विशेष सूचना: "बलात्कार - एक लिंगनिरपेक्ष घटना" हे प्रमाण मानून दिल्ली घटनेच्या निमित्ताने आणि त्याही आधीपासून पडलेल्या काही प्रश्नांचा आणि विचारांचा हा सारांश आहे. यात कुठेही, कोणत्याही प्रकारे बलात्काराचे समर्थन केलेले नाही. तसेच मी व्यक्त केलेल्या मतांना कोणत्याही निष्कर्षांचा आधार नाही. मी sociology किंवा history ची अभ्यासक नाही त्यामुळे मी मांडलेली मतंही सिद्धतेच्या आधाराशिवायची आहेत. फक्त एक चिंतन असेच याचे स्वरुप आहे हे कृपया वाचकांनी व जाणकारांनी ध्यानात घ्यावे. या विषयांचा अभ्यास असणार्यांनी मी व्यक्त केलेल्या मतांमध्ये काही त्रूटी असल्यास त्यावर प्रकाश टाकावा.
"छ्या.. आपण नसतं बुवा असं जग बनवलं..."
नेहमीप्रमाणे तो स्वतःशीच विचार करत बसलेला.. हे त्याचं नेहमीचंच होतं. जग जितकं दिसायचं तेवढीच त्यातली विषमता आणि विरोधाभास अस्वस्थ करत रहायचा त्याला. आणि मग आपल्या मनात आपल्याला हवी तशी सृष्टी निर्माण करत रहाणं छंद बनून गेलेला त्याचा.
हडप्पन, मेसोपोटॅमिअन, सुमेरिअन, मायन..
सिव्हिलायजेशन्स... संस्कृती....
अवशेष गाडले जातात जमिनीत..
काहीच राहत नाही कालातीत...
सगळे जीव भाग बनून राहतात एका संस्कृतीचा..
स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी धडपडणारे,
संस्कृतीचा भाग म्हणून अस्तित्व जपणारे,
काहीच न जाणता जगत जाणारे...
जाणिवपूर्वक संस्कृती जोपासणारे,
आणि तितक्याच जाणिवपूर्वक ती नाकारणारे..
संस्कृतीने पोळलेली आयुष्यं..
संस्कृतीने उजळलेली आयुष्यं..
सगळी तोलली जातात एकाच तराजूत..
तिला नाकारणारे,
झिडकारणारे..
विद्रोही,
त्रासलेले..
अट्टहासाने स्वतःला वेगळे केलेले..
सगळेच नष्ट होतात काळासोबत..
आणि आपण सगळ्यांना ओळखतो
१) जनरलायजेशन.. प्रत्येक गोष्टीचा स्वतंत्र अभ्यास करणं खूप बोजड होईल म्हणून साधारणपणे समान गुणधर्म असलेल्या गोष्टींचा एक गट करायचा.. मग त्यातूनही प्रत्येकाचे काही वेगळे गुणधर्म रहातातच, त्याचा वेगळ्याने अभ्यास करायचा..म्हणजे एकूण एकच. माझं जनरलायजेशन केलेलं मला आवडत नाही. चांगलं म्हटलेलंही आवडत नाही, वाईट म्हटलेलंही.. आवडत नाही म्हणण्यापेक्षा पटत नाही. मी चांगली किंवा वाईट कशी असू शकते? मी माझ्याइतकीच चांगली आणि वाईट आहे, कमी नाही जास्त नाही. पण आता कोणत्याही एका बाजूला जायचं म्हणजे परत जनरलायजेशन आलं. म्हणजे शेवटी सगळंच व्यर्थ..
इतरांची चंद्रांनी लगडलेली आभाळं कुतूहलाने, काहीशा असूयेनेच पहायचे ते दिवस..
माझं कोरं आभाळ टुकूटुकू बघत रहायचं सैरभैर होऊन, येऊ घातलेल्या चंद्रांच्या वाटेकडे..
एकेक चंद्र जमू लागला आभाळात तसं सजत गेलं आभाळ माझंही..
आता 'मी'च माझ्या आभाळाकडे असूयेनं पहावं असंही वाटू लागलं..
निवडून निवडून आलेला एक एक चंद्र माझ्याकडे..
'अगदी माझ्यासारखा'.....
दरम्यान काय झालं हे खरंच आठवत नाही..
पण अगदी 'माझ्यासारख्यांत' काहीतरी राहून गेलं एवढं खरं..
एक दिवस जाणवलं,
कोणत्याच चंद्राने हट्ट नाही केला अमावस्येला उगवायचा..
सगळ्यांनीच समजूतदारपणे मान्य केलं एका दिशेने प्रवास करायचं..
"प्रमाणामध्ये सर्व काही असावे." या प्रमाणात असण्यामुळेच जग सुरळीत चाललय. पण तरीही सगळ्याच गोष्टी प्रमाणात नसतात. जसं की माझा राग... प्रमाणाबाहेर. मर्यादा सोडून. पण तुझ्या समजूतदारपणाला मर्यादा आहेत. त्यामुळे तूही कधी कधी चिडतोस. मग म्हणतोस, "माझ्याही ऐकून घेण्याला मर्यादा आहेत. काय गरज आहे हे बोलायची. तुझ्या आजूबाजूच्यांनी काय कमी केलं का तुझ्यासाठी? देन लूक अॅट पॉसिटीव्ह अॅन्ड बी हॅपी." पण मला हे ऐकू येत नाही. तुझ्या समजूतदारपणाला मर्यादा असल्याचं मला मुळीच आवडलेलं नसतं. आणि मला यावर अमर्याद चिडायचं असतं पण तुझी मर्यादा संपल्याने त्याचं रुपांतर अमर्याद रडण्यात होतं.
मी लेखक असते तेव्हा,
नाकारत असते मी भाग होणं, कोणत्याही समूहाचा वगैरे..
रचनेच्या नावाखाली नियमांत बांधून, आत्मा मारुन टाकलेल्या प्राणिमात्रांपेक्षा,
माझ्या कल्पनेतले स्वैर, मुक्त आणि उत्फुल्ल जीव,
खुणावत असतात मला...
मी लेखक असते तेव्हा,
मला गरज नसते ईश्वराच्या कृपेची वगैरे..
कारण मी स्वतःच ईश्वर असते मी निर्माण केलेल्या जगाची..
त्याच्या निर्मितीपेक्षा कितीतरी सरस निर्मिती करुन,
मी स्वतःला कधीच सिद्ध केलेलं असतं माझ्या नजरेत..
मी लेखक असते तेव्हा,
मला भासत नाही उणीव कोणत्याच नात्यांची वगैरे..
या जगातल्या आपमतलबी आणि फायद्या तोट्यांची गणितं मांडणार्या नात्यांपेक्षा,
"आज गौरी भेटली.."
"काय म्हणाली?"
"अं.. काही नाही. जनरल.."
"तरी पण? इतक्या दिवसांनी भेटलात ना? तिला काही माहिती नसेलच. सांगितलस का मग?"
"हो.. सांगितलं ना."
"मग काय म्हटली?"
"काही नाही. तू ठिक आहेस ना, एवढंच विचारलं."
"बस्स?"
"हो.. तुला सांगितलं ना, काही नाती नाही बदलत. ती माणसं आपलीच राहतात. तुमच्या आयुष्यात काय झालं काय नाही. तुम्ही काय निर्णय घेतले. ते बरोबर की चूक यावर जोखत राहत नाहीत तुम्हाला. ती तुमची असतात. आणि कायम तुमच्यावर तेवढंच प्रेम करत रहातात."
"हो का? तिला तुझ्या आयुष्याशी काही घेणं देणं नसेल म्हणूनही काही म्हटली नसेल ती."