विनोद खन्ना

"हाल चाल ठीक ठाक है"

Submitted by फारएण्ड on 30 April, 2017 - 13:10

जनरली आपण गप्पा मारताना सरकार, समाज/लोक यांचा विषय आला, की "पूर्वीपेक्षा आता बेकार आहे" असा टोन आपोआप ऐकू येतो. दहा वर्षांपूर्वी, वीस वर्षांपूर्वी तेव्हाच्या परिस्थितीबद्दल तसेच ऐकू यायचे. मग प्रश्न पडतो की हे सगळे चांगले होते कधी? गुलजार च्या 'मेरे अपने' मधले हे गाणे ऐकले तर पूर्वीही लोक तसेच म्हणत असेच वाटेल.

न का र

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 25 March, 2013 - 03:43

फार वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा वर्षभरात प्रदर्शित होणार्‍या सर्व हिंदी चित्रपटांपैकी केवळ एक अथवा फार फार तर दोन चित्रपट पाहणं शक्य होतं, कारण नवे चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच पाहावे लागत आणि आर्थिक दृष्ट्या ते परवडणं शक्य नव्हतं; त्या काळात वर्षभर दूरदर्शन (ज्याला काही लोक कुत्सितपणे दूर्दशा दर्शन असेही म्हणत) नामक राष्ट्रीय प्रक्षेपण वाहिनीवर आठवड्यातून एक या हिशेबाने साधारण पन्नासएक जुने हिंदी चित्रपट पाहिले जात. त्या काळी चित्रपट प्रसारित होण्यापूर्वी निवेदिका थोडक्यात तसे निवेदन करीत असे. या निवेदनात चित्रपटाचे प्रमुख कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार आदींची माहिती सांगितली जात असे.

Subscribe to RSS - विनोद खन्ना