subject)
मस्त......! सारख्या नावाची
मस्त......! सारख्या नावाची माझी पण कविता आहे. साधर्म्य आहे का बघू म्हटले. पण ही भलतीच ग्रेट!
भन्नाट. आवडलीच.
भन्नाट. आवडलीच.
लै भारी... खरंच... माध्यम
लै भारी... खरंच... माध्यम नसतं तर अधिक सोपं झालं असतं
लय भारी..........
लय भारी..........
तुफान.... खरंच फारच
तुफान....
खरंच फारच उत्तम.....
<< अफाट वेगाचं वेड घेवुन दर्याखोर्यांतून पर्वतांना टक्कर देणारी वावटळ,
आणि खोलीतल्या पंख्याची नियंत्रित झुळूक
यांना कोणीतरी एकत्र बांधून आता सोबत चाला म्हटलय.. >>
<< जगण्यासाठी शरीर हे भलतच गैरसोयीचं माध्यम आहे..>>
हे दोन अशक्य भारी.....
जगण्यासाठी शरीर हे भलतच
जगण्यासाठी शरीर हे भलतच गैरसोयीचं माध्यम आहे.......>>>>>
सकारण असो वा अकारण, गोंधळलेल्या मनःस्थितीचे हे नेमके वर्णन आहे. प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेता घेता एखादा क्षण प्रखरतेने समोर येतो त्यावेळी कविमनाला असे जरूर भासते की माध्यमाची चौकट तर आहेच पण ती बंधन म्हणून स्वीकारणे जड आहे. इथे तुम्ही 'शरीर' प्रतिकात्मक म्हणून वापरले आहे असे जरी मानले तरी परिस्थितीतील असहाय्यता दर्शविण्यासाठी त्याचा योग्य असाच वापर झाला आहे.
कोणत्याही श्रेष्ठ कलावंतासमोर एका क्षणी "Do I understand myself?' असा एक प्रश्न उभा राहतो. त्याचे उत्तर कोणत्या माध्यमातून प्राप्त होईल हे शोधण्यातच तो गुंगून जातो. आपल्या कवितेत काही प्रमाणात हाच भाव आहे.
सर्वांचे खूप खूप आभार..
सर्वांचे खूप खूप आभार..
धन्यवाद श्यामली..
डुआय..
गिरीशजी, अहो, जाने तू या जाने ना या गाण्याच्या ओळी आहेत त्या. अब्बास टायरवाला.. छानच आहेत आणि ए.आर. रेहमानचं संगीत.. अजून काय हवं असतं?
उमेशजी, तुम्ही ग्रेट आहात. तुमची कविता उच्च आहे खरच... माझ्या कवितेला छान म्हटलात हे माझं भाग्य. धन्यवाद..
Harshalc, माध्यम नसतं तर अधिक सोपं झालं असतं हे नक्की नाही सांगता येत..
आभार निशदे..
प्रतीकजी, सुंदर उलगडलीत कविता. खूप सुंदर. कवितेइतकचं आपलं विवेचनही. प्रत्येक शब्दाशी सहमत. धन्यवाद..
Pages